प्रकाशित कविता - देवाची समाधि २
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
पाण्डुरङगा, आता कळलें मनास, स्वपदसंन्यास कां घेतला ?
विश्वशासनाचे चालती दण्डक, व्यक्तीची का मग लुड्बूड ?
अन्नतीचा मार्ग न कुणाला बन्द, घ्यावा लोकीं छन्द विचारून.
भवितव्यतेचा आपुलाल्या जो तो, शिल्पकार होतो स्वकष्टाने.
नको तो प्रसाद, नको अपकार, देवावरी भार आता नाही.
देव आणि काळ झाले असमर्थ, यन्तीं मात्र अर्थ आता अरे.
लोकांचिया यत्नें लोकांची उन्नति, हीच कर्मगति न दुसरी.
तरा किंवा मरा विठ्ठलाला काय ? ज्याचा तो उपाय का न करी ?
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP