मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
विशेष संकेत

संकेत कोश - विशेष संकेत

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


दोन गोष्टी अखंड चालणार्‍या - ( अ ) १ जनन आणि २ मरण " पुनरपि जननं पुनरपि मरणं " ( शंकराचार्य स्तोत्र ). ( आ ) १ काळ आणि २ सावकाराचे व्याज . ( बिरबल )

दोन प्रकार वृक्षांचे - १ ज्ञानानें - ज्ञानवृद्ध आणि २ नुसतें वयानें - वयोवृद्ध .

दोन प्रकार वृक्षांचे - १ फूल न येतां फळ देणारे व २ फुलें व फळें देणारे .

अपुष्पा फलवन्तो ये ते वनस्पतयः स्मृताः ।

पुष्पिणः फलिनश्वैव वृक्षास्तूभयतः स्मृताः ॥ ( मनु . १ - ४७ )

दोन प्रकारचें शौच - १ शुद्ध शौच व २ लौकिक शौच . " शुद्धशौचं इतिज्ञेयं मृज्जलाम्यां तु लौकिकम् ‌ " ( मैत्रेयि . उ . २।८ )

दोन प्रकार शिक्षकांचे - १ विद्वान् ‌ पण शिकविण्याची कला नसलेला व २ शिकविण्याची कला चांगली जाणणारा . या दोन्ही गुणांनी युक्त असा शिक्षक श्रेष्ठ होय .

श्लिष्टा क्रिया कस्यचिदात्मसंस्था संक्रातिरन्यस्य विशेषयुक्ता ।

यस्योमयं साधु स शिक्षकाणां धुरि प्रतिष्ठापयितव्य एव ॥ ( मालविकाग्निमित्र १।१६ )

दोन प्रकार संकेतांचे - १ पारिभाषिक व २ ईशनिर्मित . ( न्यायकोश )

दोन प्रमुख हेतु विज्ञानाम्यासाचे - १ जिज्ञासा व २ व्यावहारिक लाभाची अपेक्षा . ( विज्ञान इतिहास )

द्विविध कर्म - ( अ ) १ संचित व प्रारब्ध . ( आ ) १ दैव व पित्र्य ; ( इ ) प्रवृत्त व निवृत्त ; ( ई ) १ शुभ व २ अशुभ . ( सं . को . )

दोघां चे पावित्र्य स्वयंसिद्ध - १ गंगाजल व २ अग्नि . " तीर्थीदकं च वन्हिश्च नान्यतः शुद्धिमर्हतः " ( भवभूति )

दोन मोठीं पातकें - १ दुष्ट मंत्री असलेला राजा ( शासनाधिकारी ) २ अशा अधिकार्‍याच्या आश्रयाला राहणे .

पातकानां समस्तानां द्वे परे तात पातके ।

एकं दुःसचिवो राजा द्वितीयं च तदाश्रयः ॥ ( भोजप्रबन्ध )

तीन अंगें धर्माचीं - १ तत्त्वज्ञान , २ पुराणें व ३ विधि व अनुष्ठान . कोणत्याहि धर्माचीं अशीं तीन अंगें असतात . ( सार्वजनीक धर्म - स्वरूप व साधना )

तीन अर्थवाद - १ अनुवाद , २ गुणवाद व ३ भूतार्थवाद .

तीअन आद्य आचार्य लेखन ( लिपी ) कलेचे - १ ब्रह्या - ब्राह्मीलिपि .- डावीकडून उजवीकडे लिहिली जाणारी , २ खरोष्ठ - खरोष्ठी - उजवीकडून डावीकडे लिहिली जाणारी व ३ त्सं - की - चित्रलिपि . वरून खाली लिहिली जाणारी . पहिलेदोन भारतांत व तिसरा चीनमध्यें होऊन गेला . ब्रह्मा आणि खरोष्ठ यांनी आपल्या लिपि देवलोकापासून प्राप्त करून घेतल्या व त्सं - कीनें आपली लिपी पक्षी आदिंच्या पदचिन्हावरून बनविली . ( प्रा . भा . लिपिमाला )

तीन ऋणें ( व्यावहारिक )- ( आ ) १ कौटुंबिक , २ सामाजिक आणि ३ राष्ट्रीय .

तीन गुण कीर्तनास आवश्यक - १ ताल , २ अर्थ व गान ( गायन ( कीर्तन पद्धति )

तीन गुण वैश्याचे - १ शेती , २ गोरक्षण आणि ३ वाणिज्य - व्यापार - क्रय विक्रय ( भ . गी . १८ - ४४ )

तीन गोष्टी जगांत व्यर्थ - ( १ ) अप्रगल्माची विद्या ( २ ) कंजूषाजवळचें धन ( ३ ) भित्र्या माणसाचें बळ .

अप्रगल्मस्य या विद्या कृपणस्य च यद्धनम् ‌‍ ।

यच्च बाहुबलं भीरोर्व्यर्थमेतत् ‌ त्रयं भुवि ॥ ( भोजप्रबंध )

तीन प्रकार आगम ग्रंथांचे - १ शौवागम , २ शाक्तागम व ३ वैष्णवागम .

तीन प्रकार मोठेपणाचे - १ जन्मसिद्ध , २ कष्टार्जित व ३ बळेंच चिकटविलेला . ( Twelth Night )

तीन प्रकार शिवनृत्याचे - १ संध्या नृत्य , २ ताण्डव नृत्य व ३ नदन्त नृत्य ( कला आणि कलास्वाद )

तीन प्रकार संतांचे - १ व्यावहारिक संत , २ प्रातिभासिक संत व ३ पारमार्थिक संत ( विवेक चिंतामणि )

तीन प्रकार हास्याचे - ( अ ) १ अंगहास्य . २ काव्यहास्य व ३ नेपथ्यहास्य ( भ . ना . अ . २१ ) ( आ ) १ द्दष्टिहास्य - नुसत्या नजरेनें - विद्वान् ‌ माणसें , २ दंतहास्य - दांत दाखवून - मध्यम माणसें व ३ अकांड तांडव करून - अघम माणसें . सत्पुरुष जे आहेत ते फारसे हसत नाहीं .

तीन सभा - १ देव अथवा देवकी सभा - देवतेचें कीर्तन चालतें , २ दैत्य सभा - सर्व तामसी प्रकार चालतात व ३ मानुष्य सभा - देवपूजन - शास्त्र चर्चा चालते ती . गोंधळीवाङ्मय - ( पराग जून १९४८ )

तीन साधनें ज्ञानाचीं - १ सहज प्रवृत्ति , २ तर्कबुद्धि व ३ अंतःस्फूर्ति वा अपरोक्षानूभूति , ( सार्वजनीन धर्म - स्वरूप व साधना )

तीन लक्षणें आप्ताचीं - ( यथार्थ वक्ता )- १ कर्तव्य दक्ष , २ निः - पक्षपाती व ३ सन्मान्य ( सु . )

तिघांना आवरण्याचीम तीन साधनें - १ हत्ती - साखळदंड किंवा अंकुश २ घोडा - लगाम ३ स्त्री - ह्रदय - आलाने गृह्यते हस्ती वाजी वल्गासु गृह्यते । ह्रदये गृह्यते नारी ॥ ( मृच्छकटिक १ - ५० )

त्रिरत्न - १ बुद्ध , २ धर्म व ४ संघ . या तीन्हींच्या समुच्चयांस त्रिरत्न म्हणतात .

त्रिविध योगपट्टक ( वस्त्र )- १ व्याघ्राम्बर , २ मृगाजिन आणि ३ कार्पास वस्त्र .

त्रिविधं योगपट्टकमाद्यं व्याघ्राजिनोद्भवम् ‌ ।

द्वितीयं मृगचर्माढयं तृतीयं तन्तुनिर्मितम् ‌ ॥ ( सु . )

ध्या न समयीं वापरावयाचे तीन वस्त्र प्रकार .

चतुर्विध शिष्य - १ आप्तशिष्य . २ अंगशिष्य , ३ स्थानशिष्य व ४ सद्भावशिष्य .

आप्त अंग स्थान । आणि सद्भाव म्हणोन ।

ऐसे चतुर्तिध शिष्य मिन्न । परिक्रमे ( वि . चिंतामणि प्रथम परिच्छेद )

चार अनार्य व्यवहार - १ मृषावाद , २ पिशुन वाचा , ३ परुष वाचा व ४ व्यर्थ बडबड .

चारा अधिष्ठानें - १ प्रज्ञाघिष्ठान , २ सत्याघिष्ठान , ३ त्यागाधिष्ठान व ४ उपशमाधिष्ठान , ( दीघनिकाय )

चारा कारणानें चार गोष्टीं विनाश - १ कलहानें घरें , २ अपशब्दानें मैत्री , ३ शिथिल राज्यव्यवस्थेनें राष्ट्र आणि ४ दुप्कृत्यामुळें माणसाची कीर्ति -

कलहान्तानि हर्म्याणि कुवाक्यान्तं च सौह्रदम् ‌ ।

कुराज्यान्तानि राष्ट्राणि कुकर्मान्तं यशो नृणाम् ‌ । सु .

चार गोष्टी एकटयाला निषिद्भ - १ मिष्टान्नभोजन . २ कार्यविचार . ३ प्रवास आणि ४ इतर लोक झोपले असतां एकटयानें जागणें .

( म . भा . उद्योग ३३ - ४६ )

चार गंगा - १ द्विजगंगा - गोदावरी , २ क्षत्रिय गंगा - भागीरथी , ३ वैश्यगंगा - नर्मदा व शूद्रगंगा - कावेरी -

हे ओघ जरी वेगळाले । परी गंगेनें व्याप्त सगळे ।

भेदरूप राहिले । शब्द नुसते व्यवहारांत ( गोदामहात्म्य )

चार गोष्टी मृतवत् ‌- १ दरिद्री मनुष्य २ अराजक माजलेलें राष्ट्र . ३ अनधी विप्राकरवीं केलेलें श्राद्ध . ४ दक्षिणा न देतां केलेलें धार्मिक कृत्य

चार खाणी माणसांच्या - १ आपलपोटे . २ प्रपंचस्वार्थी , ३ जातिपक्षीय आणि ४ समाजपक्षीय ( सुविचार - स्मरणी )

चार गोष्टी कोठूनहि ध्याव्यात -

विषादप्यमृतं ग्राह्यं अमेध्यादपि काञ्चनम् ‌ ।

नीचादप्युत्तमाविद्या स्त्रीरत्नं दुष्कुलादपि ॥ ( सु . )

१ अमृत - विषाच्या सांन्निध्यांत असले तरी

२ सुवर्ण - अशुचि पदार्थात पदते तरी

३ विद्या - नीच माणसापासूनदेखील चांगली विद्या .

४ स्त्रीरत्न - दुष्कुलांत जन्म असला तरी देखील .

चार गोष्टी कोरीव लेखाला प्रामाण्य आणणार्‍या - १ कालाचा उल्लेख गणितद्दष्टया जुळला पाहिजे . २ स्थलाचा उल्लेख वस्तुस्थितीस धरून , ३ लेखांतील वंशावळ इतर प्रमाणभूत लेखांशीं जुळली पाहिजे आणि ४ तत्कालीन प्रामाणिक लेखांतील कल्पना , शब्दसमुच्चय , बिरूदें यांचा उपयोग .- दक्षिण महाराष्ट्राच्या इतिहासाचीं साधनें

चार नृत्य प्रकार बाली नृत्याचे - १ लेगांग नृत्य - तीन लहान मुलींनीं मिळून केलेले नृत्य , २ जांगर नृत्य - दहा मुलें व दहा मुली अशा वीस जणांनीं मिळून केलेलें , ३ कवियर नृत्य - बसूनच केलें जातें व ४ केचक अथवा वानर नृत्य ( स्त्री नोव्हेंबर १९६३ )

चार प्रकार चित्रांचे ( कल्पनागम्य )- ( अ ) १ आदर्शवादी , कल्पनावादी , २ अलंकारिक वा भौषणिक , ३ रूढीवादी व ४ प्रतीकवादी

( कला आणि कलास्वाद ) ( आ ) १ वस्तुनिष्ठ , २ इंद्रियगग्य , ३ संलग्नित व ४ उत्स्फूर्त किंवा स्वाभाविक ( चित्रकला - एक शैक्षणिक माध्यम )

चार प्रकार पेमाचे - १ लालन प्रेम , २ वात्सल्य प्रेम , ३ सख्य प्रेम व ४ माधुर्य प्रेम . ( श्री ज्ञानेश्वर गूढार्थ दीपिका खंड ३

चार प्रकार स्तोत्रांचे - १ द्रव्य स्तोत्र , २ कर्मस्तोत्र , ३ विधिस्तोत्र आणि ४ अभिजन स्त्रोत्र ,

द्रव्यस्तोत्रं कर्मस्तोत्रं विधिस्तोत्रं तथैव च ।

तथैवाभिजनस्तोत्रं स्तोत्रमेतच्चतुर्विधम् ‌ ( न्यायकोश )

चार प्रकारच्या लोकांना वश करण्याचे चार मार्ग - १ लोभीधनानें , २ क्रुद्ध - हात जोडून , ३ मूर्ख - त्याच्या कलानें व ४ पंडित - खरेपणानें .

लुब्धमर्थेन गृह्लीयात्क्रुद्धं चाञ्जलिकर्मणा ।

मूर्खं छन्दानुबंधेन याथातथ्येन पण्डितम् ‌ ॥ ( सु . )

चार प्रकार सृष्टीचे - १ संकल्पोद‌भव , २ दर्शनोद्‌भव , ३ स्पर्शोद्‌भव , व ४ मैथुनजन्य .

संकत्पाद्दर्शनात्स्पर्शात्पूर्वेषां सृष्टिरुच्यते ।

दक्षात् ‌ प्राचेतसादूर्ध्व सृष्टिमैंथुनसम्मवा ॥

सृष्टीचे आरंमीं पहिल्या तीन प्रकारांनीं निर्मिति होत असून दक्षापासून मैथुनजन्य संतति निर्माण होऊ लागली म्हणजे दक्ष हा पहिला प्रजापति . ( मत्स्य पुराण )

चार प्रकार ज्ञानाचे - १ शब्दज्ञान , २ अपरोक्षज्ञान , २ सामान्यज्ञान व ४ विशेषज्ञान . ( ज्ञानप्रबोध )

चार प्रकार तीर्थीचे - १ दैवी , २ राक्षसी , ३ ऋषिज व ४ मानवी .

ब्रह्म बोले त्यावर । तीर्थाचे ते प्रकार चार

दैवी राक्षसी साचार । ऋषिज आणि मानवी ( गोदामाहात्म्य )

चार प्रकारचे वाक्यदोष - १ भ्रम , २ प्रमाद , ३ विप्रलिप्सा - विपरीत अर्थ सांगण्याची इच्छा व ४ कर्णापाटव - अशुद्ध उच्चार वा बोबडेपणा . ( न्यायकोश )

चार प्रवाह वेदान्ताचे - १ शुद्धद्वैत , २ विशिष्टाद्वैत , ३ शुद्धाद्वैत व ४ केवलाद्वैत . ( स्वामी विवेकानंद )

चार प्रकार योगाचे - कर्मयोग . २ भक्तियोग , ३ राजयोग व ४ ज्ञानयोग ( सार्वजनीन धर्म स्वरूप व साधना )

चार प्रकार रंगभूषेचे - १ साधारण नेहमींचा , २ शृंगारिक , ३ कृत्रिम बाहयरूप व ४ लुकणि ( Plaslie ) ( रंगभूषा शास्त्र )

चार प्रसंगानंतर स्नान आवश्यक - १ अंगाला तेल लावल्यावर . २ प्रेतयात्रेस जाऊन आल्यावर . ३ मैथुनानंतर आणि ४ क्षौर विधिनंतर , अशावेळीं स्नान न करणारा मनुष्य चांडाळ समजला जातो .

चार बलें - १ बीर्यबल , २ स्मृतिबल , ३ समाधिबल व ४ प्रज्ञाबल ( दीघनिकाय )

चार धर्मस्कंध - १ शीलस्कंध , २ समाधिस्कंध , ३ पुण्यस्कंध व ४ विमुक्तिस्कंध .

चार भावना - १ मैत्री भावना , २ प्रमोद भावना , ३ कारुण्य भावना , व ४ माध्यस्थ्य भावना ( धर्मामृत )

चार मूळ गोत्रें - १ अङि‌‍गरा , २ कश्यप , ३ वसिष्ठ व ४ भृगु .

मूल गोत्राणि चत्वारि समुत्पन्नानि भारत ।

अंङि‌गराः कश्यपश्चैव वसिष्ठो भृगुरेव चा ॥ ( म . भा . शांति . अ . २६४ )

चार मूलभूत गोष्टी स्थिर राज्याला अत्याश्यक - १ सुबुद्ध नेतृत्व , २ शासकीय पात्रता , ३ समान आर्थिक संधि , ४ राष्ट्रीय सहकार्य , राष्ट्रपति डॉ . राधाकृष्णन् ‌. केसरी ५ - ११ - ६३ .

चार विशेषणें आत्म्याचीं - १ सत् ‌, २ चित् ‌, ३ आनंद व ४ अद्वैत

चार विशेषणें अनात्म्याची - १ असत् ‌, २ जड , ३ दुःख आणि ४ द्वैतत्व ( वि . चंद्रोदय दर्शन )

चार संवाद - श्री रामचरितमानसांतर्गत - १ काकमुशुंडि - काकगुरुड - संवाद , २ उमा - शंभु - संवाद , ३ याज्ञवल्क्य - भरद्वाज संवाद व ४ श्री तुलसीदास - आणि त्यांचे श्रोते . हे चार संवाद म्हणजे श्रीरामचरितमानस ( काव्य ) सरोवराचे चार घाट होत . यांत चार कल्पांतील रामावताराचें वैशिष्टय दाखविलें आहे .

अतिसुंदर संवादवर विरचित - बुद्धि - विचारिं । ते या पावन सुमगा सरिं घाट मनोहर चारिं ( गूढार्थचंद्रिका )

 

पंच द्दष्टांत - १ शुक्तीवर रजतप्रतीति , २ दोरीवर सर्प प्रतीति , ३ स्थाणूमध्यें पुरुष प्रतीति , ४ आकाशामध्यें नीलता व ५ मरुभूमीवर जल प्रतीति ( वि . चंद्रोदय दर्शन )

पंच द्रष्टे - १ गृत्समद , २ मेधावी , ३ कण्व , ४ वसिष्ठ व ५ भारद्वाज , या पंच द्रष्टयांनीं मंगलमूर्ति ब्रह्मणस्पति हें प्रतीक भारतीय संस्कृतीला प्रथम सादर केलें ( रोहिणी सप्टेंबर १९५८ )

पंचा प्राण ( विनोदाचे )- १ शब्दा , २ कल्पना , ३ परिस्थिति , ४ प्रसंग व ५ अमय प्रभुत्व ( हास्यकारण आणि मराठी सुखांतिका )

पंचविध प्रभुत्व - १ कुलप्रभृत्व , २ ज्ञानप्रभुत्व , ३ दानप्रभुत्व , ४ स्थान प्रभुत्व व ५ अमय प्रभुत्व ( वस्तुरत्नकोश )

पांच कारणें वा प्रयोजने कर्माच्या उत्पत्तीचीं व फलाचीं - १ मन , २ वाचा , ३ देह , ४ इंद्रियें व ५ जीव , कर्माच्या उत्पत्तीचीं ही पांच कारणें होत . तींच कर्माचीं कारणें म्हणजे कर्माचीं प्रयोजनें अर्थात् ‌ फळें होत . ( प्रसाद आक्टोबर १९६३ )

पांच गुण बुद्धीचे - १ इष्टानिष्ट गोष्टींचा निर्णय करतां येणें , २ निश्वय , ३ समाधान , ४ निर्णय व ५ ज्ञान .

इष्टानिष्टविपत्तिश्च व्यवसायः समाधिता ।

संशयः प्रतिपत्तिश्च बुद्धेः पञ्च गुणान्विदुः ॥ ( म . भा . मोक्षधर्म )

पांच गोष्टी दीर्घकाल संध्या केल्यामुळें प्राप्त होणार्‍या - १ दीर्घायुष्य , २ प्रज्ञा , ३ यश , ४ कीर्ति व ५ ब्रह्मतेज ( मनु ) ( मानवता पूर्ति साधन व संध्योपासना )

पांच गोष्टी पत्रव्यवहारांत महत्वाच्या - १ अचूकता , २ संपूर्ण आशय , ३ असंदिग्घता , ४ थोडक्यांत पण मुद्देसूद ५ सभ्यता . ( Good Drafting )

पांच गोष्टींचें प्रकटीकरण ( शिवनृत्याचें )- १ निर्मिति , २ स्थिति , ३ संहार , ४ तिरोधान व ५ अनुग्रह ( कला आणि कलास्वाद .)

पांच गोष्टी शत्रूच्या बाबतींतहि निषिद्ध - १ युद्धाला उभा नसलेल्याचा बध , २ परस्त्रीवर हात टाकणें , ३ ब्रह्मवित्ताची लूट , ४ सरसाकट अपहार व ५ स्त्रियांची चोरी .

अयुद्धमानस्य वधः दारामर्षः कृतघ्नता ।

ब्रह्मवित्तस्य चादानं निःशेषकरणं तथा ॥

स्त्रियामोषः पतिस्थानं दस्युष्वेतद्धि गर्हितम् ‌ ( म . भा . शांति , अ . १३४ ) याप्रमाणें छत्रपती शिवाजी महाराजांचे आचरण व तशीच राजाज्ञा होती असा इतिहास आहे .

पांच लक्षणें सभ्याचीं - १ सूक्ष्मद्दष्टी असलेला . २ पक्षपातरहित , ३ विचारी , ४ वक्तृत्व असलेले व ५ न्यायी .

सम्यास्तु विबुधैर्ज्ञेयय ये दिद्दक्षान्विता जनाः ।

मध्यस्थाः सावधानाश्च वाग्मिनो न्यायवेदिनः । ( आदि भरत )

पांच प्रकार ग्रह संमेलनाचे - १ संमोह , २ समाज , ३ कोश , ४ सश्रिपाप व ५ समागम ( वराहमिदिराचार्य - अष्टग्रहीचा आसूड )

पांच प्रकार प्रस्तावनेचे - १ आशीर्वादात्मक , २ अवतरणात्मक , ३ असंबद्ध . ४ अतिशयोक्त व ५ अतिविशाल . ( खर्डेघाशी )

पांच प्रकार सुखान्तिकेचे ( Comedy )- १ कल्पनारम्य , २ स्वभाव प्रधान , ३ प्रसंगनिष्ठ , ४ प्रहसनात्मक आणि ५ सुखदुःखान्तिका अथवा मिश्र मुखान्तिका . ( हास्यकारण आणि मराठी सुखान्तिका )

पांच संपदा - १ ज्ञाति संपदा , २ भोग संपदा , ३ आरोग्य संपदाअ ४ शील संपदा व ५ द्दष्टि संपदा . ( दीघनिकाय )

पांच सुखेच्छाकला - १ नम्रता , २ प्रियवादित्व , ३ धैर्य , ४ शांति व ५ वैराग्य या पांच कला सुखाखातर आहेत . ( चा . चिं . )

पांच जण ब्रह्माचे भीतीनें कार्य प्रवण ( वेदान्त )- १ वायु , २ सूर्य , ३ अग्नि , ४ इंद्र व ५ मृत्यु हे पांचही ब्रह्माच्या भीतीनें आपापलीं कामें करतात . ( तैत्तिरीय उपनिषद् ‌ ).

सहा घटक अन्नाचे - १ पिष्ट पदार्थ , २ स्निग्ध पदार्थ ३ नैट्रोजनयुक्त पदार्थ ( प्रोटीन ), ४ क्षार , ५ पाणी व ६ जीवनसत्त्वें .

( विज्ञानपरिचय )

सहा अवस्था प्रीतीच्याअ - १ प्रेम , २ मान , ३ प्रणय , ४ स्नेह , ५ राग व ६ अनुराग .

प्रेमा मानः प्रणयं स्नेहो रागोऽनुरागः - इत्युक्तेः॥

सहा दुर्गुण - १ आळस . २ निद्रा , ३ भय ४ तृष्णा , ५ क्रोध व ६ कामः हे सहा दुर्गुण नाहींसे करण्याकरितां पुढचे दांत समांतर रेषेंत सारखे करण्याची एक प्रथा बाली बेटांत आहे . ( स्त्री नोहेंबर १९६३ )

सहा प्रकार भक्तीचें - १ श्रद्धाभक्ति , २ नैष्ठिकय भक्ति , ३ अवधान भक्ति , ४ अनुभव भक्ति , ५ आनंदभक्ति आणि ६ रमरस भक्ति , ( विवेक चिंतामणि द्वितीय परिच्छेद )

सहा प्रमुख वर्ग अन्न पदार्थांचे ( त्यांतील घटक द्रव्यांप्रमाणें )- १ पिष्टप्रधान , २ नत्रप्रधान ,- अंकुरित धान्यें , कंदमूळांतील जीवनरस इ . ३ स्नेहप्रधान - दूध वगैरे , ४ शर्करा प्रधान - फळांतील रस ५ शर्कराम्ल प्रधान - आम्ल फळांतील जीवनरास व ६ क्षार प्रधान - फळभाजी पालेभाजी इ . ( कौटुंबिक स्वास्थ्यांतून जागतिक शान्ति )

सहा प्रकार स्वागताचे - १ नुसतें बसविणें - बसा म्हणणें , २ हाताला धरून बसविणे , ३ जवळ बसविणें , ४ हाताला धरून जवळ बसविणें , ५ अतिजवळ बसविणें व ६ हाताला धरून अति जवळ बसविणें , यानें प्रेम व आदर याचें प्रमाण प्रदर्शित केलें जातें .

( गूढार्थ चंद्रिका )

सप्ततीर्थे - १ भगवद्भक्त , २ गुरु , ३ माता , ४ पिता , ५ पति , ६ पत्नी व ७ स्वतःचे शुचिर्मूत आचरण , हीं सप्ततीर्थे होत ( पद्म - भूमिखंड )

सात गुण क्षत्रियाचे - १ शौर्य , २ तेज , ३ धैर्य , ४ दक्षता , ५ रणशूरत्व , ६ दातृत्व आणि ७ ईश्वर भाव - नियामकशक्ति ( भा . गी . १८ - ४३ )

सात प्राकृत भाषाअ - १ मागधी , २ अवंतिजा , ३ प्राच्या , ४ शूरसेनी , ५ अर्धमागधी , ६ बाल्हीका व ७ दाक्षिणात्या .

मागध्यवंतिजा प्राच्या शूरसेनार्धमागधी ।

बाल्हीका दाक्षिणात्या च सप्तभाषा प्रकीर्तिताः ॥ ( भ . ना . )

सात मोक्षकला - १ विवेकसहित प्रेम , २ शांति , ३ तृष्णात्याग . ४ संतोष , ५ एकांतवास , ६ आत्मज्ञान व , ७ परब्रह्मज्ञान ( चातुर्य चिंतामणि )

सात शीलकला - १ सत्संग , २ ब्रह्मचर्य , ३ पवित्रता , ४ गुरुसेवा , ५ सदाचार , ६ निर्मला - शास्त्र - ज्ञान व ७ यशप्रेम ( चा . चिं . )

अष्ट आनंद - १ विषयानंद , २ ब्रह्मानंद , ३ वासनानंद , ४ मुख्यानंद , ५ निजानंद , ६ आत्मानंद , ७ अद्वैतानंद , आणि ८ विद्यानंद ( विवेक चिंतामणि )

आठ कारणें वस्तूचे ज्ञानास बाधक - १ अतिदूरता , २ अति जवळ , ३ इंद्रियदोष , ४ चित्तैकाग्र्‍याचा अभाव , ५ सूक्ष्मता , ६ अडथळे . ७ अन्य वस्तूंचे प्राबल्य व ८ तत्सम वस्तूशी मिश्रण , ( सांख्यकारिका ७ )

आठ गुण कमलपुष्पाचे - १ सौंदर्य , २ कोमलता , ३ प्रसन्नता - प्रफुल्लता , ४ सुगंध , ५ मधुरता , ६ स - रसता , ७ तेजस्विता व ८ अलिप्तता हे आठ गुण सूक्ष्म निरीक्षकांस दिसतात , ( गूढार्थचंद्रिका )

आठ गोष्टी प्रलयकालीं होणार्‍या - १ कुलपर्वत हालणें , २ धूमकेतू , ३ संवर्तकादि मेघ जमणें , ४ उलकापात , ५ अशनिपात , ६ रुधिरवृष्टि , ७ उत्तुंग जललहरी , ८ सर्वदिशा गडद अंधकारमय होतात . बाणमट्ट कांदबरी टीपा

आठ धर्मकला - १ प्राणिमात्रावर दया , २ परोपकार , ३ दान , ४ क्षमा , ५ समानभाव , ६ सत्य , ७ उदारता व विनय , ( चातुर्य चिंतामणि )

आठ प्रकाराचे गुरू - १ बोधक , २ वेधक , ३ निषिद्ध , ४ काम्य , ५ सूचक , ६ वाचक , ७ कारक व ८ बिहित , असे आठ प्रकार , ( विवेक चिंता - मणि प्रथम परिच्छेद )

आठ प्रकार लांचलुचपतीचे पण नांवे वेगळालीं - १ बादशहा अथवाअ मुख्य सत्ताधीश - पेशकश - खंडणी , २ प्रधान - नजर , ३ सरकारी

खात्यावरील मुख्य व्यवस्थापक - दस्तूर - वहिवाट , ४ खात्याचे सचिव - शुकराना - आभार प्रदर्शन , ५ कारकून - तहरीर - मजकूर ६ मुफती

( धर्म खात्याचा मुख्य ) मेहराना - कृपा , ७ सरकारी अधिकारी - जरीन - कांचन आणि स्वार शिपाई - सजावलान - देडेली . अशा प्रकारचे विशिष्ट शब्द व संकेत दोनशे वर्षापूर्वी निजामुल्मुल्काच्या राज्यांत वापरांत होते अशी एक आख्यायिका आहे . ( विडा रंगतो असा )

आठ स्थानें वणोंचाराचीं - १ उर , २ कंठ , ३ शिर , ४ जिव्हामूल , ५ दांत , ६ नाक , ७ ओठ आणि ८ तालु हीं वर्णोचाराचीं आठ स्थानें होत .

अष्टौस्थानानि वर्णानामुरः कण्ठः शिरस्तथा ।

जिव्हामूलं च दन्ताश्च नासिकोष्ठौच तालुच ॥

नऊ गुण ब्राह्मणाचे - १ शम , २ दम , ३ तप , ४ शौच , ५ क्षमावान् ‌ , ६ आर्जव , ७ ज्ञान , ८ विज्ञान आणि ९ आस्तिक्यबुद्धि . ( भ . गी . १८ - ४२ )

नऊ संख्या विशेष - ( आ ) १ पासून ९ पर्यंत अंक नऊ हा सर्व - श्रेष्ठ . कितीही मोठी संख्या असली तरी तिच्यांतील सर्व अंकांची बेरीज नऊ - पेक्षां कमीच येते , उदा . १८७८ = २४ = ६ . संख्येंत इतर कोणताच अंक नसेल तरच बेरीज ९ येईल . उदा . ९९९९ = ३६ = ९ अशा रीतीनें नऊ हा अंक पूर्ण निर्विकार आहे . १ पासून ८ पर्यंतचा कोणत्याहि अंकाचा असा स्वभाव नाहीं . ( गुढर्थ चंद्रिका )

१०

दहा फायदे शिकारीपासून होणारे - १ श्रेष्ठ व्यायाम , २ कफापचय - कफनाश , ३ मेदोपकर्ष - चरबी कमी होणें , ४ सर्वासहत्व - विविध ऋतु व क्षुत्पिपासा सहनशीलता वाढते , ५ पिकांचें व हिंस्त्र पशुपासून इतर प्राणिमात्रांचें संरक्षण , ६ स्थलपथशल्यशोधन - हिंस्त्र प्राणीमात्रांच्या वधानें मार्गातले अडथळे दूर करणें , ७ भूप्रदेशाचें निरीक्षण , ८ सत्त्वज्ञान - प्राणीमात्रांच्या भावनांचा अभ्यास , ९ वन्यजमातींचा विश्वास संपादन व १० उत्साहशक्ति - शौर्यादि गुणांची वृद्धि , ( दशकुमारचरित )

दहा जणांकडे जातांना रिक्त हस्तें जाऊ नये - १ अग्निहोत्र , २ गृह , ३ क्षेत्र , ४ मित्र , ५ भार्या , ६ सुत , ८ शिशु - कोणताही लहान मुलगा , ९ राजा व १० देवता ,

अग्निहोत्रं गृंह क्षेत्रं भार्या सुतं शिशुम् ‌ ।

रिक्तापाणिर्न पश्येत राजानं देवताम गुरुम् ‌ ॥ ( सु . )

११

अकरा गुणधर ( प्रमुख शिष्य ) महावीराचे - १ गौतम ( इंद्रभूति ), २ अग्निभूति , ३ वायुभूति , ४ शुचिदत्त , ५ सुधर्म , ६ मांडाव्य , ७ मौर्यपुत्र , ८ अकंपन , ९ अचल , १० मेदार्य आणि ११ प्रभास हे मूळचे ब्राह्मण व क्षत्रिय असून त्यांनी श्रीमहावीराकडून जैन धर्माची दीक्षा घेतली व त्यांनीं जैन धमतत्त्वांचा प्रचार केला ( अरिष्टनेमि पुराण संग्रह - हरिबंश )

१२

बारा कारण बुद्धिनाशाची - १ शोक , २ क्रोध , ३ लोभ , ४ काम , ५ मोह , ६ परासुता - परधार्जिणेपणा , ७ ईर्ष्या , ८ मान , ९ विचिकित्सा , १० हिंसा , ११ असूया व १२ जुगुप्सा , " द्वादशैते बुद्धिनाशहेतवो मानसा मलाः " ( कालिका पु . अ १८ )

बारा निदानें अथवा कारणें दुःखाचीं - १ अविद्या , २ संस्कार , ३ विज्ञान , ४ नामरूप , ५ षडायतन , ६ स्पर्श , ८ वेदना , ९ तृष्णा , उपादान , १० भव , ११ जाति आणि १२ जरामरण , अशी बारा कारणें बौद्भधर्मांत मानिली आहेत . त्यांस " द्वादशनिदान " म्हणतात .

( भारतीय तत्त्वज्ञान )

बारा महिन्यांतील बारामूर्ती ( श्रीविष्णूच्या ) बारा जातीचीं फुलें व फळें अनुक्रमें - १ विष्णु ( अशोक - डाळिंब ), मधुसूदन ( मोगरा - नारळ ), ६ त्रिविक्रम ( पाटली - आंबा ), ४ श्रीधर ( कलंब - फणस ), ५ ह्रषिकेश ( करवीर - खजूर ), ६ पद्मनाम ( जाई - ताडफळ ), ७ दामोदर

( मालती - रय आवळा ), ८ केशव ( सूर्यकमळ - बेलफळ ), ९ नारायण ( चंद्रविकासी कमळ - नारिंग ), १० माधव ( जुई - सुपारी ), ११ गोविंद

( उंडली - कखंद ) आणि १२ ? ( जायफळ ) स्कंद २ . ४४ ( प्रा . च . को . )

बारा स्थानें वर्णोचाराचीं - १ छाती , २ कंठ , ३ शिर ( तोंडातील मूर्धन्य स्थान ), ४ जिव्हा , ५ दांत , ६ नाक , ७ ओंठ आणि ८ तालु हीं आठ आणि आत्मा , बुद्धि , मन व सर्व शरीरभर असणारा जठराग्नि हीं चार वर्णप्रेरक बोजस्थानें अशा बारा स्थानांच्या संस्कारामुळें वर्णोच्चार होतो . ( वाग् ‌ विज्ञान )

 

१४

चौदा प्राचीन निरुक्त ग्रंथकार - १ आग्रायण , २ औपमन्यव , ३ औदुम्बरायण , ४ और्णवाम , ५ काथक्य , ६ क्रौष्टकि , ७ गार्ग्य , ८ गालव , ९ तैटीकि , १० वार्षायणि , ११ शाकपूणि , १२ स्थौलाष्ठीवि , १३ शतबलाक्ष आणि १४ यास्क . निरुक्तं चतुर्दश प्रमेदम्‌ ( दुर्गवृत्ति १ - १३ )

१६

सोळा लिपी भारतांत प्रचलित असलेल्या - १ देवनागरी , २ गुरुमुखी , ३ गुजराथी , ४ ओडीया , ५ आसामी , ६ बंगाली , ७ तेलगु ,

८ कन्नड , ९ तामीळ , ११ मल्याळम् ‌ , १२ अरबी , १३ फारसी , १४ उर्दू , १५ मोडी व १६ रोमन .

१७

सतरा प्रकार रास नृत्त्याचे - १ सलामी , २ साधी हातजोडी , ३ सीधी गुलाबहिया , ४ मोरपंखी , ५ मोरछल , ६ खेवा , ७ हातजोडी चक्कर , ८ गुलबहिया चक्कर , ९ चंद्रमुखी , १० सूरजमुखी , ११ आकाशमुखी , १२ चौघडा १३ चौमुखट , १४ ताजमुबारक , १५ खाली जोडा , १६ पलटा आणि १७ कुंजगलिया . ( सौतुल्मुबारक - वाजिद - अलीशहा )

२०

वीस उपभोगाचे विषय - १ घर ( वास्तु ), २ स्त्रान , ३ पादपीठ , ४ ताम्बूल , ५ विलेपनउटी , ६ वस्त्र , ७ पुष्प , ८ अलंकार , ९ आसन , १० पंखा , ११ सभास्थान , १२ पुत्र , १३ अन्न , १४ पेय पदार्थ , १५ पादप्रक्षालन , १६ यान - वाहन , १७ छत्र , १८ शय्या , १९ सुगंधी धूप , आणि २० स्त्री . ( अभिलषितार्थ चिन्तामणि , भाग १ ला )

२४

चोवीस चिन्हें हातावरीला - १ देऊळ , २ त्रिकोण , ३ स्वस्तिक , ४ मत्स्य , ५ शंख ६ ध्वाज , ७ झाड , ८ कमल , ९ रविचंद्र , १० धनुष्य , ११ अष्टकोन , १२ तलवार , १३ कुंभ , १४ छत्री , १५ भाला , १६ अंकुश , १७ त्रिशूळ , १८ पालखी , १९ तराजू , २० धनुष्य , २१ पर्वत , २२ माला , २३ तोरण आणि २४ वेदी , हस्तसामुद्रिक शास्त्राप्रमाणें त्या त्या चिन्हांच्या विशिष्ट अर्थाप्रमाणें त्या त्या व्यक्तीचें भाग्य प्रत्ययास येते म्हणतात . ( तुमचा हात तुमचे भाग्य )

३६

छत्तीस पाखंडें - १ वासुदेव , २ दिंडीगाण , ३ गोंधळीं , ४ डफ गाणे , ५ बहिरा , ६ जोगी , ७ बाळसंतोष , ८ बैरागी , ९ डाकुलता जोशी , १० आंधळा , १२ पांगुळ , १२ मुका , १३ कैकाडी , १४ शौरी म्हणजे हिजडा , १५ मुंडा , १६ कापडी , १७ वैद्य , १८ चाटे , १९ भाट , २० भांड , २१ भराडी , २२ नानक , २३ ठाकूर , २४ वाघ्या , २५ गारोडी , २६ बहुरूपी , २७ भुत्या , २८ चित्रकथी , २९ दरवेशी , ३० तुंबडीबाला ३१ वारांगना , ३२ पुराणीक , ३३ गवई , ३४ ज्योतिषी , ३५ मानभाव आणि ३६ ब्राह्मण ( दर्शन प्रकाश )

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP