तीन गुण ( शास्त्र जाणणारास आवश्यक )- १ ग्रंथाचें संपूर्ण ज्ञान , २ तात्पर्याचें निरूपण करतां येणें व ३ ग्रंथाच्या भागांसंबंधीं विवेचन करतां येणें .
ग्रंथार्थस्य परिज्ञानं तात्पर्यार्थनिरूपणम् ।
आद्यन्तमघ्यव्याख्यानशक्ति : शास्त्रविदो गुणा : ॥
( सं . समयसार ८ - २७ )
तीन गुरु - ( अ ) १ जन्मदाता , २ विद्यागुरु व ३ मोक्षगुरु . ( आ ) १ पिता , २ माता व ३ आचार्य .
पुरुषस्येह जातस्य भवन्ति गुरव : सदा ।
आचार्यश्रैव काकुत्स्थ पिता माता च राघव ॥
( वा . रा . अयोघ्या १११ - २ )
तीन गोष्टी ( अतींद्रिय ज्ञान्यासहि कळणें कठीण )- १ आयुष्य , २ वय आणि ३ गर्भिणीचें लक्षण .
आयुर्ज्ञानं वयोज्ञानं गर्मिणीनां च लक्षणम् ।
ऋषयश्चापि मुह्मन्ति किं पुंनर्मोसचक्षुषः ॥
( गौ . धर्मसूत्रें . अ . ९ )
तीन गोष्टी अविश्वासार्ह - सर्पाची मिठी , २ विषप्राशन व ३ शत्रूवर विश्वास ठेवणें . ( शिवाभारत अ . १३ ).
तीन गोष्टी ( आयुष्यांत उपकारक पण तितक्याच कठीण )- १ दारिद्र्यांत औदार्य , २ एकान्तांत इंद्रियनिग्रह व ३ संकटसमय़ीं सत्य .
तीन गोष्टी ( एकेकदां होतात )- ( अ ) १ मोठीं माणसें एकदांच बोलतात , २ विद्वान एकदांच बोलतात आणि ३ कन्यादान . ( आ ) १ वडिलार्जित मालमत्तेची वांटणी , २ कन्यादान आणि ३ वचन .
सकृजल्पन्ति राजानः सकृजल्पन्ति पण्डिताः ।
सकृत्प्रदीयते कन्या त्रीण्येतानि सकृत सकृत ॥
( स्कंद वट्सावित्री - कथा )
तीन गोष्टी ( कालाधीन )- १ विवाह , २ जन्म आणि ३ मरण . या तीन गोष्टी कालाधीन म्हणजे जेथें व ज्याच्याशीं होणें असतील त्या ठिकाणीं अवश्य होतील .
त्रयः कालकृताः पाशा शक्यन्ते न निवर्तितुम् ।
विवाहो जन्म मरणं यथा यत्र च येन च ॥
( पद्म .- भूमि ८१ - ३४ )
तीन गोष्टींत कुतूहल वाटणारा स्त्रीस्वभाव - १ , जन्म , २ मरण आणि ३ विवाह ( श्रीसरस्वती दीपावली १९६२ )
तीन गोष्टी ( केवळ नामघारी होत )- १ धान्य नसलेला गांव , २ पाणी नसलेली विहीर आणि ३ अध्ययन न केलेला ब्राह्नण .
धान्यशून्यो यथा ग्रामो यथा कूपश्च निर्जलः ।
ब्राह्मणश्वाधीयानस्त्रयस्ते नामघारकाः ॥ ( सु . )
तीन गोष्टी ( क्लेशदायक )- १ बालपणीं मातृवियोग , २ तरुणपणीं भार्यावियोग आणि ३ म्हातारपणीं पुत्रशोक .
तीन गोष्टी तिरस्कारार्ह - १ दुर्जन , २ परस्त्री व ३ परधन . ( प्रश्नोत्तर रत्नमालिका )
तीन गोष्टी ( दावून ठेवतां येत नाहींत )- १ प्रेम , २ खोकला आणि ३ स्फूर्ति .
तीन गोष्टी ( दुरूनच चांगल्या )- १ डोंगर , २ वेश्येचें मुखकमल आणि ३ युद्धवार्ता .
दूरस्थाः पर्वता रम्या वेश्या च मुकमंडने ।
युद्धस्त वार्ता रम्या च त्रीणि रम्याणि दूरतः ॥ ( सु . )
तीन गोष्टी ( दुर्लभ )- ( अ ) १ विषयत्याग , २ तत्त्वदर्शन व ३ अपरोक्ष साक्षात्कार . ( आ ) १ मनुष्यत्व , २ मुमुक्षुत्व आणि ३ सत्पुरुष - सहवास .
दुर्लभं त्रयमेवैतद्देवानुग्रहहेतुकम् ।
मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरुषसंश्रय : ॥ ( विवेकचूडामणि )
तीन गोष्टी ( देतां येत नाहींत )- १ पुरुषानें आपली अब्रू , २ स्त्रीनें आपलें पातिव्रत्य आणि ३ राष्ट्रानें आपलें स्वातंत्र्य . या तीन गोष्टी कोणी कितीहि उपकार केला म्हणून कृतज्ञतेचें मोल म्हणून देतां यावयाच्या नाहींत . ( डॅनिअल ओकोनेल )
तीन गोष्टी ( दुःख परिहार करणार्या )- १ सुभाषितरसास्वाद , २ प्रौढपत्नी - समागम व ३ विवेकी अधिकार्याची सेवा .
सुभाषितरसास्वादः प्रौढस्त्रीसंगमस्तथा ।
सेवा विवेकिनो राज्ञो दुःखनिर्मूलनं त्रयम् ॥ ( सु . )
तीन गोष्टी ( दैवाधीन )- १ अन्न , २ मान , ३ धन . अन्न मान धन । हे तों प्रारब्ध - आधीन ॥ ( तुकाराम )
तीन गोष्टी ( निरर्थक होत )- १ किमयेनें द्रव्यप्राप्ति , २ शाक्त मार्गानें मोक्ष व ३ जावयाचे ठिकाणीं पुत्रत्वबुद्धि -
धातुदाहेन वित्ताशा मोक्षाशा कौलिके मते
जामातरि च पुत्राशा त्रयमेतन्निरर्थकम् ॥ ( सु . )
तीन गोष्टी ( परत येत नाहींत )- १ सुटलेला बाण , २ बोललेला शब्द आणि ३ गेलेली अब्रू वा सत्कर्म करण्याची संघि .
तीन गोष्टी पहाटे उठणारास प्राप्त होतात - १ आरोग्य , २ लक्ष्मी आणि ३ शहाणपणा ,
तीन गोष्टी ( पुरुषांचें विडंबन करणार्या )- ( अ ) १ अर्धवट ज्ञान , २ द्रव्यसंपादित मैथुन आणि ३ पराधीन भोजन . ( आ ) १ वृद्धपर्णी भार्यावियोग . २ बंधुवर्गाचे हातीं संपत्ति जाणें व ३ परस्वाधीन भोजन .
खण्डे खण्डे च पाण्डित्य क्रयक्रीतं च मैथुनम् ।
भोजनं च पराधीनं तिस्त्रःपुंसोर्विड्म्बनम् ॥ ( सु . )
तीन गोष्टींचा प्रभाव ( अतर्क्य असतो )- १ रत्नें , २ मंत्र व ३ औषधी .
" अचिंत्यो हि मणिमंत्रौषधीनां प्रभावः " ( वाणकवि )
तीन गोष्टींनी प्रापंचिकांस सुख होतें - १ सुंदर अपत्य , २ हसत - मुखी सुंदर स्त्री व २ सज्जनसंगति . ( बृद्ध चाणक्य ४ - १० )
तीन गोष्टींमुळें मनुष्य गुरफटला जातो - १ लोभ , २ बेसावधपणा आणि ३ विश्वास .
लोभात्प्रमादाद्विश्रम्भात् पुरुषो बध्यते त्रिभिः ।
तत्माल्लोभो न कर्तव्यो न प्रमादो न विश्वसेत ॥ ( स्कंद - नागर . ५१ - २५ )
तीन गोष्टी यावज्जीव वंदनीय - १ वेदान्त , २ श्रीगुरु आणि ३ ईश्वर .
यावज्जीवं त्रयो वन्द्या वेदान्तो गुरुरीश्वरः ।
आदौ ज्ञानाप्तये पश्चात् कृतनत्वापनुत्तये ॥ ( भ . प्रदीप )
तीन गोष्टी प्रकट करूं नयेत - १ चित्त , २ वित्त आणि ३ मैथुन ( स्मृतिशेष )
तीन गोष्टी लहरी असतात - १ निद्रा , २ प्रिया आणि ३ कला ( मंझधार )
तीन गोष्टी वर्ज्य ( स्नेह टिकविण्यास )- १ वाद , २ देवघेव आणि ३ पतीचे अपरोक्ष त्याच्या स्त्रीशीं संभाषण .
वाग्वादमर्थसंबंध तत्पत्नीपरिभाषणम् ।
यदीच्छेद् विपुलां मैत्रीं त्रीणि तत्र न कारयेत् ॥ ( गरुड ११४ - ५ )
तीन गोष्टी वेदानेंच जाणावयाच्या - १ परमेश्वर , २ परलोक व ३ पुनर्जन्म . या तीन गोष्टी केवळ वेदानेंच जाणल्या जातात .
तीन गोष्टी श्राद्धकालीं पवित्र आणि तीन गोष्टी वर्ज्य - १ कन्यापुत्र , २ दर्भ आणि ३ तीळ . हे तीन पवित्र आणि १ कोप , २ प्रयाण व ३ त्वरा ( घाई ) या तीन गोष्टी श्राद्धसमयीं वर्ज्य सांगितल्या आहेत .
त्रीणि श्राद्धे पवित्राणि दौहित्रं कुतपास्तिलाः ।
वर्ज्यानि चाहुर्विप्रेन्द्रैः कोपोऽध्वगमनं त्वरा ॥ ( मार्केडेय ३१ - ६४ )
तीन गोष्टींमुळें रोगाचा उद्भव होत नाहीं - १ भोजनानंतर ताक पिणें , २ रात्रीं दूध घेणें व ३ उषःपान .
भोजनान्ते पिवेत्तकं वासरान्ते पिवेत्पयः ।
निशान्ते च पिबेद्वारि त्रिमी रोगी न जायते ॥ ( सु . )
तीन गोष्टी स्त्रीधर्मास आवश्यक - १ पतिभक्ति , २ अदुष्टत्व आणि ३ अवाग्दुष्टत्व ( हरिवंश अ ८० )
तीन गोष्टींत संतोष असावा - १ स्वपत्नी , २ भोजन आणि ३ धन . " संतोषस्त्रिषु कर्तव्यः स्वदारे भोजने धने " ( वृ . चा . ७ - ६ )
तीन गोष्टींत संतोष असूं नये - १ ज्ञानसाधना , २ उपासना व ३ दान . " त्रिषु चैव न कर्तव्योऽघ्ययने तपदाययोः " ( वृ . चा . ७ - ४ )
तीन गोष्टींना स्वतंत्र अस्तित्व नसतें - १ व्यापारावांचून वैभव नाहीं , २ वादाशिवाय विद्वत्ता नाहीं आणि ३ सत्तेशिवाय राज्य नाहीं . ( शेखसादी )
तीन गोष्टी तिघांत स्वभावसिद्ध असतात - १ कमलाचा लाल वर्ण , २ सत्पुरुषाचें परोपकारित्व आणि ३ दुष्टाचें निर्दयत्व .
रक्तत्वं कमलानां सत्पुरुषाणां परोपकारित्वम् ।
असतां निर्दयत्वं स्वभावसिद्धस्त्रिषु त्रितयम् ॥ ) ( भर्तृ . नीति १२५ )
तीन गोष्टी क्षणभंगुर - १ यौवन , २ धन आणि ३ जीवित . " यौवनं धनमायुष्यं पद्मिनीजलबिन्दुवत् " ( स्कंद - काशी ८२ - ४३ )
तीन ग्रंथि ( मानवी शरिरांतल्या )- १ रुद्रग्रंथि - मूलाधार चक्राजवळ , २ विष्णुग्रंथि - मणिपूर चक्रजवळ म्हणजे नाभीजवळ व ३ ब्रह्म - ग्रंथि - अनाहत चक्राजवळ म्हणजे ह्र्दयस्थानीं . या तीन ग्रंथि अथवा शक्ति मानव शरीरांत असतात . ( अक्कलकोट स्वामी चरित्र आंणि कार्य )
तीन ग्राम ( गायनशास्त्र )- षडज् , २ मध्यम आणि ३ गांधार . सप्तस्वरांच्या समुदायास ग्राम म्हणतात . यांचीं उत्पत्तिस्थानें अनुक्रमें भूलोक , भुवर्लोक आणि स्वर्ग अथवा मेघलोक हीं आहेत . ( कल्याण - नारद - विष्णु - पुराणांक )
तीन घटक ग्रंथालयाचे - १ ग्रंथ , २ ग्रंथपाल व ३ वाचक . ( ग्रंथालय - शास्त्राचीं पांच सूत्रें )
तीन चांडाळ - १ मद्यपि , २ जुगारी आणि ३ वेश्यागामी . हे तीन सामाजिक जीवनांतले चांडाळ होत .
तीन जीवनम्ल्यें - १ सत्यं , २ शिवं आणि ३ सुंदरम्
तीन ठिकाणीं गंगास्नान दुर्लभ - १ गंगाद्वार , २ प्रयाग आणि ३ गंगासागर .
सर्वत्र सुलभा गङ्रा त्रिषु स्थानेपु दुर्लभा ।
गङ्राद्वारे प्रयागे च गङ्रासागरसंगमें ॥ ( पद्म . क्रिया ३ - १४ )