मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|प्रकाशित संग्रहीत कविता|
अवेळीं ओरडणार्‍या कोकिळास

प्रकाशित कविता - अवेळीं ओरडणार्‍या कोकिळास

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


[जाति दोहा]

भरे मसीच्या रङगाने  अफाट वर आभाळू,
दिसति पसरले दूरवरी हिरवळलेले माळू.

तृप्त दिसे ही वसुन्धरा  पाणी पडुनि अमाप.    
कडकडणारी वीजहि ती  निवली आपोआप.

घेतां पाऊस त्यांतूनी  थोडी अष्ट असन्त
अडकुन राहिल कोण घरीं करित बसाया खन्त ?

मुक्त मनाने मी पडलों फिरावया बाहेर,
खुलें प्रदर्शन पाचूचें पहावया चौफेर,

तों आर्तस्वर ये कानीं, ओळखिचा तो बोल
गूढ विसङगति जाणवुनी डहुळे हृदयीं खोल.

राऊंतुनि तोच स्वर ये, होऊ शङका दूर,
वसन्तदूताचाचि निघे शब्द फोडुनी अर.

हाच शब्द ऐकुनि मागे चमकुनि वदले लोक
रङिगत ऋतु अनुरागाचा आला सोडा शोक,

तोच स्वर दे काय कुणा नवलाचा आल्हाद ?
भलत्या वेळीं कोण अता करीलही संवाद ?

बाळपणींच्या मित्रा रे, ओळखिची ही हाऊ
अधळुनि दे हृदयामधली गत आशांची राख,

प्रियजन ते जवळ न आले ऊकुनि हृत्स्वर हाय !
असहय गजबजल्या जगतीं जिणें असे असहाय !

गेला गेला वसन्त तो, ये पळपाला पान,
तीव्र मूढ हट्टाने तू करिशि कुणा आव्हान ?

आरक्त न रानीं कोठे दिसावयाचा रङग,
असशी तू अपुल्या कवण स्वप्नामाजी दङग ?

फेक फेक सहकारीं त्या द्दष्टि अपाशी फेक -
सरस मञ्जरी मोहक ती चुकुनिहि नुरली ऐक,

तरुण मनाने असुनि गडया काय अता अपयोग ?
नव बाल्यें नटल्या जगता कळेल का हृद्रोग ?

अजुनिहि नाही का शमली तव वासन्तिक भूक ?
लावी वा चटका अजुनी तूज अमूक तमूक ?

वसन्त गेला रे गेला ! व्यर्थ प्रेम अगाध !
मूठ झाकली अघडुं नको मौनें लौकिक साध.

मुलेंहि वेडावीत अता देतील न पडसाद,
टळल्यावरती काळ तुझी घ्यावी कोणी दाद ?

पर्णकुटीमधि तू अपुल्या रहा मूक अज्ञात
शब्द अवेळीचा करितो अपकीर्तिच जगतांत.

कीव कुणाची नको. नको सहानुभूति अधार !
स्वराचेच जन हे भोक्ते शब्दानेच अदार.

वसन्त गेला रे गेला ! होऊ परि न निराश,
धीर धरी यापुरता की होय न सर्व विनाश.

सहासात मासांचा हा सोस अल्प वनवास.
कुणा सुभद्रेसाठी की त्रिदण्डि हा संन्यास.

वसन्त येतां क्षणीं पुन्हा ती भेटेलच तूज
करावयाला ह्रदयांची गूढ मधुर कुजबूज.

न जीवितीं परि मनुजाच्या पुनरपि येऊ वसन्त -
काय करावें रे त्याने जर न सदाची खन्त ? ‘

१५ जुलै १९३५

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP