मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संख्या ४०

संकेत कोश - संख्या ४०

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


चाळीस प्रकारचा काळा बाजार - १ अगोदरची रक्कम मागून मांडणें , २ कांहीं काळानें वसूल करावयाचा तो आजच मांडून टाकणें ३ वसूल होण्यासारखा असून न करणें , ४ वसूल करावयास नको तें करणें , ५ झालेला वसूल न मांडणें , ६ झालेला वसूल न दाखविणें , ७ थोडा असेल तो पुष्कळ दाखविणें , ८ पुष्कळ असेल तो थोडा दाखविणें , ९ एका सदराखालील वसूल भलत्या सदरांत दाखविणें , १० एकाकडून आलेला दुसर्‍याचे नांवावर दाखविणें , ११ देणें तें न देणें , १२ द्यावयास नको तें देणें , १३ जेव्हां द्यावयास पाहिजे तेव्हां न देणें , १४ जेव्हां द्यावयास नको असते तेव्हां देणें , १५ थोडें देऊन पुष्कळ दिलें असें दाखविणें , १६ पुष्कळ देऊन थोडें दाखविणें , १७ एक वस्तूऐवजीं दुसरीच देणें , १८ एकाचे दुसर्‍यास देणें , १९ भरणा न करणें , २० भरणा व करतां केला असें दाखविणें , २१ किंमत आली नाहीं असा कच्चा माल नोंदून टाकणें , २२ वसूल झालेली नोंद न करणें , २३ ठोक वसूल होण्यासारखा हप्त्यानें वसूल करणें , २४ हप्त्यानें द्यावयाचें तें एकदम वसूल करणें , २५ हलकी वस्तु देऊन भारी किंमतीची घेणें , २६ भारी किंमत , देऊन हलकी वस्तु घेणें , २७ किंमती वाढविणें , २८ किंमती उतरविणें , २९ दिवस वाढविणें , ३० दिवस कमी करणें , ३१ वर्ष व वर्षांतील महिने यांतील मेळ घालवून टाकणें , ३२ महिना व महिन्यांतील दिवस यांतील मेळ नाहींसा करणें , ३३ गैरहजर मनुष्याची मजुरी काढून घेणें , ३४ उत्पन्नाचे सदरांत विरोध दाखविणें , ३५ धर्मादायांत लबाडी , ३६ तयार झालेल्या कामांत लबाडी करणें ३७ रक्कम अथवा माल यांत लबाडी , ३८ सोन्यारुप्यांत लबाडी , ३९ सवलती देतांना लुच्चेगिरी , ४० वजनमापांत फसविणें , असे चाळीस प्रकारचे काळा बाजार कौटिल्य अर्थशास्त्रांत नमूद आहेत . ( कौटिल्य अर्थशास्त्र अधि . २ अ . २९ )

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP