मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|प्रकाशित संग्रहीत कविता|
रक्षिल कोण ?

प्रकाशित कविता - रक्षिल कोण ?

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


[जाति पञ्चकल्याणी]

होऊ खेडयांतुनि बोभाटा,
सर्जेराव मारितो वाटा,
बन्दूक बाळगी, काडतुसांचा साठा. १

कोणी बेरड हा न अडाणी
याचा वेष फाकडयावाणी.
तोण्डावर खेळे किती शहरचें पाणी. २

त्याला भीत सर्वही कां की
पटका, कोट, चोळणा खाकी,
ऐटीने नियमितपणें पाऊलें टाकीं. ३

लागे कुणी न त्या साङगाती
जाऊनि तडक गुन्हाळें गाठी
पैक्याच्या साठी करी कडक दमदाटी ४

भरती हाट न आठवयाचे
बसती बैल घरीं छकडयाचे
दुर्दैव सदाचें या कष्टाळु गडयांचें ! ५

वार्ता जाय मुख्य नगराला,
चर्चाविषय नवीन जहाला.
स्वस्थताच अजुनी, की पेठेंत न घाला. ६

चाले राऊळांत जयघोष
पोचे आंत न तो आक्रोश
जरि शेतकर्‍यांच्या पडे घशाला शोष. ७

अमुचे नि:शस्त्रांचे राजे
य़ांचें वैभव काय विराजे !
आसेतुहिमाचल यांचा महिमा गाजे. ८

म्हणती शेषशायि भगवन्त
न करी कलिकलहाची खन्त
जो दुर्बल जन विश्वसे तयाचा अन्त ! ९

येतां दुष्ट लहर माजाची
सर्जेराव सतींना जाची;
अबलाच कामनापूर्ति जगीं प्रबलांची ! १०

घेतां लज्जा अशि लक्ष्मींची
दीनहि कुठवर करितिल चीची ?
गररक्त उसळतें. ऐकवे न ती छीछी ! ११

मारूं अथवा मरुनी जाऊं,
आला तोहि कुठून लढाऊ ?
ही धार विळ्याची बन्दुकीस त्या दावूं १२

पडला ऐक गडी घायाळ,
अठला तोच दूसरा काळ.
घालुनी पेच मोडिला हात तत्काळ. १३

आता हाड हाड मोडा रे !
मागुनी जिवानिशी सोडा रे,
अन खेडयापाडयांतुनी यास ओढा रे. १४

परि ही चीड ओसरुनि जातां
होतिल झणि मेण्ढयापरि आता
सोसाया पुनरपि कष्टुनि नमवुनि माथा. १५

७ मार्च १९३५

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP