प्रकाशित कविता - फटकळ अभङग ६
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
६.
अनायासें लाखों भक्त भोळसट, झाले ऐकवट तुझे दारीं.
त्यांना पटवूनी देऊ कटु सत्य, तुलाच अगत्य माझ्याहून.
आपुलालें पोट सारें टीचभर, त्यांत विश्वम्भर नाही नाही.
जनतेच्या कामीं निथळूं द्या घर्म, हेंच धर्मकर्म नीट जाणा.
विठोबा रख्माऊ पहा कोटयवधी, महाराष्ट्रामधी त्यांना भजा.
त्यांचिया सेवेने प्रसन्न तो होऊ. प्रत्येकांत राही जो देव तो.
सहकारयत्नीं भर्त्यांचें सामर्थ्य, हें न जाणा मर्त्य - अमर हें,
क्षितिजा भिडवा कर्तृत्वाची सीमा पण्ढरी - महिमा त्यांत आला !
१२ जुलै १९३५
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP