चार गोष्टींचा परिणाम द्दष्टोत्पत्तीस येत नाहीं - १ अजायुद्ध , २ ऋषिश्राद्ध ( तर्पण ), ३ सकाळचे ढग आणि ४ दांपत्यकलह .
अजायुद्धमृषिश्राद्धं प्रभाते मेघडम्बरम् ।
दंपत्योः क्लह्श्चैव परिणामे न किंचन ॥ ( सु . )
चार गोष्टी बुद्धीचा वाढ करणार्या - १ तीर्थावलोकन , २ सर्वत्र परिचय , ३ द्र्व्यार्जन आणि ४ नाना प्रकारचें निरीक्षण .
चार गोष्टी मनुष्यास बिघडविणार्या - १ यौवन , २ धन , ३ अधिकार आणि ४ अविवेक .
चार गोष्टीःमनुष्याच्या आयुष्यावर परिणाम करणार्या - १ स्त्री , २ पैसा , ३ ईश्वर व ४ नांव ( रुझवेल्टचीं - स्मृतिचित्रें )
चार गोष्टी मिळतांना सुख व सोडतांना दुःख देणार्या - १ अधिकार , २ गर्म , ३ ऋण आणि ४ श्वानमैथुन .
अधिकारं च गर्मं च वित्तं च श्वानमैथुनम ।
आगमे सुखमाप्रोति निर्गमे प्राणसंकटम् ॥ ( सु . )
चार गोष्टी मोक्षाचे दारावरील द्वारपाल - १ शम , २ विचार , ३ संतोष आणि ४ साधुसमागम .
मोक्षद्वारे द्वारपालाश्चत्वारः परिकीर्तिताः !
शमो विचारः संतोषश्चतुर्थः साधुसंगमः ॥ ( यो . वा . २ - ११ - ५५ )
चार गोष्टी योगसिद्धीस सहाय्यक - १ शास्त्र , २ उत्साह , ३ गुरु आणि ४ काल आणि ४ शुत्र .
चार गोष्टींची लहान म्हणून उपेक्षा करूं नये - १ रोग , २ सर्प , ३ अग्रि आणि ४ शत्रु .
चार गोष्टींत लज्जा अथवा भिडस्तपणा असूं नये - १ धान्य - संग्रह , २ विद्यासंपादन , ३ भोजन व ४ व्यवहार .
धनधान्यप्रयोगेषु विद्यासंग्रहणेषु च ।
आहारव्यवहारे च त्यक्तलज्जः सुखी भवेत् ॥ ( चाणक्य - नीतिसार )
चार गोष्टी वर्ज्य - १ आत्मनिंदा , २ आत्मस्तुति , ३ परनिंदा व ४ परस्तुति . या चारहि भल्या मनुष्यास वर्ज्य मानिल्या आहेत .
( म . भा . कर्ण ३६ - ४५ )
चार गोष्टींनी विप्राचा नाश होत असतो - १ वेदध्ययन नसणें , २ आचारधर्माचा त्याग , ३ आळस आणि ४ अन्नदोष . ( मनु )
चार गोष्टी वृथा होत - १ समुद्रावर पर्जन्य , २ भोजन झाल्यानंतर भोजन , ३ समर्थाला दान आणि ४ दिवसा दीप .
वृथा वृष्टिः समुद्रेषु वृथा तृप्तस्य भोजनम् ।
वृथा दानं समर्थस्य वृथा दीपो दिवाऽपि च ( सु . )
चार गोष्टी सद्यःफलदायक - १ देवतांचा संकल्प , २ बुद्धिवानांचा प्रभाव , ३ विद्वानांचा विनय , आणि ४ पापी पुरुषांचा नाश . हे चारी सद्यःफलदायी होतात असें बृहस्पतीनें इंद्रास सांगितलें , अशी कथा आहे .
देवतानां च सङ्कल्पमनुभावं च धीमताम् ।
विनयं कृतविद्यानां विनाशं पापकर्मणाम् ॥ ( म . भा . उ . ३३ - ७२ )
चार गोष्टी स्वार्थ - परमार्थ हे दोन्ही साधणार्या - १ सूर्योदया - पूर्वी स्नान , २ गोसेवा , ३ पुष्पोद्यानांत निवास आणि ४ मातापित्यांची सेवा .
प्रातःस्नानं गवां सेवा आरामः पुष्पवाटिका ।
मातापित्रोश्च शुश्रूषा शास्त्राय च सुखाय च ॥ ( सु . )
चार गोष्टी राष्ट्रोदयास आवश्यक - १ लोकांत एकी , २ धर्म - श्रद्धा , ३ विद्वानांचा मान आणि ४ शक्तिसंपन्नता . ( भक्ति सा . २८ - ४२ )
चार गोष्टी वडिलांच्या सेवेनें वृद्धिंगत होणार्या - १ आयुष्य , २ विद्या , ३ बल व ४ यश ,
अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविनः ।
चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशो बलम् ॥ ( मनु . २ - १२१ )
चार गोष्टी हानिकारक - १ मलिन वस्त्रानें सतेजता कमी होते . २ कुभार्येमुळें घराचा बिघाड , ३ वाईट अन्नानें ओज कमी होणें , आणि ४ कुपुत्रामुळें कुलाला कलंक .
कुवस्त्रं हरते तेजः कुभार्या हरते गृहम् ।
कुभोज्यं हरते बीजं कुपुत्रो हरते कुलम् ॥ ( सु . )
चार गृहसौख्यें - १ स्वतःचें व कुटुंबियांचें आरोग्य , २ सुशील व सुद्दढ पत्नि , ३ खेळकर व दणकट संतति आणि ४ आवश्यक तितकें धन .
चार चक्रें - १ धर्मचक्र , २ कालचक्र , ३ विष्णुचक्र आणि ४ इंद्र - चक्र अशीं चार चक्रें ( अस्त्रें ) श्रीरामास विश्वामित्राकडून प्राप्त झालीं होतीं अशी कथा आहे . ( वा . रा . बालकांड )
चार चरण ( धर्माचे )- १ आत्मज्ञान , २ अध्यात्मचिंतन , ३ मनोविजय ( मनःस्थिरत्व ) आणि ४ इंद्रियनिग्रह .
’ चतुष्पादा हि धर्मस्य ज्ञानं ध्यानं शमो दमः ॥ ’
चार जाती ( पुरुषांच्या )- १ मृग , २ शश - ससा , ३ वृषभ आणि ४ गर्दम ( अनंगरंग - कामशास्त्र )
चार जाती स्त्रियांच्या - १ पद्मिनी , २ चित्रिणी , ३ हस्तिनी व ४ शंखिनी .
चार दानें सर्वश्रेष्ठ - १ कन्यादान , २ गोदान , ३ भूदान व ४ विद्यादान ,
दानानां च समस्तानां चत्वार्येतानि भूतले ।
श्रेष्ठानि कन्याभूमिविद्यादानानि सर्वदा ॥ ( सि . शि .
चार दुर्गुण विनाशाप्रत नेणारे - १ आळस , २ निद्रा , ३ विस - राळूपणा व ४ दिंरगाई . ( कुरल )
चार द्वारांचे चार दिक्पाल ( मनुष्यदेहाचे )- १ पूर्वद्वारा - मुख , २ पाश्चिमद्वार - गुदा , ३ उत्तर - मस्तकांत आणि ४ दक्षिणद्वार - शिश्न . पूर्व आणि पश्चिमद्वारांचा संबंध अन्ननलिकेशीं आणि दक्षिण आणि उत्तर द्वारांचा संबंध मज्जातंतूशीं आहे . ( अथर्व - अनु . मराठी भाग २ रा )
चार धनदायाद - १ धर्म , २ अग्नि , ३ चोर आणि ४ राजा अथवा शासनाधिकारी .
’ चत्वारो धनदायादा धर्माग्निनृपतस्कराः ॥ ’ ( स . )
चार धर्मलक्षणें - १ वेद , २ स्मृति , ३ सदाचार शिष्टाचार ) आणि ४ ( शास्त्रानें विकल्प सांगितला असेल तेथें ) जो पक्ष आपणांस प्रिय असेल तो .
वेदः स्मृतिः सदाचारः स्वस्य च प्रियमात्मनः ।
एतच्चतुर्विधं प्राहुः साक्षाद्धर्मस्य लक्षणम् ॥ ( मनु २ - १२ )
चार धर्मांतील चार सर्वश्रेष्ठ देवस्थानें - १ हिंदु ( वैदिक )- काशी - श्रीविश्वेश्वर , २ बौद्ध - बुद्धगया - बोधिवृक्षाचें स्थान , ३ मुसलमान - मक्का - काबा , ४ खिरस्ती - जेरुसलेम - ख्रिरस्ताची जन्मभूमि .
चार धामें - ( अ ) १ उत्तरेस - केदारनाथ , २ दक्षिणेस - रामेश्वर ( हीं शिवाधाम्रें ), ३ पूर्वेस - जगन्नथ व पश्चिमेस द्वारका हीं भारतांतलीं पवित्र देव - स्थानें . ( आ ) १ गंगोत्री , २ जम्नोत्री , ३ बदरी आणि ४ केदार ( हिमालयांत ).
चार नरकद्वारें - १ काम , २ लोभ , ३ क्रोध आणि ४ दंभ . ’ कामो लोभस्तथा क्रोधो दंभश्चत्वार इत्यमी ! । ’ ( ग . गी . १० - २३ )
चार नैसर्गिक शक्ति ( मानवाच्या )- १ मन , २ प्राण , ३ संकल्पात्मक बुद्धि आणि ४ वाक् ( योगशास्त्र ).
चार पण - १ अज्ञानी बालपण , २ धुंद तरुणपण , ३ पराधीन म्हातारपन व ४ बाळंतपण . पहिले तीन पुरुषांना व त्याखेरीज चवथा स्त्रियांना असे चार पण आयुष्यांत जिंकावयाचे असतात . ( भा . मर्दनशास्त्र )
चार पदार्थ स्वतंत्र व अनादि - १ जीव , २ देवता , ३ प्रपंच व ४ ईश्वर असे महानुभाव संप्रदायांत मान्ले आहेत . ( भा . दर्शनसंग्रह )
चार परम विख्यात धर्मोपदेशक - १ श्रीकृष्ण , २ बुद्ध , ३ येशू आणि ४ अहंमद . असे चार धर्माचे उपदेशक आजपर्यंत जगतांत होऊन गेले . ( म . भा . उपसंहार )
चार परिमाणें विश्वाचीं ( आधुनिक विज्ञान )- १ लांबी , २ रुंदी , ३ उंची व ४ काल . ’ लांबी रुंदी , उंची तीन । काल हें चवथें परिमाण । मानितें नव - विज्ञान । विश्व चतुःपरिमाणात्मक ॥ ( विश्वदर्शन - नासदीय नीरांजन )
चार परब्रह्माचीं प्रतीकें - १ आकाश , २ सागर , ३ सूर्य आणि ४ नगाधिराज हिमालय .
चार पायर्या परमार्थसाधनेच्या - १ श्रवण , २ मनन , ३ निदिध्यासन व ४ साक्षात्कार .
" द्र्ष्टव्यः श्रोतव्यः मन्तव्यः निदिध्यासितव्यः " ( बृहदारण्यकोपनिषद् )
चार पार्वतीच्या सख्या - १ जया , २ विजया , ३ जयंती आणि ४ मंगलारुणा . ( स्कंद . चातु . २१ - २३ )
चार पुण्यश्लोक - १ नल , २ युधिष्ठिर , ३ जनक , आणि ४ जनार्दन ( परमेश्वर ). हे चार पवित्र कीतींचे पुरुष म्हणून सांगितले आहेत .
पुण्यश्लोको नलो राजा पुण्यश्लोको युधिष्ठिरः ॥
पुण्यश्लोको विदेहश्च पुण्यश्लोको जनार्दनः ॥ ( पद्म . सृष्टि )
चार पैगंबर - १ दाऊद , २ महम्मद , ३ ईसा व ४ मूसा . असे चार पैगंबर मुसलमानांत मानिले आहेत . ( तत्त्व - निज - विवेक )
चार प्रकार ( अभिनयाचे )- १ सात्त्वि , २ आंगिक , ३ वाचिक आणि ४ आहार्य . ( भ . ना . ६ - २४ )
चार प्रकार अनध्ययाचे - १ नित्य अनध्याय , २ नैमित्तिक अनध्याय , ३ तात्कलिक व ४ आकालिक अनध्याय ( संस्कृति कोश )
चार प्रकार आकाशाचे - १ घटाकाश , २ जलाकाश , ३ मेघाकाश व ४ महाकाश विचार - सा . रहस्य )
चार प्रकार अवघूताचे - १ ब्रह्मावधूत , २ शैवावधूत , ३ वीरावधूत व ४ कुलावधूत ( ब्रह्मनिर्वाणतंत्र )
चार प्रकार अवतारांचे - १ पुरुषावतार , २ गुणावतार , ३ लिलावतार ( कल्पावतार ) आणि ४ मन्वंतरावतार ( कल्यान मासिक ).
चार प्रकार आनंदाचे - १ शारीरिक , २ मानसिक , ३ बैद्धिक आणि ४ आत्मिक .
चार प्रकार ( कुस्तीचे )- १ भीमसेनी ( शक्तिचे डाव ), २ हनुमन्ती ( युत्कीचे डाव ), ३ जांबुवन्ती ( बांधाचे डाव ) आणि ४ जरासन्धी
( नेस्या - हातपाय मोडण्याचे ). ( व्या . को . )
चार प्रकारचे आचार शाक्तपंथाचे - १ वामाचार , २ दक्षिणाचार , ३ सिद्धान्ताचार व ४ कौलाचार . ( भा . दर्शनसंग्रह )
चार प्रकार उपासनेचे - ( अ ) १ प्रणवोपासना , २ सामोपासना , ३ अक्षिपुरुषोपासना व ४ दहरोपासना ( हरिपाठ रहस्य ). ( आ ) १ सम्पत् उपासना , २ आरोप उपासना , ३ अध्यास उपासना व ४ संवर्ग उपासना . " सम्पदारोपसंवर्गाध्यासा इति मनीषिभिः "
( शिवगीता १२ - १० )