प्रकाशित कविता - रक्षिल कोण ?
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
[जाति लवङगलता]
जो तो सुत सोडुनि तुज जाऊ
रक्षिल कोण निदानीं आऊ ? ध्रु०
नऊ मास तू भार वाहिला यांचा अपुल्या पोटीं.
यांच्या पाथां लादूं बघशी भार म्हणुनि का बाऊ ? १
हृदयींच्या रक्तचें पाणी पाजुनि वाढविलें तू,
ठेविशि का मग ह्रदय अपाशी ? का ही माग न दाही ? २
वृक्षलत का व्यवहाराच्या साठी फुलती फळती ?
अपकाराचा व्यापारच करुं जातां काय भलाऊ ? ३
कोण्डूनी पञ्जरीं विहग का स्वस्थ सुखें राहिल तो ?
भुर्र ऊडुनि जायचीं पाखरें, मुलें तशींच पहा हीं. ४
पृथ्वीचा सुत चन्द्र कशाने फिरतो तिचिया भवती ?
स्वातन्त्र्यामधि का प्रेमाचें गूढाकर्षण नाही ? ५
केळफण्यांची वाढ यथास्थित खुल्या प्रकाशीं होवो.
म्हणुनिच गळती पारी काढुनि निज छत्रांची साऊ. ६
जलबिन्दूंना नभीं रविकरासवे जाऊं दे भूमी
कठिण समय येतांच धावुनी शान्तविती लवलाही. ७
मोकळीक दे आऊ, यांना आशीर्वादासङगें,
ठेवितील हे सुपर्ण अमृतकुम्भ तूझिया पायीं. ८
२ फेब्रूवारी १९३५
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP