प्रकाशित कविता - श्रावणांतलें ऊन
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
[जाति दयिता]
शाळा सुटली आणि जसें कारञ्जाचें पाणी
तशीं मुलें वाहिर पडलीं उसळुनि गोजिरवाणीं.
मोकळिकीच्या मोदें ये म्लान मुखींहि तजेला,
हां हां म्हणतां दिवसाचा शीण मावळुनि गेला.
नभ:पट जसा वरी दिसे अडतां बलाकमाला
तशी दिसे रथ्या सगळी सुटतां बालक - शाला.
पायचाकिवर तों कुणि ये त्वरें वाजवित घण्टी
आवरे न ती आवरतां - प्राण आणि ये कण्ठीं !
पोर कुणी गवसून पुढे पडे धाडकन खाली
पुस्तक पाटी आणि वहया विस्तरल्या भवताली.
धावुनि मी अचलुनि घेतां पोर दिसे बेशुद्ध.
पायचाकिवाल्या भवती जमले दुसरे क्रुद्धा.
वैद्यघरीं अपचारें ती शुद्धीवरती आली,
केवळ भीतीचा धक्का, नसे दुखापत झाली.
सोपवुनी मी तिला घरीं जवळच घर तें होतें.
परत फिरे मी तों अठलें मम मनिं वादळ मोठें.
अशीच माझी कन्या ती, असेल ना सुखरूप !
नयनीं पाणी भरे तसा मनिं अन्धार गुडूप.
पोर पाहिली बागडती मी जंव घरिं येऊन
लक्ख पसरलें तंव हृदयीं श्रावणांतलें अन.
२५ नोवेम्बर १९३६
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP