प्रकाशित कविता - फटकळ अभङग ५
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
५.
पुरे झाली देवा, आजवर शोभा, मार आता तोबा भक्तांना या.
युगें अठ्ठावीस परवश जिणें, जणू मिरवणें प्रेतयात्रा,
कोणीही कोठून यावें झोडपावें. त्यांस निष्ठाभावें सेवितोंच !
ऐकमेकांवर खातों दातओठ, भरितों हें पोट अच्छिष्टाने.
सहस्रवर्षांचें साचलें हें काळें, त्यानेच सावळें तुझें रूप.
तुझ्या समाजाची हीच का धारणा ? देवा, विचारणा करितों मी.
काहीच का नाही दैन्याची या लाज ? पुरे योगिराज काळझोप !
जेणे हेलावेल चैतन्यसागर, असें काही कर तातडीने.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP