मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संख्या १२

संकेत कोश - संख्या १२

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


बारा दोष मंत्र्यास वर्ज्य - १ कटुभाषण , २ कठोरशासन करण्याची प्रवृत्ति , ३ लोभ , ४ मद्य , ५ स्त्री , ६ मृगया , ७ द्यूत , ८ आलस्य , ९ ताठा , १० अभिमान , ११ प्रमाद व १२ भांडखोरपणा हे बारा दोष मंत्रिपदाधिष्ठित व्यक्तीस वर्ज्य मानिले आहेत . ( कांमदकीय - नीतिसार )

बारा नक्षत्रें विवाहास वर्ज्य - १ भरणी , २ कृत्तिका , ३ आद्रा , ४ पुनर्वसु , ५ पुष्य , ६ आश्लेषा , ७ पूर्वा , ८ विशाखा , ९ ज्येष्ठा , १० पूर्वाषाढा , ११ शततारका आणि १२ पूर्वाभाद्रपदा . हीं बारा नक्षत्रें विवाहास वर्ज्य मानलीं आहेत . ( धर्मसिंधु )

बारा नारद - १ मुनिनारद , २ ज्ञानीनारद , ३ तपीनारद , ४ योगीनारद , ५ ऋषिनारद , ६ वागीशनारद , ७ खेचरनारद , ८ कलिनारद , ९ देवर्षिनारद , १० भूगामीनारद , ११ कालज्ञानारद , आणि १२ मित्रनादर . असे बारा नारद नांवाचे मुनि प्राचीनकाळीं होऊन गेले .

( बृहन्नारदीय )

बारा नियम ( मंत्रसिद्धीस - १ भूमिशयन , २ ब्रह्मचर्य , ३ मौन , ४ गुरुसेवन , ५ त्रिकाळ स्नान , ६ पापकर्मपरित्याग , ७ नित्यपूजा , ८ नित्यदान , ९ देवतेचें स्तवन , १० नैमित्तिक पूजा , ११ इष्ट देवता व गुरुवार विश्वास आणि १२ जपनिष्ठा , हे बारा नियम पाळणारांचा मंत्र सिद्ध होतो . ( कल्याण साधनांक )

बारा नियम ( आत्मसंयमनासाठीं करावयाचीं कृत्यें व व्रतपरिपालन )- १ शरीर स्वच्छता , २ मन निर्मळ , ३ जप , ४ तप , ५ होम , ६ श्रद्धा असणें , ७ अतिथिसत्कार , ८ भजनपूजन , ९ तीर्थाटन , १० परोपकार , ११ समाधान आणि १२ गुरुशुश्रूषा .

शौचं जपस्तपो होमः श्रद्धाऽऽतिथ्यमदर्चनम् ‌‍ ।

तीर्थाटनं पराथेंहा तुष्टिराचार्यसेवनम् ‌‍ ॥ ( भा . स्कं . ११ - १९ - ३४ )

बारा पथ्यें योगाभ्यासास आवश्यक - १ देश , २ कर्म , ३ अनुराग , ४ अर्थ , ५ उपाय , ६ अपाय , ७ निश्चय , ८ चक्षु , ९ आहार , १० संहार , ११ मन व १२ दर्शन , योगाभ्यासांत सिद्धि प्राप्त होण्यास अशीं बारा पथ्यें सांगितलीं आहेत . ( रामतीर्थ दिवाळी अंक १९६० )

बारा प्रकार आलिंगनांचे - १ स्पृष्टक , २ विद्धक , ३ उद‌‍धृष्टक , ४ पीडितक , ५ लतावेष्टितक , ६ वृक्षाधिरूढक , ७ तिलतंडुलक , ८ क्षीरनीरक , ९ ऊरूपगूहन , १० जघनोपगूहन , ११ स्तनालिंम्गन आणि १२ ललाटिक ( वात्सायन - कामसूत्र )

बारा प्रकारचे गुरु - १ धातुर्वादी गुरु , २ चंदन , ३ विचार गुरु , ४ अनुग्रह , ५ परिस , ६ कच्छप ( कासवी ), ७ चंद्रा , ८ दर्पण , ९ छायानिधि गुरु , १० नादनिधि , ११ कौंचपक्षी आणि १२ सूर्यकांत गुरु . ( पां . प्र . अ . ५ )

बारा प्रकारच्या मुद्रा - १ धेनुमुद्रा , २ अमृतीकरण मुद्रा , ३ मत्स्य मुद्रा , ४ अवगुंठनीमुद्रा , ५ शंखमुद्रा , ६ मुसलमुद्रा , ७ चक्रमुद्रा , ८ परमीकरण मुद्रा , ९ महामुद्रा , १० योनिमुद्रा , ११ गुरुडमुद्रा व १२ गालिनीमुद्रा . ( तत्त्व - निज - विवेक )

बारा प्रकार श्राद्धाचे - १ नित्य , २ नैमित्तिक , ३ काम्य , ४ वृद्धि श्राद्ध , ५ सपिण्डन् ‌‍ , ६ पार्वण , ७ गोष्टी श्राद्ध , ८ शुद्धार्थ श्राद्ध , ९ कर्मांङ्र , १० दैविक , ११ यात्रार्थ आणि १२ पुष्टयर्थ श्राद्ध . यात्रा ह्मेकादशं प्रोक्तं - पुष्टयर्थं द्वादशं स्मृतम् ‌‍ ॥ " ( भविष्य - पु . )

बारा प्रमुख गोपाळ अथवा श्रीकृष्णाचे सवंगडी - १ श्रीदामा , २ सुदामा , ३ वसुदामा , ४ सुबल , ५ सुपार्श्व , ६ शुभांग , ७ सुंदर , ८ चंद्र - मान , ९ वीरमान , १० सूर्यमान , ११ वसुमान आणि १२ रत्नमान . असे बारा गोपाळ भगवान् ‌‍ श्रीकृष्ण आणि बलरामांचे प्रमुख सवंगडी होते . ’ वसुमानो रत्नमानो गोपाला द्वादशस्मृताः । ’ ( ब्रह्मवैवर्त - श्रीकृष्णखंड २७ - ६० )

बारा प्रमुख शिष्य खिरस्ताचे - १ पेत्र , २ अंद्रिया , ३ याकोव , ४ योहान , ५ फिलिप्प , ६ बर्थलमय , ७ शिमोन कानानी , ८ यहदा इस्कायोंत , ९ थोमा , १० मत्तय , ११ अलेफीचा पुत्र याकोव व १२ तद्दय , ( नवा करार मत्तय कृत शुभ वर्तमान अ . १० )

बारा पंथ नाथ संप्रदायाचे - १ सत्यनाथी , २ धर्मनाथी , ३ रामपंथ , ४ नाटेश्वरी , ५ कन्हड , ६ कपिलानी , ७ वैराग पंथ , ८ माननाथी ,

९ आईपंथ , १० पागलपंथ , ११ ध्वजपंथ व १२ गंगानाथी . या बारा पंथाच्या योग्यांना ’ बारहपंथी ’ योगी म्हणतात . ( नाथ सं . इतिहास )

बाराफुलें पूजेचीं - १ भीतिग्रस्तांस अमयदान , २ क्षुधितांस अन्न , ३ तुषितांस पाणी , ४ सांधूचा सन्मान , ५ विद्यादान , ६ विपद्‌‍ग्रस्तांना आश्रय , ७ रोग्याला औषध , ८ धर्महीनाला धर्मज्ञान , ९ शोकातुराला धैर्य , १० वाट चुकलेल्यांना मार्गदर्शन , ११ घर नसणार्‍यांना निवारा व १२ सर्वाभूतीं परमेश्वर अशी श्रद्धा ठेवणें , या बारा फुलांनीं केलेल्या पूजेनें भगवत्प्राप्ति होते . ( कल्याण मासिक )

बारा बहाई धर्माचीं सत्‌‍तत्त्वें ( सत्यें )- १ सर्व मनुष्य मात्राची एकता , २ सत्याचा शोध स्वतंत्र बुद्धीनें करणें , ३ सर्व धर्माचें मूळ एकच . ४ सर्वांच्या ऐक्यास धर्मच साधन आहे , ५ धर्म हा शास्त्रीय ज्ञान व तर्कशुद्ध विचार यांना सुसंगत असावा , ६ स्त्रीपुरुषांत समानता , ७ सर्व प्रकारचे पूर्वग्रह विसरले गेले पाहिजेत , ८ विश्वशांति , ९ सार्वत्रिक शिक्षण , १० आर्थिक प्रश्न अध्यात्मिक पातळीवरून सोडविणें , ११ जागतिअक अशी एक भाषा व १२ आंतररष्ट्रीय असें एक न्यायालय . ( सकाळ . १३ सप्टेंबर १९५९ )

बारा बलुते - १ सुतार , २ लोहार , ३ महार , ४ मांग , ५ कुंभार , ६ चांभार , ७ परिट , ८ न्हावी , ९ भट , १० भुलाणा , ११ गुरव आणि १२ कोळी . हे बारा वलुते म्हणजे गांवगाडयांतले जुने प्रमुख हक्कदार होत .

बारा बालग्रह - १ स्कंद , २ विषाख , ३ मेघ , ४ श्वान व ५ पित हे पांच पुरुषाकृति व ६ शकुनि , ७ पृतना , ८ शीतपूतना , ९ द्दष्टिपूतना . १० मुखमंडलिका , ११ रेवति आणि १२ शुष्क रेवती . या सात स्त्रीआकृति , असे बारा ग्रह मूळ शंकरानें कर्तिकेयाच्या रक्षणार्थ उत्पन्न केले पण ते मानवास पीडा करूं लागले अशी कथा आहे .

पुरा गुहस्य रक्षार्थं निर्मिताःशूलपाणिना ।

मनुष्याविग्रहाः पंच सप्त स्त्रीविग्रहा ग्रहाः ॥ ( वाग्मट उत्तरस्थान अ ३ )

बारा मल ( शरिरांतील )- १ रेत , २ रक्त , ३ मज्जा , ४ मूत्र , ५ विष्ठा , ६ नाकांतील मल , ७ कानांतील मल . ८ कफ , ९ अश्रु , १० डोळ्यांतील मल , ११ घाम आणि १२ नखांतील मल .

कर्णाक्षिनासिकाजिह्लादन्ताःअ शिश्नं गुंद नखाः ।

मलाश्रयौ कफस्वेदौ विण्मूत्रे द्वादश स्मृताः । ( वी . प्र . )

बारा महिन्यांचीं नांवें - ( अ ) ( वेदकालीन ) १ मघु , २ माधव ( वसंत ), २ शुक्र , ४ शुचि ( ग्रीष्म ), ५ नम , ६ नमस्य ( वर्षा ), ७ इष , ८ ऊर्ज ( शरद् ‌‍ ), ९ सहस् ‌‍ , १० सहस्य ( हेमंत ), ११ तपस आणि १२ तपस्य ( शिशिर ); ( आ ) ( भारतीय ) १ चैत्र , २ वैशाख , ३ ज्येष्ठ , ४ आषाढ , ५ श्रावण , ६ भाद्रपद , ७ आश्विन , ८ कार्तिक , ९ मार्गशीर्ष , १० पौष , ११ माघ आणि १२ फाल्गुन ; ( इ ) ( इंग्रजी ) १ जानेवारी , २ फेब्रुवारी , ३ मार्च , ४ एप्रिल , ५ मे , ६ जून , ७ जुलै . ८ ऑगस्ट , ९ सप्टेंबर , १० ऑक्टोबर , ११ नोव्हेंबर व १२ डिसेंबर ; ( ई ) ( पारशी ) १ फर्वर्दीन , २ अर्दिबेह्स्त , ३ खूर्दाद , ४ तीर , ५ अमर्दाद , ६ शेहरेवार , ७ मेहेर , ८ आबान , ९ आजुर , १० दय , ११ बहमन , व १२ इस्पिंदर ;

( उ ) ( हिजरी ) १ मोहरम , २ सफर , ३ रबिलावल , ४ रविलाखर , ५ जमादिलवल , ६ जमादिलाखर , ७ रज्जब , ८ साबान , ९ रमजान , १० शब्वाल , ११ जिल्काद , १२ जिल्हेज .

बारा महारथी ( कौरवांकडील )- १ दुर्योधन , २ भीष्म , ३ द्रोण , ४ कर्ण , ५ शल्य , ६ भूरिश्रवा , ७ अश्वत्थामा , ८ कृतवर्मा , ९ विकर्ण , १० कृपाचार्य , ११ दुःशासन आणि १२ जयद्रथ . असे भारतीय युद्धांत कौरवांकडील बारा महारथी होते .

बारा महाल ( शिवकालीन )- १ अंतःपुर , २ द्रव्यभांडार , ३ धान्यागार , ४ अश्वधन , ५ गोधन , ६ आरामक्षेत्र , ७ टंकशाला , ८ शिबिकादि यानें , ९ मंदिरें , १० महाल सौदागिरी , ११ महाल चौबिना व १२ वसनागार . ( पुण्य . छत्रपत्रि शिवाजी म . )

बारा महिन्याच्या बारा संक्रांति - १ धान्यसंक्रांत , २ लवणसंक्रांत , ३ भोगसंक्रांत , ४ रूपसंक्रांत , ५ तेजसंक्रांत , ६ सौभाग्यसंक्रांत , ७ तांबूलसंक्रांत , ८ मनोरथसंक्रांत , ९ विशोकसंक्रांत , १० आयुःसंक्रांत , ११ धनसंक्रांत व १२ मकरसंक्रांत ( म . वा . को . )

बारा मानव गुरु - १ विमल , २ कृशर , ३ भीमसेन , ४ मीन , ५ गोरक्ष , ६ भोजदेव , ७ मूलदेव ८ रंतिदेव , ९ विघ्नेश्वर , १० हुताशन , ११ समरानंद व १२ संतोष ( कौलवती तंत्र )

बारा मूर्खलक्षणें - १ परमेश्वराचें विस्मरण , २ वेळेचें मोल न समजणें , ३ आपण मोठे मानणें , ४ दोघे बोलत असतां मध्येंच जाऊन बसणें , ५ मोठयांची कुचेष्टा करणें , ६ प्राप्तीपेक्षां अधिक खर्च करणें , ७ समेंत उच्चासनावर बसणें , ८ भारी वटवट करणें , ९ उधार घेणें , १० आगांतुकी करणें , ११ अतिथी होऊन धन्यावर सत्ता गाजविणें व १२ स्त्रियांच्या अवयवांकडे नजर टाकणें . ( ढाईहजार अनमोल बोल )

बारा यम ( नियम - आत्मसंयमन )- १ अहिंसा २ यथार्थ भाषण , ३ परापहार न करणें , ४ विषयाची अनसवित , ५ मर्यादा ठेवणें , ६ संग्रह न करणें , ७ वेदांवर श्रद्धा , ८ ब्रह्मचर्य , ९ मौन , १० मन स्थिर ठेवणें , ११ क्षमा व सहनशीलता आणि १२ सर्वांस अमय देणें , हे बारा यम होत . ( भागवत स्कंध . ११ . १९ . ३३ ).

बारा राशि व त्यांचे स्वामी - १ मेष - मंगळ , २ वृषम - शुक्र , ३ मिथुन - बुध , ४ कर्क - चंद्र , ५ सिंह - रवि , ६ कन्या - बुध , ७ तूल - शुक्र , ८ वृश्चिक - मंगळ , ९ धन - गुरु , १० मकर - शनि , ११ कुंभ - शनि व १२ मीन - गुरु ( ज्योतिष )

बारा राजनीतिशास्त्रुप्रणेते - १ ब्रह्या , २ महेश्वर , ३ स्कंद , ४ इंद्र , ५ प्राचतेस , ६ मनु , ७ बृहस्पति , ८ शुक्र , ९ भारद्वाज , १० वेदव्यास , ११ भगवान् ‌‍ श्रीकृष्ण आणि १२ गौरशिरामुनि .

ब्रह्मा महेश्वरः स्कंदश्चेंद्रःअ प्राचेतसो मनुः ।

बृहस्पतिश्च शुक्रश्च भारद्वाजो महातपाः ॥

वेदव्यासश्च भगवान् ‌‍ तथा गौरशिरामुनिः ।

एते हि राजशास्त्राणां प्रणेतारः परंतपाः ॥ ( धनुर्वेदसंग्रह )

बारा रामनाम - १ श्रीराम , २ दशरथनंदन राम , ३ कौसल्यात्मज राम , ४ यज्ञोद्धारक राम , ५ अहल्योद्धरण राम , ६ त्राटिकामर्दन राम ,

७ धनुर्धारी राम , ८ सीतामिराम , ९ , वनवासी राम , १० मारुतिप्रिय राम . ११ रावणांतक राम व १२ अयोध्यावासी राम .

बारा लक्षणें व्याकरणाचीं - १ समास , २ वचन , ३ लिंग , ४ विभक्तित , ५ प्रत्यय , ६ अव्यय , ७ काल ८ नाम , ९ उपसर्ग , १० प्रयोग , ११ धातु , आणि ११२ संधि . हीं व्याकरणाचीं बारा लक्षणें होत . ( छ . शिवाजीराजे बखर )

बारा वृत्ति ( मनोव्यापार )- १ उदास , २ औदार्य , ३ खिन्न , ४ तामस , ५ प्रसन्न , ६ ग्लान , ७ शांत , ८ शोक , ९ संताप , १० सौम्य , ११ हर्ष व १२ हास्यवृत्ति . ( म . श . को . )

बारा वृत्ति ( रसानुकूल शब्दरचना अथवा अर्थ योजना )- १ गंभीरा , २ ओजस्विनी , ३ प्रौढा , ४ मधुरा , ५ निष्टुरा , ६ श्लथा , ७ कठोरा , ८ कोमला , ९ मिश्रा , १० परुषा , ११ ललिता आणि १२ आसिता . ( सरस्वती कंठामरण )

बारा शृंगारावस्था - १ चक्षुः प्रीति , २ मनःसंग , ३ संकल्प , ४ प्रलापित , ५ जागर , ६ कार्श्य , ७ अरति , ८ लज्जा , ९ त्याग , १० संज्वर , ११ उन्माद आणि १२ मूर्च्छनामरण , ( प्रतापरुद्र )

बारा श्रीविद्येचे उपासक - १ मनु , २ चंद्र , ३ कुबेर , ४ लोपामुद्रा , ५ मन्मथ ( कामदेव ), ६ अगस्ति , ७ अग्नि , ८ सूर्य , ९ इंद्र , १० स्कंद , ११ शिव आणि १२ क्रोधभट्टारक , ( दुर्वास ). हे बारा श्रीविद्येचे उपासक म्हणून प्रसिद्ध आहेत .

मनुश्चन्द्रः कुबेरश्च लोपामुद्रा च मन्मथः ।

अगस्तिरग्निः सूर्यश्च इन्द्रःअ स्कन्दः शिवस्तथा ॥

क्रोधभट्टारको देव्या द्वादशामी उपासकाः ॥ ( कल्याण शक्ति अंक )

बारा साध्वी स्त्रिया - १ अरुंधती , २ देवहुती , ३ लोपामुद्रा , ४ अदिती , ५ सावित्री , ६ लक्ष्मी , ७ पार्वती , ८ अनसूया , ९ इंद्राणी , १० विंध्यावली , ११ कयाधू आणि १२ देवकी . ( म . वा . को . )

बारा सुषिर वाद्यें ( भोकांतून वारा भरून वाजणारीं )- १ सनई , २ सुंदरी , ३ सूर , ४ अलगुज , ५ मुरली ( बांसरी ), ६ पांवा , ७ पुंगी , ८ शिंग , ९ कर्णा , १० तुतारी , ११ शंख आणि १२ मोरचंग .

बारा हवन द्रव्यें - १ चंदन , २ तीळ , ३ तूप , ४ साखर , ५ अगरु , ६ तगर , ७ कापूर , ८ केशर , ९ नागरमोथा , १० पंचमेवा , ११ जव आणि १२ तांदूळ ( कल्याण वर्ष ३३ ).

बारा क्षार अथवा शरीरांतील बारा घटकद्रव्यें - १ कलकेरिआ फॉस ( खटस्फुरिक ), २ कलकेरिआ फ्त्यूओर ( खट प्लोषक ), ३ कलकेरिआ सल्फ ( खटगंधिक ), ४ काली फॉस ( पालाश स्फुरिक ), ५ कालीमूर ( पालाश हरक ), ६ काली सल्फ ( पालाश गंधिक ), ७ नेट्रम सल्फ ( सामुद्र गंधिक ) १० फेरम फॉरस फॉस ( लोहस्फुरिक ), ११ मॅग्नेशिया फॉस ( मग्नस्फुरिक व १२ सिलिशिया ( सिकता ). मानवी शरीरांत मुख्य बारा क्षार आहेत असें जीवनरसायनशास्त्र मानतें . ( जीवन रसायन चिकित्सा शास्त्र )

बारा ’ क्षेत्रा ’ संबंधीं बारा अज्ञानें - १ परमात्मा , २ जीवात्मा , ३ बुद्धि , ४ अहंकार , ५ मन , ६ प्राण , ७ ज्ञानेंद्रियें , ८ ज्ञानेंद्रियांचे विषय , ९ कर्मेंद्रियें , १० कर्मेंद्रियांचे विषय , ११ शरीर आणि १२ विशालजगत ‌‍ . या वार क्षेत्रासंबंधीं बारा अज्ञानें - मिथ्या ज्ञानें वा विषरीत ज्ञानें मानवांत असतात . ( अथर्व - अनु . मराठी )

बाराजण दुर्गुणी होत - १ चांगले काम न करणार - शहाणा , २ धर्म नसलेला - म्हातार , ३ आज्ञाधारक नसलेला - तरुण , ४ दातृत्व नसलेला - श्रीमंत , ५ विनय सोडलेली - स्त्री , ६ कोणताहि सद्‌‍गुण नसलेला - धनी , ७ भांडखोर ८ गरीब असून गर्विष्ठ , ९ अधर्माचरणी , ब्राह्मण , १० अन्यायी शासनाधिकारी , ११ शिस्त नसलेले लोक व १२ कांहींच निर्बंध नललेलें राष्ट्र . ( भाग्यरेषा )

बाराजणांच्या बारा लक्ष्मी - १ ज्ञानलक्ष्मी - देवांची , २ मदलक्ष्मी - दैत्यांची , ३ विषलक्ष्मी - सर्पांची , ४ द्वव्यलक्ष्मी - मानवांची , ५ संचयलक्ष्मी - वैश्यांची , ६ संतोषलक्ष्मी - विप्रांची , ७ प्रतापलक्ष्मी - राजांची , ८ नम्रतालक्ष्मी - शूद्रांची , ९ वैराग्यलक्ष्मी - साधकांची , १० शांतीलक्ष्मी - सिद्धांची , ११ श्रद्ध - लक्ष्मी - भक्तांची व १२ आनंदलक्ष्मी - संतांची . ( देवीविजय )

बाराजणांना बांधून समुद्रांत बुडवावें - १ कुपुत्र , २ कुलक्षणी स्त्री , ३ भांडखोर शेजारी , ४ लाजिरवाणा मनुष्य , ५ दुष्ट बुद्धीचा बंधु ,

६ लंपट पुरोहित , ७ चोरटा चाकर , ८ आचरट पाहुणा , ९ मूर्ख धनी , १० अडणारा घोडा , ११ वाईट शेतकरी आणि १२ सदैव नकारघंटा वाजविणारा कारमारी , या बाराजणांना बांधून समुद्रांत बुडवावें , ( बिरबल )

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP