मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संख्या ७

संकेत कोश - संख्या ७

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


सप्तर्षि - ( अ ) प्रत्येक मन्वन्तरांतील सात ब्रह्मर्षि . चालू वैवस्वत मन्वन्तरांतील सप्तर्षिः १ कश्यप . २ अत्रि . ३ भरद्वाज , ४ विश्चामित्र , ५ गौतम , ६ जमदग्नि आणि ७ वसिष्ठ .

( आ ) प्राचीन ऋषींपैकीं जे महर्षि विशेष प्रसिद्धीस आले त्यांचीं नांवें चिरस्मरणीय व्हावींत म्हणून उत्तरेकडील धरुवनक्षत्राभोंवतीं प्रदक्षिणा घालणार्‍या तारकासमूहांतील सात तेजस्वी तार्‍यांस दिलीं तीं अशीं - १ मरीचि , २ अत्रि , ३ अंगिरस , ४ पुलस्त्य , ५ पुलह , ६ क्रतु व ७ वसिष्ठ . यांत वसिष्ठांजवळच्या लहान तार्‍यास अरुंधती असें नांव दिलें आहे . हे चित्रशिखंडी नांवाचे सप्तर्षि होत . यांनी आपल्या सातमुखांनीं लोकधर्म सांगितला ( म . भा . शांति . अ . ३३५ ). या तारका समूहासच वृहद्‌‍दक्ष किंवव खाटलें बाजलें म्हणताच . यांतच वसिष्ठाच्या तार्‍याजवळ एक लहान तेजस्वी दिसतो , तारा दिसतो , त्यास अरुंधती म्हणतात . वैदिक विवाहपद्धतींत अरुंधतीदर्शन म्हणून सप्तपदीनंतरचा एकविधि , यावेळी वधूला अरुंधती नक्षत्र दाखवून तूं अरुंधतीसारखी पतिनिष्ठ हो असें सांगावयाचें असतें .

कश्यपोऽत्रिर्मरद्वाजो विश्वामित्रोऽथ गौतमः ।

जमदग्निर्वसिष्ठश्च सप्तैते ऋषयः स्मृताः ॥ ( भाग - १३ - ८ - ५ )

( इ ) दोन डोळे , दोन कान , दोन नासिका - छिद्रें व एक मुख - वाणीचें इंद्रिय . हे मस्तकावर असलेले सात ऋषि होत . ज्ञान घेणें व ज्ञान देणें हें कार्य अखंड चालू असतें . ( वैदिक तत्त्वज्ञान )

( इ ) ( शरीरांतील ) १ नाक , २ जिव्हा , ३ डोळे , ४ त्वचा , ५ कान , ६ वाणी आणि ७ मन .

( उ ) १ आत्मा , २ बुद्धि , ३ अहंकार , ४ मन , ५ प्राण , ६ ज्ञानेद्रियें व ७ कर्मेंद्रियें . प्रत्येक शरीरांत हे सप्तऋषि आहेत आणि ते शरीररूपी घराचें रक्षण करितात .

" सप्तऋषः प्रतिहिताः शरीरे " ( वा . यजु . ३४ - ५५ )

सप्त अवस्था - १ अज्ञान , २ आवरण , ३ विक्षेप , ४ परोक्षज्ञान , २ अपरोक्षज्ञान , ६ शोकमंग आणि ७ निरंकुशा तृप्ति ( म . वा . को . )

सप्त अधिकारी ( पंचागांत )- १ राजा , २ मंत्री , ३ न्यायाधिपति , ४ मेघेश , ५ रसाधिपति , ६ अग्रधान्येश आणि ७ पश्चाद्धान्येश .

सप्त अप्सरा - १ रंमा , २ घृताची , ३ मेनका , ४ तिलोत्तमा , ५ मंजुघोषा , ६ ऊर्वशी आणि ७ सुकेशी .

घृताची मेनका रंमा ऊर्वशी च तिलोत्तमा ।

सुकेशी मंजुघोषाद्याः कथ्यन्तेऽप्सरसो बुधैः ॥ ( सु . ।

सप्त अनल - १ कालानल , २ क्रव्यानल - दिशाहुत अग्नि ,, ३ वडवानल - समुद्रांतील , ४ सह्स्त्रानल - सूर्यांतील अग्नि , ५ विशानल - शेषमुखांतील , ६ भुवानल - पृथ्वीगर्मांतील आणि ७ हारानल - शिवाचे तृतीय नेत्रांतील अग्नि . असे सात प्रकारचे अग्नि आहेत . ( दु . श . को . )

सप्त अरण्यें - १ दंडकारण्य , २ खंडारण्य़ , ३ चंपकारण्य , ४ वेदारण्य ५ नैमिषारण्य , ६ ब्रह्मारण्य आणि ७ धर्मारण्य .

( भा . रा . किष्किंधा . १४ - २२ ).

सप्त आशय - १ वाताशय , २ पित्ताशय , ३ श्लोष्माशय , ४ रक्ताशय , ५ आमाशय , ६ पक्काशय व ७ मूत्राशय . मानवी शरीरांत सात आशय आहेत . पण स्त्रियांनाच असणारा गर्माशय हा एक अधिक आशय आहे . ( सुश्रुत शारीर . ५ - ८ )

सप्त उपचार - १ पाचन , २ रेचन , ३ स्वेदन , ४ शमन , ५ मोहन , ६ स्तंभन आणि ७ मर्दन ( म . वा . को . )

सप्त उपधातु ( रसायनशास्त्र )- १ सुवर्णमाक्षिक , २ मोरचूद , ३ अभ्रक , ४ सुर्मा , ५ मनशीळ , ६ हरताळ आणि ७ कलखापरी . ( रसायनसंग्रह )

सप्त उपधातु ( शरीरांतील )- १ स्तन्य , २ आर्तव , ३ वसा , ४ घाम , ५ दांत , ६ केस आणि ७ ओज . हे शरिरांतील सप्तधातूंचे सात उपधातु होत . ( भावप्रकाश )

सप्त उपरत्नें - १ वैक्रांत , २ सूर्यकांत , ३ चंद्रकांत , ४ राजावर्त , ५ लाल , ६ पेरोज आणि ७ स्फटिक .

सप्तोपरत्नगणिता मणयो लोकविश्रुताः ॥ ( शा . नि . )

सप्त उपविषें - १ रुईचा चीक , २ त्रिधारी निवडुंगाचा चीक , ३ कळलावी , ४ कण्हेर ५ गुंज , ६ अफू व ७ धोतरा . हीं उपविषें होत .

सप्त ऋषींची सात प्रकारची रोगचिकित्सा - १ पापराहित्य - गौतम , ४ मानसचिकित्सा - अत्रि , ५ प्रार्थनाचिकित्सा - विश्वाभित्र , ६ जल - चिकित्सा - जमदग्नि आणि ७ स्पर्शचिकित्सा - वसिष्ठ , अशी सप्तऋषींची सात प्रकारची रोगचिकित्सा प्राचीन काळीं केली जात असे . ( ऋग्वेद ८४ वा अनुवाक )

सप्त कला ( शरीरांतील )- १ मांसधरा , २ रक्तधरा , २ मेदोधरा , ४ कफधरा , ५ पुरिषधरा , ६ पित्तधरा व ७ रेतोधरा . शरिरावर त्वचेचीं आवरणें सात असतात . तशा कलहि सात आहेत . ( सुश्रुत शारीर . अ . ४ )

सप्त कांडें ( रामायनाचीं )- १ बालकांड , २ अयोध्याकांड , ३ अरण्यकांड , ४ किष्किंधाकांड , ५ सुंदरकांड , ६ युद्धकांड व ७ उत्तरकांड . अशीं रामायणाचीं सात कांडें आहेत .

सप्त कीर्तिलक्षणें - १ दान , २ पुण्य , ३ विद्या , ४ वक्तृत्व , ५ काव्य , ६ आर्जव व ४ शौर्य .

सप्त कुलाचल - ( अ ) १ हिमवान ‌‍, २ गंधमादन , ३ नैषध , ४ विंध्य , ५ माल्यवान् ‌‍ , ६ पारियात्रिक व ७ हेमकूट ; ( आ ) १ महेन्द्र , २ मलय , ३ सह्म , ४ शुक्तिमान ‌‍ , ५ ऋक्ष पर्वत , ६ विंध्य व ७ पारियात्र .

महेंद्रो मलयः सह्मः शुक्तिमानृक्षवानपि ।

विंध्यश्च पारियात्रश्च सप्तैते कुलपर्वताः ॥ ( म . भा . भीष्म ९ - ११ )

सप्त कृतिका - सात तार्‍यांचा एक मोठा नक्षत्र पुंज त्यांचीं नांवें :- १ अंबा , २ दुला , ३ नितत्नी , ४ अभ्रयंती , ५ मेघयंती , ६ वर्षयंती आणि ७ चुपुणिका . ( ज्योतिष )

सप्त गीता - १ श्रीमद्भगवद्नीता , २ रामगीता , ३ गणेशगीता , ४ शिवगीता , ५ देवीगीता , ६ कपिलगीता आणि ७ अष्टावक्रगीता . अनेक गीतांतील या सात मुख्य गीता मानिल्या आहेत .

सप्त गोदावरी - गोदावरी नदी सात मुखांनीं समुद्रास मिळते . त्या सात प्रवाहांचीं नांवें :- १ गोदावरी - वसिष्ठ कोटिलिंगस्थान

( राजमहेंद्रीजवळ ) २ कौशिका , ३ गौतमी , ४ वृद्धगौतमी , ५ भारद्वाज , ६ आत्रेया आणि ७ तूर्या . यांना सप्त गोदावरी अशी संज्ञा आहे .

सप्त गंगा - ( अ ) १ गंगा , २ यमुना , ३ सरस्वती , ४ रथस्था , ५ सरयू , ६ गोमती व ७ गंडकी ( म . भा . आदि - १७० - २० ); ( आ )

१ जाह्लवी , २ वृद्धगंगा , ३ कालिंदी , ४ सरस्वती , ५ कावेरी , ६ नर्मदा आणि ७ वेण्णा .

जाह्लवी वृद्धगंगा च कालिन्दी च स्ररस्वती ।

कावेरी नर्मदा वेणी सप्त गङ्‌‍ग प्रकीर्तिताः ॥ ( स्कंद - वैष्णव . ४ - १५ )

( इ ) राजा भगीरथानें तप केल्यामुळें गंगा मूळ सप्त प्रवाहांनीं पृथ्वीवर प्रकट झाली त्यांचीं नांवें :- १ ल्हादिनी , २ पावनी आणि ३ नलिनी हे तीन ओघ पूर्व दिशेकडे गेले आणि ४ सुचक्षु , ५ सीता व ६ महानदी सिंधू हे तीन पश्चिमेकडे व सातवा गंगा हा प्रवाह राजा भगीरथानें दाखविलेल्या मार्गानें पृथ्वीवर अवतीर्ण झाला . ( वा . रा . अ बालसर्ग ४३ )

सप्त गंडकी - १ बारीगर , २ शालिग्रामी अथवा नारायणी , ३ श्चेतगंडकी , ४ गंदी , ५ त्रिशूळगंगा , ५ दरंडी व ७ मर्षिअंडी . या सात नद्या मिळून झालेल्या प्रवाहास सप्तगंडकी असें म्हणता . ( Bengal R. A. Journal VOL. 18 )

" सप्त चिरंजीव ( पौराणिक )"- १ अश्वत्थामा , २ बलि , ३ व्यास , ४ हनुमंत , ५ बिभीषण , ६ कृप आणि ७ परशुराम .

अश्वत्थामा बलिर्व्यासो हनूमांश्व बिभीषणः ।

कृपः परशुरामश्च सप्तैते चिरजीविनः ॥ ( पद्म - सृष्टि . )

याखेरीज मार्कंडेय हे आठवे होत .

सप्तैतान् ‌‍ संस्मरेन् ‌‍ नित्यं मार्कंडेयमथाष्टमम ‌‍ ॥ ( सु . )

" सप्त चिरंजीव ( आधुनिक )- १ भगतसिंग , २ राजगुरु , ३ सुखदेव ( पंजाब ), ४ शिंदे , ५ सारडा , ६ कुरवान हुसेन व ७ मल्लया धनशेटी ( सोलापूर ). हे सात प्रस्थापित सरकारविरुद्ध राज्यक्रांतिकारका म्हणून ब्रिटिश राजवटींत बळी दिले गेले .

भगत्सिंगो राजगुरुः सखदेवश्च सारडाः ।

शिन्देहुसेनौ मल्लपा सप्तैते चिरजीवनः ॥ ( केसरी २८ मार्म १९३१ )

सप्त चक्रें ( देहांत ) त्यांचीं स्थानें , लोक व देवता - १ मूलाधार चक्र - गुद - देवलोक - गणेश , २ स्वाधिष्ठानचक्र - पेड्रस्थान - ब्रह्मलोक - ब्रह्मा , ३ मणिपूरचक्र - नामि - वैकुंठ - विष्णु , ४ अनाहतचक्र - ह्रदय - कैलास - शिव , ५ विशुद्धचक्र - कंठ - सत्यलोक - सरस्वती , ६ अग्निचक्र - भृकुटीस्थान - स्वर्गलोक - महाविष्णु आणि ७ सहस्त्रकमलदलचक्र - ब्रह्मांड - मस्तकस्थान - निराधार लोक - परमात्मा देवता ( पंचग्रंथी )

सप्त चैतन्यें - १ ब्रह्मचैतन्य , २ ईशचैतन्य , ३ जीवचैतन्य , ४ प्रमाणचैतन्य , ५ प्रमातृचैतन्य , ६ प्रमेयचैतन्य व ७ फलचैतन्य , पहिलें शाश्चत ब्रह्मचैतन्य बाकीचीं सहा मायिक चैतन्यें मानिलीं आहेत .

सप्त जिव्हा ( अग्निच्या )- ( अ ) १ कराली , २ धूमाली , ३ श्वेता , ४ लोहिता , ५ कनकप्रभा , ६ अतिरक्ता आणि ७ पद्मरागा , अशीं अग्नीच्या सात ज्वालांचीं नांवें आहेत . यावरून अग्नीला सप्तजिह्ल म्हणतात . ( भ . मध्यमपर्व १ - २० ) ( आ ) १ काली , २ कराली , ३ मनोजवा , ४ सुलोहिता , ५ सुधूम्रवव्रर्णा , ६ स्फुलिंगिनी व ७ दिव्य वररुचि , ( मुंडकोप - निषद ‌‌ १ - २ - ४ )

सप्त तत्त्वें ( जैन धर्माचीं )- १ जीव , २ अजीव , ३ आसव , ४ बंध , ५ संवर , ६ निर्जरा आणि ७ मोक्ष . अशीं सात तत्त्वें जैन धर्मांत मानिलीं आहेत . कोणी कोणी यांच्या जोडीला ८ पुण्य व ९ पाप हीं धरून नऊ मानतात .

सप्त तीर्थें - १ सत्य , २ क्षमा , ३ इंद्रियनिग्रह , ४ सर्वभूतदया , ५ सत्यवादिता , ज६ ज्ञान व ७ तप . हे सात प्रकारचे दैवी गुण सप्त तीर्थें म्हणून मानले आहेत .

सत्यतीर्थं क्षमातीर्थं पीर्थमिन्द्रियनिग्रहः ।

सर्वभूतदयातीर्थं तीर्थानां सत्यवादिता ॥

ज्ञानतीर्थं तपस्तीर्थं कथितं तीर्थसप्तकम् ‌‌ ( स्कंद अ . म . १० - ४५ )

सप्त त्वचा - १ अवभासिता , २ लोहिता , ३ श्वेता , ४ ताम्रा , ५ वेदिनी , ६ रोहिणी आणि ७ मांसधरा . अशा सात तर्‍हेच्या कमी अधिक जाडीच्या पापुद्रयांची त्वचा ब नलेली आहे . त्वचा हे एक शरिराचें सुंदर आवरण आहे . ( शा रंग धर )

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP