प्रकाशित कविता - फटकळ अभङग ३
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
३.
तुझे भक्तगण तुझें देवपण घेती हिरावून पाण्डुरङगा.
तुला स्वतापरी मानूनि साचार, सारे सोपस्कार करिती ते.
चुकूनि ये तुझें नाम जिव्हेवर, पापाचे डोङगर भस्म होती
तुझ्या नामाचा हा विचित्र महिमा, केवी न्यायसीमा ओलाण्डी रे ?
जनांत जाणूनि स्तुतीचा प्रभाव, देवाचा ते भाव ठरविती.
दागिन्यांनी तुझें करिती कौतुक, की शृङगारसुख जाणती ते.
मोकळे कराया वाटेल तो छन्द, तुझें तोण्ड बन्द नैवेद्याने,
अशा भगतांचा होशी देवा राणा - आहेस शहाणा, काय साङगू ?
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP