अष्टांगें ( पुजेचीं )- १ पाणी , २ दूध , ३ तूप , ४ दही , ५ दर्म , ६ तांदूळ , ७ जव व ८ सर्षप . ( म . ज्ञा . को . विभाग ७ )
अष्टांगें ( बुद्धीचीं )- १ शुश्रूषा , २ श्रावण , ३ ग्रहण . ४ धारण , ५ चिंतन , ६ ऊहापोह , ७ अर्थविज्ञान व ८ तत्त्वज्ञान , ( म . वा . को . )
अष्टांगें ( मैथुनाचीं )- १ स्त्रीविषयक चिंतन , २ वर्णन , ३ क्रीडा करणें , ४ कटाक्षयुक्त पाहणें , ५ एकान्तीं भाषण , ६ संकेत , ७ अध्यवसाय
( परस्पर निश्चय ) आणि ८ प्रत्यक्ष संभोग .
स्मरणं कीर्तनं केलिः प्रेक्षणं गुह्यभाषणम् ।
संकल्पोऽध्यवसायश्च क्रियानिर्वृत्तिरेव च ॥ ( वृ . स्मृति )
अष्टांगें ( योगाचीं )- १ यम , २ नियम , ३ आसन , ४ प्राणायाम , ५ प्रत्याहार , ६ ध्यान , ७ धारणा व ८ समाधि . ( पा . योगसूत्रें ) या आठ मार्गांनीं क्रमाक्रमानें साधकाचा होणारा प्रवास ह अष्ठांग योग .
अष्टांग रतिचक्रांतील ( कामशास्त्र )- १ आलिंगन , २ चुंवन , ३ नखच्छेद्य , ४ दशनच्छेद्य , ५ संवेशन , ६ सीत्कृत , ७ पुरुषायित व ८ औपरिष्टक . ( नासदीयसूक्त - भाष्य )
अष्टांगें ( शकुनाचीं )- १ भौम - भूकंप इ ., २ उत्पात - उत्कापात , ३ स्वप्न , ४ अन्तरिक्ष - ग्रहाची स्थिति , ५ अंगस्फुरण , ६ स्वर , ७ लक्षण व ८ व्यंजन - शरीरावर नंतर उमटणार्या खुणा . जैनधर्मांत अशीं शकुनाचीं आठ अंगें मानिलीं आहेत .
( एस् . एस् . सी संस्कृत दोन दिवसांत )
अष्टांगें ( शरीराचीं )- ( अ ) ९ शिर , २ कक्ष , ३ ह्रदय , ४ बाहु , ५ ऊरु , ६ जंघा , ७ ढोपरें व ८ पादांगुली . हीं शरिराचीं आठ अंगें . ( उड्डीश शास्त्र ); ( आ ) दोन हात , दोन पाय , दोन गुडघे , वाचा व मन अशीं आठ अंगें .
अष्टांगें ( साधनेचीं )- १ सत्यविश्चास , २ नम्रवचन , ३ उच्चलक्ष्य , ४ सदाचरण , ५ सद्वृत्ति , ६ सद्गुणांचें परिपालन , ७ बुद्धीचा सदुपयोग आणि ८ सद्ध्यान . भगवान् बुद्धानें हीं साधनेचींज आठ अंगें सांगितलीं आहोत . ( कल्याण हिं . सं . अंक )
अष्टांगें ( सैन्याचीं )- १ रथ , २ हत्ती , ३ घोडे , ४ पायदळ , ५ मजूर , ६ नाविकदल , ७ गुप्तहेर आणि ८ टेगळणी पथक , हीं सैन्याचीं आठ अंगें भारतकालीं होतीं .
रथा नागा हयाश्चैव पादाताश्चैव पांडव ।
विष्टिनीवश्चराश्वैव देशिका इति चाष्टमः । ( म . भा . शांति . अ - ५९ )
अष्टांगें ( संस्कृतीचीं )- १ मानवी परिश्रम , २ शासनसंस्था , ३ नीति , ४ धर्म , ५ शास्त्र , ६ तत्त्वज्ञान , ७ वाङ्मय व ८ कला .
अष्टांगें वा स्थानें पवित्र गोदावरीचीं - १ शिर - ब्रह्मगिरि , २ मुख - पुणतांवे , ३ कंठ - पैठण , ४ मंजरथ - ह्रदयस्थान , ५ शंखतीर्थ ( नांदेडजवळळ )- नाभि , ६ कटी - मंथन , ७ जानू - धर्मपुरी , व ८ चरण - राजमहेंद्री ( गोदामाहात्म्य )
अष्टाधिकार - १ जलधिकार , २ स्थलाधिकार , ३ ग्रामाधिकार , ४ ब्रह्मासन ( बेलिफाचा अधिकार ), ५ कुललेखन , ६ दंडविनियोग , ७ पौरोहित्य व ८ ज्योतिष . अशीं आठ खातीं पूर्वकालीं खेडेगांवांतून असत . ( म . ज्ञा . को . विभाग ७ )
अष्टक - ( अ ) ऋवेद संहितेचे पठणाच्या सोयीकरितां आठ भाग केले आहेत . प्रत्येक भागांत आठ अध्याय आहेत . त्या प्रत्येक भागास अष्टक अशी संज्ञा आहे . ( आ ) आठ वस्तूंचा संग्रह अथवा आठ वस्तूंच्या समुच्चयानें बनलेला पदार्थ . उदा . हिंगाष्टक , गंधाष्टक इ . ( इ ) स्तोत्र अथवा काव्य , ज्यांत आठ श्लोक आहेत असे . उदा . रुद्राष्टक , गंगाष्टक इ .
आठ अंगें आयुर्वेदाचीं - १ सूत्र , २ शरीर , ३ ऐंद्रिय , ४ चिकित्सा , ५ निदान , ६ विमान , ७ कल्प व ८ प्रसिद्धि . ( सार्थ . मा . नि . प्रस्तावना )
आठ अवतार गणपतीचे - १ वक्रतुण्ड , २ एकदंत , ३ महोदर , ४ गजानन , ५ लंबोदर , ६ विकट , ७ विघ्नराज आणि ८ धूम्रवर्ण असे श्रीगणपतीचें आठ अवतार असून ते समुद्रतीराला आठदिशांना आहेत . ( मुद्रल पुराण )
आठ आग्र्याच्या ताजमहालाचे प्रमुख कारागीर - १ अमानत खां शिराजी - कंदाहार , २ इसा गवंडी - आग्रा , ३ पिर सुतार - दिल्ली , ४ बन्नुहार , ५ जातमल्ल , ६ जोरावर ( नक्षी काम करणारा ), ७ इस्माइल खान रुमी ( घुमट वनविणारा ) आणि ८ रामलाल ( काशिमरी वाग बनविणारा ). हे प्रमुख कारगीर व निर्माते होत . ( Studis in Moghul India )
आठ उपरस ( रसायनशास्त्र )- १ गंधक , २ गेरु ( सोनकाव ), ३ हिराकस , ४ तुरटी , ५ हरताळ , ६ मनशील , ७ सुरमा आणि ८ कंकुष्ट . ( मुर्दाडसिंग ) ( र . र . समुच्चय अ . ३ - १ )
आठ गुण दूतास आवश्यक - १ गर्वरहित , २ दुर्वल नसलेला , ३ चेंगटपणा न करणारा , ४ दयाळु , ५ प्रामाणिक , ६ फितुर न होणारा . ७ गिरोगी , ८ सयुक्तिक तसेंच अर्थपूर्ण भाषण करणारा . ( म . भा . उ . ३७ - २७ )
आठ गुण पुरुषाची योग्यता वाढविणारे - १ वुद्धि , २ कुलीनता , ३ विद्या , ४ इंद्रियदमन , ५ पराक्रम , ६ मितभाषण , ७ यथाशक्ति दान व ८ कृतज्ञता . ( म . भा . उद्योग . ३७ - ३१ )
आठ गुण राज्यशासकांना विहित - १ दम , २ शांति , ३ क्षमा , ४ धर्म , ५ धैर्य , ६ सत्य , ७ पराक्रम आणि ८ उपद्रव देणार्यांना दंड . ( वा . रा . अयोध्या . )
आठ गुण विद्यासंपादनास आवश्यक - १ शांति , २ इंद्रियदमन , ३ स्वदोष - द्दष्टि , ४ सदाचार , ५ ब्रह्मचर्य , ६ अनासक्ति , ७ सत्याग्रह व ८ सहिष्णुता ( नासदीयसूक्त - भाष्य )
आठ गुण आदर्श विद्यार्थ्यांचे - १ सुशील , २ चतुर , ३ कर्तव्यांत जागरुक , ४ ज्ञानवान् ५ सेवापरायण , ६ कल्पक , ७ इष्ट व योग्य काम करणारा व ८ अप्रमादी ( निरलस ). ( सु . )
आठ गुण हनुमंतस्मरणानें प्राष्त होतात - १ बुद्धि , २ बल , ३ कीर्ति , ४ धैर्य , ५ निर्मयपणा , ६ निरोगीपणा , ७ चापल्य आणि ८ वाक्यटुत्व .
बुद्धिर्बलं यशो धैर्यं निर्मयत्वमरोगता ।
अजाडयं बाक्पटुत्वं च हनूमत्स्मरणाद्भवेत् ॥ ( वायुस्तुति )
आठ गोष्टी विद्यार्थ्यांस वर्ज्य - १ काम , २ क्रोध , ३ लोभ , ४ जिमेचे चोचले . ५ शृंगाराची आवड , ६ उत्सव - सभारंम , ७ अतिनिद्रा आणि ८ अति कामधाम .
कामं क्रोधं तथा लोभं स्वादुशृंगारकौतुके ।
अतिनिद्रातिसेवा च विद्याथीं ह्मष्ट बर्जयेत् ॥ ( वृ . चा . ११ - ९ )
आठ गोष्टींच्या स्वीकारानें व्रतभंग होत नाहीं - १ जल , २ मूळ , ३ फळ , ४ दूध , ५ हवि , ६ ब्राह्मणाची इच्छा , ७ गुरुची आज्ञा व औषध . ( म . भा . उद्योग ३९ - ७१ )
आठ गोष्टी स्थानभ्रष्ट झाल्यास न शोभणार्या - १ राजा - अधिकारी , २ कुलवधू , ३ ब्राह्मण , ४ मंत्री , ५ स्तन , ६ दांत , ७ केश व ८ नखें ,
आठ जाती शब्दांच्या - १ नाम , २ सर्वनाम , ३ विशेषण , ४ क्रियापद , ५ क्रियाविशेषण अव्यय , ६ उमयान्वयी अव्यय , ७ केवल - प्रयोगी अव्यय , ८ शब्दयोगी अव्यय . ( व्याकरण )
आठ जीवनसत्त्वें - ए , बी , सी , डी , ई , एफ . जी व एच . हीं आतांपर्यंत ज्ञात अशीं आठ प्रमुख जीवनसत्त्वें मानवी देहधारणेला अवश्य असतात , व तीं अनेक तर्हेचीं व महत्त्वाचीं कार्यें करतात असे आधुनिक जीवनशास्त्र सांगतें .
आठ तिथी शुभदायक - १ प्रतिपदा , २ द्वितीया , ३ तृतीया , ४ पंचमी , ५ सप्तमी , ६ दशमी , ७ द्वादशी व ८ त्रयोदशी या आठ तिथी शुभदायक मानल्या आहेत . ( अंकशास्त्र )
आठ देवता लक्ष्मीच्या सान्निध्यांत राहणार्या - १ आशा , २ श्रद्धा , ३ धृति , ४ क्षांति , ५ विजिति , ६ सन्नति ७ क्षमा व ८ जय
( म . भा . शांति अ . २२ )
आठ दुर्गुणांनीं मनुष्याच्या शक्तींचा संकोच होतो - १ अहंकार , २ बल , ३ दर्प , ४ काम , ५ क्रोध , ६ वस्तुसंग्रह , ७ ममत्व आणि ८ अशांति .
आठ दोष क्रोधामुळें उत्पन्न होणारे - १ चहाडी , २ साहस , ३ कपटाचरण , ४ मत्सर , ५ दोषदर्शन , ६ अर्थदूषन ( परद्रव्यापहार ),
७ वाणीनें कठोर आणि ८ हातपाईवर येणें . ( मनु , ७ - ४८ )
आठ दोष मैथुनापासून उत्पन्न होणारे - १ ग्लनि , २ मूर्च्छा , ३ भ्र्म , ४ कांपरें , ५ श्रम , ६ घाम , ७ अंग अगर इंद्रियामध्यें लुळेपणा येणें व ८ क्षयरोगादि दोष .
ग्लानिर्मूर्च्छा भ्रमःअ कंपः श्रमः स्वेदोऽङ्गविक्लवः ।
क्षयरोगादयो दोषा मैथुनोत्थाः शरीरिणः ॥ ( सु . )
आठ दोष ( मंत्रसंबंधीं )- १ अभक्ति , २ अक्षरभ्नांति , ३ लुप्त ( अक्षर सोडून म्हणणें ), ४ छिन्न , ५ र्हस्व , ६ दीर्घ ( उच्चार दोष ), ७ जागृतींत मंत्र दुसर्यास सांगणें आणि ८ स्वप्नकथन ( स्वप्नांत दुसर्यास सांगणें ). ( कल्याण साधनांक ).
आठ धर्ममार्ग - १ जयन , २ अध्ययन , ३ दान , ४ तप , ५ सत्य , ६ क्षमा , ७ दया आणि ८ लोभशून्यता . ( म . भा . उद्योग . ३५ - ५६ )
आठ धन वाढविण्याची साधनें - १ संथपणा , २ दक्षता , ३ मनोनिग्रह , ४ बुद्धिमत्ता , ५ विचारशीलता , ६ धैर्य , ७ शौर्य , व ८ स्थल - कालविषयक सावधानता . ( म . भा . शांति , १२० - ३७ )
आठ नांवें अच्युताचीं ( अच्युत - अविनाशी तत्त्व )- १ अच्युत , २ केशव , ३ विष्णु , ४ हरि , ५ सत्य , ६ जनार्दन , ७ हंस आणि ८ नारायण , हीं नांवें मंगलरूप मानिलीं आहेत . ( चंद्र्कांत . भाग . २ रा )
आठ नांवें तुळशीचीं - १ वृन्दा , २ वृन्दावनी , ३ विश्वपूजिता , ४ विश्वपावनी , ५ पुष्पसारा , ६ नंदिनी , ७ तुलसी व ८ कृष्णजीवनी .
( देवी . भा . ९ - २५ )
आठ परमेश्वराचीं स्वरूपें - १ पृथ्वी , २ जल , ३ अग्नि , ४ वायु , ५ आकाश , ६ सूर्य , ७ चंद्र आणि ८ यज्ञाकर्ता .
पृथ्वी सलिलं तेजो बायुराकाशमेव च ।
सूर्याचन्द्रमसौ सोमयाजी चेत्यष्टमूर्तयः ॥ ( रघुवंशटीका ).
आठ प्रकार आत्म्याच्या पुनर्जन्माचे - १ जलात्मा - आत्मा प्राणाशीं संलग्न होऊन मेघमंडळाचा आश्रय करतो , २ अन्नात्मा - तें जल वृक्ष वनस्पति सेवन करतात . ३ वीर्यात्मा - अन्नाचें वीर्य बनतें , ४ गर्मात्मा - त्या वीर्यापासून गर्मधारणा होते , ५ पुरुषात्मा - मातेच्या उदरांतून जन्म घेतो , ६ ज्ञानात्मा , ७ कर्मात्मा व ८ चिदात्मा . हा आत्म्याचा आठवा पुनर्जन्म होय . येथें त्याला आनंदावस्थेचा अनुभव येतो . " निजानंदरूपः शिवः केवलोऽहं " ( पुरुषार्थ बो . भ . गी . )
आठ प्रकार आलिंगनाचे ( कामशास्त्र )- १ बृक्षाधिरूढ , २ तिलतंडुल , ३ ललाटिक , ४ जांघन , ५ विद्धक , ६ ऊरूपगूढ , ७ क्षीरनीर व ८ वेल्लरिवेष्टित ( अनंगरंग ) खेरीज , ९ सन्मुख आलिंगन हा एक कांहींच्या मतें नववा प्रकार आहे .
आठ प्रकार गायत्री छंदाचे - १ आर्षी , २ दैवी , ३ आसुरी , ४ प्राजापत्य , ५ याजुषी , ६ साम्नी , ७ आचीं व ८ ब्राह्मी ( विदर्भ संशोधन मंडळ वार्षिक १९५८ ).