पंचम स्वर - १ नाभि , २ छाती , ३ ह्रदय , ४ कंठ व ५ मूर्धा . या शरिराच्या पांच स्थानांच्या वायूपासून निघालेला स्वर
पंचामरा - १ दूर्वा , २ भांग , ३ वेल , ४ निर्गुडी व ५ तुळस . ह्या पांच पवित्र वनस्पति . ( वज्रकोश )
पंचामृत - ( अ ) १ गाईचें दूध , २ दहीं , ३ तूप , ४ मध व ५ साखर . या पांच अमृततुल्य पदार्थांना पंचामृत म्हणतात , यानें देवमूर्तीला अभिषेक करतात ; ( आ ) १ सुंठ , २ मुसळी , ३ गुळवेल , ४ शतावरी आणि ५ गोंखरू , हें औषधी पंचामृत अथवा वनस्पति पंचामृत ( शा . नि ); ( इ ) १ चिंच , २ गूळ , ३ मीठ , ४ मिरची व ५ तीळ . या पांच पदार्थांच्या भिश्रणानें केलेला पदार्थ ( भोजनांतील ); ( ई ) १ नारळ , २ आंबा , ३ फणस व ४ केळीं या चारीपैकीं कोणतींहि तीन व ४ साखर व ५ मध . या पांचांचें एक पंचामृत प्राचीनकालीं करीत असत .
नालिकेराप्रपनसकदालीनां फलत्रयम् ।
शर्करा मधुसंयुक्तं पञ्चामृतमितीरितम् ॥ ( बौ . गृह्मसूत्र )
पंचामृतयूष - १ कुळीथ , २ मूग , ३ तूर , ४ उडीद आणि ५ राजशिंबी या पांच धान्यांचें कढण .
पंचायतीचे पांच गुण - पांच सदस्य असलेल्या समितीस पंचायत म्हणतात . या सदस्यांचे अंगीं १ प्रेम , २ निर्मयता . ३ ज्ञान , ४ उद्योग व ५ स्वच्छता . हे पांचगुण अभिप्रेत आहेत किंवा असावेत असें मानलें आहे . ( आ . मंदिर ऑगस्ट १९६२ )
पंचायतन - १ शिव , २ विष्णु , ३ सूर्य , ४ गणपति व ५ देवी . या पांच देवतांचा समुदाय . या पांचांपैकीं प्रत्येक देवतेस प्राधान्य देऊन शिव , विष्णु इ . चीं पांच पंचायतनें मानण्याची प्रथा आहे .
आदित्यं गणनाथं च देवीं रुद्रं च केशवम् ।
पंचदैवतमित्युक्तं सर्वकार्येषु पूजयेत् ॥ ( सु . )
या पंचायतनकल्पनेचा उगम श्रीशंकराचार्यांच्या कालापासून झाला व ती त्यांस पृथ्वी , आप , तेज , वायु व आकाश या सृष्टींतल्या पंचतत्त्वांवरून सुचली म्हणतात .
पंचारति - १ दीप . २ कमल . ३ वस्त्र , ४ आम्रफल व ५ सुपारी . हीं एकत्रपणें ओवाळणें .
पंचावयव - १ प्रतिज्ञार्या पर्वतावर अग्नि आहे , २ हेतु - कारण तेथें धूर आहे , ३ उदाहरण - धॄर असतो तेथें अग्नि असतो . जसें स्वयंपाक घर , ४ उपनयर्या पर्वतावर अग्नीस कधींहि सोडून न राहणारा धूरा आहे आणि ५ निगमन - म्हणून या पर्वतावर अग्नि आहे . हे वाक्याचे पांच अवयव अथवा सिद्धान्ताचे भाग न्यायशास्त्रांत सांगितले आहेत .
पंचाक्षरी मंत्र - ( अ ) ’ नमः शिवाय ’. १ नकार - पृथ्वीतत्त्व , २ मकार - उदकतत्त्व , ३ शिकार - अग्नितत्त्व , ४ वकार - वायुतत्त्व आणि ५ यकार - आकाशतत्त्व , हीं पांच बीजाक्षरें पांच तत्त्वें आहेत . ( वी . प्र . अ . ८ ); ( आ ) ’ ॐ नमः सिद्धं ’ हा वावप्रचार जैन मताचा आहे , याचा अर्थ सिद्धांस नमस्कार . याचेंच मराठी अपभ्रष्ट रूप म्हणजे ओ - ना - मा - सी - धं असें आहे .
पंचाक्षरी यमक - आर्येच्या प्रत्येक चरणांत पांच अक्षरांचे यमक ( समान अक्षरांची पुनरावृत्ति ) साधलें आहे . असें . उदा० -
गांधारि म्हणे तज्जय कां ? त्या आहेत काय बा ? सिंगें ?
कीतिंवर म्हणुनि विधिनें बांधियली त्यांसि काय बासिंगें ? ॥ ( मो . आ . उद्योग ५ - ५० )
पंचोपचार - ( अ ) १ गंध , २ पुष्प , ३ धूप ४ दीप , ४ नैवेद्य हे पंचोपचार होत . या पंचोपचारांनीं केलेल्या देवपूजेस पंचोपचार पूजा म्हणतात ; ( आ ) १ घ्यान , २ आवाहन , ४ नैवेद्य , ४ नीरांजन व ५ नमस्कार . ( जाबालि )
पांच अंगें ( आन्तरपूजनाचीं )- १ जप , २ होम , ३ तर्पण , ४ मार्जन आणि ६ अन्नसंतर्पण .
पांच अंगें ( बाह्य पूजनाचीं )- १ पटल , २ पद्धति , ३ वर्म , ४ स्तोत्र आणि ५ नमस्कार . ( कल्याण शाक्ति अंक )
पांच अंगें ( राजनीनीचीं )- १ कार्यारंभ , २ माणसे आणि द्र्व्य यांचा पुरवठा , ३ देशकालाची अनुकूलता , ४ संकटांचा प्रतिकार व ५ कार्यसिद्धि . ( स . को . )
पांच अंगें ( विवाहाचीं )- १ वाग्दान , २ प्रदान - वधूला वस्त्रालंकार देणें , ३ वरण - लग्नास सर्वांनीं संमति देणें , ४ पाणिपीडन - वरानें बधूचें पाणिग्रहण करणें आणि ५ सप्तपदी . ( जैनधर्म )
पांच अंगें ( वेदाचीं )- १ विधि , २ अर्थवाद , ३ मंत्र , ४ स्मृति व ५ नामधेय . अशीं पांच अंगें .
पांच अवयव ( शास्त्राचे )- १ विषय , २ संदेह , ३ संगति , ४ पूर्व पक्ष आणि ५ सिद्धांत .
पांच अवस्था ( चित्ताच्या )- १ क्षिप्त , २ मूढ , ३ विक्षिप्त , ४ एकाग्र व ५ निरुद्ध . ( योगशास्त्र )
पांच अवस्था ( जीवाच्या )- १ जाग्रत , २ स्वप्र , ३ सुषुप्ति ४ मूर्च्छा व ५ मरण ( भारतीय दर्शन संग्रह )
पांच अवस्था परमात्म्याचा साक्षात्कार होण्याच्या - १ अज्ञानावस्था , २ भोगावस्था , ३ त्यागावस्था , ४ भक्तावस्था व ५ स्वरूपावस्था . ( अथर्व - अनु . मराठी )
पंच अवस्था ( मनुष्यजीवनाच्या )- ( अ ) १ कौमार , २ पौगंड , ३ कैशोर , ४ यौवन आणि ५ वार्धक्य . ( आ ) १ पुत्र , २ बंधु . ३ पति , ४ पिता आणि ५ पितामह .
पांच अवस्था ( स्त्रीजीवनाच्या )- १ कन्या , २ भगिनी , ३ पत्नी , ४ माता आणि ५ ५ पितामही .
पांच आचार्य ( वैदिक धर्माचे )- १ श्रीशंकराचार्य , २ श्रीरामानुजाचार्य , ३ श्रीनिंबार्क , ४ श्रीमध्वाचार्य व ५ श्रीवव्ल्लभाचार्य .
जगद्गुरुनीं अध्यात्म कथिलें । यांनी उपासनेला जीवविलें ।
एवंच पांचानींही केलें । वैदिक धर्माचें संरक्षण ॥ ( शंकराचार्य च . ३७ - २००० )
पांच आशास्थानें मानवाचीं - १ जीवित , २ कांता , ३ अपल्य , ४ मानसन्मान आणि ५ संपत्ति .
पांच आध्यात्मिक भावना - १ आश्चर्य , २ ओजस् , ३ आनंद , ४ भीति आणि ५ आदर . ( भ . गी . सा . दर्शन )
पांच आयुष्यवर्धनास उपाय - १ भूमीवर शय्या , २ दोन वेळां जेवण , ३ सहा वेळां लघुशंका , ४ तीन वेळां शौचास जाणें आणि ५ स्त्रीसंग अल्प प्रमाणांत .
पांच आज्ञा ( श्रीकृष्णाच्या )- १ उद्धरेदात्मनात्मानम् - आपण होऊन आपला उद्धार करावा .
२ . आत्मैव ह्यात्मनो बंधुः - आपणच आपला बंहु किंवा आपणच आपला शुत्र ;
३ . कर्मण्येवाधिकारस्ते - कर्म करण्य़ापुरताच तुझा अधिकार आहे ;
४ . स्वधर्मे निधनं श्रेयः स्वधर्माप्रमाणें मरण आलें तरी त्यांत कल्यान आहे ;
५ . श्रद्धामयोऽयं पुरुषः - मनुष्य हा श्रद्धामय आहे . ( भ . गी . )
पांच आज्ञा ( बुद्धाच्या )- १ अहिंसा , २ सत्य , ३ अस्तेय , ४ अव्यभिचार आणि ५ अपेयपान न करणें .
पांच आज्ञा ( वैदिक धर्माच्या )- १ यज्ञ , २ दान , ३ तप , ४ कर्म आणि ५ स्वाध्याय .
पांच आज्ञा ( महंमदाच्या )- १ शुचित्व , २ निराहार , ३ दान , ४ उपासना व ५ तीर्थयात्रा .
पांच कन्नड महाकवि - १ पंपा , २ रन्न , ३ पोन्न , ४ नागवर्म आणि ५ चामुंडराय ,
पांच कन्नड महाकाव्यें - १ पंपभारत , २ आदि पुराण , ३ शांति पुराण , ४ गदायुद्ध आणि ५ कर्नाटक कादंबरी .
पांच कर्तव्यें राजांची ( राजशासकांचीं )- १ दुष्टांना दंड , २ सज्जनांचा परामर्श , ३ न्यायानें कोश समृद्धि , ४ धनिकांविषयीं निःपक्षपात आणि ५ राष्ट्राचें संरक्षण ,
दुष्टस्य दंडः सुजनस्य पूजा । न्यायेन कोशस्य च संप्रवृद्धिः ।
अपक्षपातोऽर्थिषु राष्ट्र्रक्षा । पञ्चैव यज्ञाः कथिता नृपाणाम् ॥ ( अत्रिसंहिता )
पांच कल्प ( भाग ) अथर्ववेदाचे - १ नक्षत्र कल्य , २ वेदकल्प , ३ संहिता कल्प , ४ आंगिरस कल्प व ५ शांति कल्प . ( विष्णु - अंशा ३ - १४ )
पांच कार्यें ईशसत्तेचीं ( जगतूसंबंधीं )- १ सृष्टि - पृथ्वीतत्त्व , २ स्थिति अथवा पालन - जलतत्त्व , ३ संहार - अग्नितत्त्व , ४ तिरोभाव - वायुतत्त्व आणि ५ अनुग्रह - आकाशतत्त्व . ( शिव . पु . विद्येश्वर सं . अ . १० )
पांच कार्यक्षेत्रें ( जीवात्म्याचीं )- १ कर्मेंद्रियें , २ ज्ञानेंद्रियें , ३ मन , ४ चित्त आणि ५ बुद्धि ( अथर्व - अनु मराठी )
पांच कारणें ( स्वकर्मांच्या सिद्धिस आवश्यक )- १ अधिष्ठान ( क्षेत्र ), २ कर्ता , ३ साधन , ४ प्रयत्न आणि ५ दैव . ( भ . गी . १८ . १४ )
पांच कायिक दोषा - १ एखाद्याला पीडा - मारपीट करणें , २ व्यभिचार , ३ एखाद्याची वस्तु चोरून घेणें , ४ उगीच ताठयानें चालणें आणि अपवित्र राहणें , व ५ व्यर्थ कुचेष्टा करणें .
पांच कृत्यें परमेश्वरी सत्तेचीं - १ सृष्टि , २ स्थिति , ३ संहार , ४ अनुग्रह आणि ५ विलय . ( श्रीशैवागम आणि ज्ञानेश्वर )
पांच गीतेचे प्रधान भाष्यकार - १ श्रीशंकराचार्य , २ श्रीरामा - नुजाचार्य , ३ श्रीमध्वाचार्य , ४ श्रीवल्लभाचार्य आणि ५ श्रीज्ञानेश्वरमहाराज . सहावे लो . टिळक होत .
पांच गुजराती संत कवि - १ नरसीमेहता , २ मीराबाई , ३ प्रेमानंद , ४ अखोमगत व ५ दयाराम . ( गुजरात ) ( आ ) १ मीराबाई , २ नरसी मेहता , ३ भालन , ४ भीम व ५ पद्मनाभ . ( म . ज्ञा . को . वि . १२ )
पांच गुण कवीच्या अंगीं असावेत - १ क्रांतदशीं , २ मनीषी - मन आधीन अललेला , ३ परिभूःसर्वांना व्यापून असणारा , ४ स्वयंभूःस्वतंत्रवृत्ति व ५ शाश्वतकाल पुरेल इतकी सामग्री यथायोग्यपणें मिळविलेला असा .
कविर्मनीषी परिभूः स्वयम्भूर्याथातथ्यतः ।
अर्थान् व्यदधाच्छाश्वतीभ्यः समाभ्यः ॥ ( ईशावास्योपनिषद् )
पांच गुण चित्राचे - १ रेखामाधुर्य , २ प्रमाण , ३ साद्दश्य , ४ पार्श्चभूमीची सजावट व ५ सजीवपणा . ( कला - कलातंत्र आस्वाद . )
पांच गुण दानासंबंधीं - १ सहानुभूति उत्पन्न होणें , २ सद्नदित होणें ३ आदर , ४ प्रिय भाषण व ५ दिल्यानंतर समाधान वाटणें .
आनंदाश्रूणि रोमाणि बहुमानं प्रियं वचः ।
किञ्चानुमोदनं दानं दानभूषणपंचकम् ॥ ( दानशासनम् )