एकोणीस नांवें गंगेची - १ गंगा , २ त्रिपथगा , ३ भागीरथी , ४ त्रिदशदीर्घिका , ५ त्रिस्त्रोता , ६ जाह्लवी , ७ मंदाकिनी , ८ भीष्मजननी ९ सरिद्वरा , १० विष्णुपदी , ११ सिद्धगा , १२ स्वर्गा , १३ स्वर्गंगा , १४ खगा , १५ आपगा , १६ ऋषिकुल्या , १७ हैमवती , १८ सर्वापि आणि १९ हरशेखरा . ( हेमचंद्रकोश )
एकोणीस धन संपादनाचे कामीं साहाय्यक सदगुण - १ शास्त्र , २ बुद्धि , ३ धैर्य , ४ दक्षता , ५ प्रगल्मता , ६ धारणाशक्ति , ७ उत्साह , ८ वक्तृत्व , ९ औदार्य , १० संकटकालीं सहनशीलता , ११ तेज , १२ पावित्र्य , १३ मित्रत्व , १४ त्याग , १५ सत्य , १६ कृतज्ञता , १७ कुलं , १८ शील आणि १९ हेम .
शास्त्रं प्रज्ञा घृतिर्दाक्ष्यं प्रागल्म्यं धारयिष्णुता ।
उत्साहो वाग्मितौदार्यमापत्कालसहिष्णुता ॥
प्रभावः शुचिता मैत्री त्यागः सत्यं कृतज्ञता ।
कुलं शीलं दमश्चेति गुणा सम्पत्तिहेतवःअ । \ ( अग्नि . २३ - ५ )
एकोणीस प्राचीन संगीत शास्त्रवेत्ते - १ शिव , २ गौरी , ३ ब्रह्मा , ४ माधव , ५ नंदिकेश्वर , ६ दंतिल , ७ कहोल , ८ रावण , ९ हनुमान् , १० याज्ञ्वल्क्य , १६ गणेश , १२ नारद , १३ तुंबर , १४ हाहा . १५ हूहू , १६ षण्मुख , १७ बृहस्पति , १८ अर्जुन आणि १९ बाणासुरकन्या उषा .
( संगीतरत्नाकर )
एकोणीस प्रकारच्या वीणा - १ कच्छपी . २ कुब्जिका , ३ चित्रा , ४ वहन्ती , ५ परिवाहिनी , ६ जया , ७ घोषवती , ८ ज्येष्ठा , ९ नकुली , १० महती , ११ वैष्णवी , १२ ब्राह्मी , १३ रौद्री , १४ कूर्मी , १५ रावणी , १६ सरस्वती १७ किन्नरी १८ सैरंघ्री व १९ घोषका . ( संगीत मकरंद )