प्रकाशित कविता - सिंहाचा पाडाव
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
[सुनीत]
‘बचेंगे तो औरभी लढेंगे’ - दत्ताजी शिन्दे.
नीचांना न रुचे मृगेन्द्र चढतां तो स्वीय सिंहासनीं,
‘छे हा योग्य न धर्मराज’ ! म्हणुनी हो ऐक कोल्हेकुऊ,
अन भोळे पशु काळजींत पडती, माजेल येणें दुही
नेता निष्ठुर धूर्त काय न लगे या शान्तियुद्धाङगणीं ?
हाकाटी तुज पञ्जरीं पकडण्यासाठी कुठे काननीं -
ये कोणासहि पडक तो अडवितां निष्पाप पडकेरुहीं
सुर्याला न चुकेच सन्धि मिळतां ग्रासावया राहुही -
हें आश्चर्य न बन्धनीं पडुनि तू जम्बूक होतां धनी.
‘झाली क्रान्ति,’ म्हणे कुणी, ‘प्रग्गति ही हिंसा न होतां मुळी !
होऊ पाशव शौर्य पार लटिकें सत्य प्रयोगांत या !
प्रायश्चित्तच घ्या नखें अतरुनी की हो स्वधर्मच्युती’ -
तों माहात्म्य खरें तुझें असळुनी गर्जे, ‘सुखें द्या सुळीं !
नाही मी त्यजिला स्वधर्म, न कधी सोडीन जातां लया -
मारा शम्भुपरी, तुळापुर करा, आत्म्यास नाही मृती.’
२८ जुलै १९३८
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP