झालें, आहे, व्हायचें अन पुढे जें
त्या सर्वांचा जो नियन्ता अनादि,
अच्चानन्दप्राप्ति ज्याच्या कृपेने
त्या ब्रम्हाला आमुचा हा प्रणाम. १
“ॐ योभूतंच०” - अथर्व सं. १०।८।१.
आम्हांस जो देऊनि जन्म पाळी
जाणे विधी जो भुवनास सर्व,
जो ऐक घेऊ बहु देव नामें
पृच्छा तयाची करि भूतजात. २
“यो न: पिता जनिता०” - ऋ. सं. १०।८२।३.
अनन्य ऐशा परमात्मयाला
सम्बोधिती लोक बहुप्रकारें -
हा अन्द्र वा हा वरुणाग्निमित्र,
वा वेगवान दिव्य असा गरुत्मान
- आदित्य जो घे रस शोषुनी तो -
हा ऐक यालाच परन्तु देती
ज्ञाते असे लोक अनेक नावें
नानापरी वायु यमाग्नि अशीं, ३
“अन्द्रं मित्रं वरुण०” - ऋ. सं. १।१६४।४६.
कानीं पडो मङगल आमुच्या सदा
द्दष्टीं पडो मङगल आमुच्या सदा,
स्थैर्यें तुम्हां स्तवण्यांत देव हो,
हें आयु जावें तुमच्या प्रसादनीं. ४
“भद्रं कर्णेभि:०” - वाज. सं. २५।२१.
सर्वेश्वरा तूजविना न कोणी
राही दुजा व्यापुनि वस्तुजात;
हव्यार्पणींचा पुरवूनि अच्छा
व्हावेंच आम्ही प्रभु सम्पदांचे. ५
“प्रजापते न त्वदे०” - ऋ. सं. १०।१२१।१०.
जो निर्मिला नेत्र सतेज देवें
तो भानु य़ेऊ वरती चढून,
शताब्द आम्हीं रवि हा पहाव.
सताब्द आम्हीं जगतीं जगावें.
शताब्द आनन्द करीत आम्हीं
शताब्द मोदांत असें रहावें.
होऊनि लोकांत शतायु आम्हीं
शताब्द शब्द श्रवणीं श्रवावे,
शताब्द भाशा करुनी प्रकर्षें
शताब्द व्हावें जगतीं अजिङक्य;
तेजस्त्रि आय़ू अमुचें असें हें
अन्तीं विरावें परमात्मबोधीं. ६
“तच्चक्षुर्देवहितं०” - तै० आर० ४।४२।५,
जो देव नामें सविता तयाचें
तें तेज आम्ही स्पृहणीय घ्यावें.
बुद्धीस नानाविध आमुच्या की
देऊल तत्काळ सुचालना तो. ७
“तत्सवितुर्वरेण्यं०” - चतुर्ष्वपि वेदेषु.
नित्याकडे ने मज नश्वरांतुनी,
ज्ञानाकडे ने मज अज्ञतेंतुनी,
रे मृत्युपासून करुनिया दुरी
प्रभो, मला पोचव अमृताकडे. ८
“असतो मा०” - वृहदार० १।३।२८.
ऐकत्र या, ऐकमुखींच बोला,
चित्तीं तुम्ही ऐक विचार ठेवा,
पूर्वी जसा तो हवि घेत देव
साधा तसें अच्छित ऐकमत्यें. ९
“सङ्गच्छध्वं०”
सर्वत्रांची प्रार्थना ऐक व्हावी,
सर्वत्रांचा सङघडी ऐक व्हावा,
सर्वत्रांचें होऊं द्या ऐकचित्त,
सर्वांसाठी मन्त्र मी ऐक गातों
सर्वांसाठी समतेनेच देतों
आशालागी हवि मी ऐक आता. १०
“समानो मन्त्र;०”
व्हावी अच्छा सकलांचीच ऐक,
सर्वत्रांचीं हृदयें ऐक व्हावीं,
सर्वत्रांचें मन तें ऐक होवो
ज्यायोगें सङघटना, श्रीहि लाभे. ११
“समानी व आकूति;०” - ऋ. सं. १०।१९१।२।४.
८, ९ व १० जानेवारी १९३९