प्रकाशित कविता - चित्रांचा रङगविलास
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
[जाति अचलगति]
चित्रांचा हा सायडकाळ,
चित्रविचित्र पहा आभाळ,
रौप्य गिरीचा नभीं प्रसार,
खोरें वृक्षश्यामल फार,
क्षितिजीं कोठे दिसतो दूर
औलटा जणु ओघळतो धूर
नभोगिरीला तोण्ड पडून
कुठे रुपेरी वरसे अन.
चैतन्य पहा हें अनिवार
तळपे हिरवें गार शिवार.
घेती कणसें तेज पिऊन,
व्हाया पिवळीं सोन्याहून/
कारळिच्या पुष्पांत सवङग
होऊ सोन्याचा हा रङग
निम्नोन्नत हा कृष्णाकाठ
शरद्दतूचा दावी थाट.
मेघांचे हे चञ्चल रङग.
बघुनि गिरीसहि सुचती ढङग.
मेघांच्या पडछाया देख
गिरिदेहीं पडतात सुरेख,
डोङगर करडे वृक्षविहीन
डोङगर नील नभांत विलीन.
पालटती सरडयपरि रङग,
पाहुनि होऊ मानस दङग.
अस्तगिरीच्या भवती गोल
अडती रङगाचे कल्लोल -
निळे, जाम्भळे, काळे रङग,
राखी, ताम्बुस, पीत, पिशङग;
रुपें कुठे कोठे भिङगार
भूवर पाचू हिरवी गार.
सृष्टि रवीसह खेळे रङग
क्षणभरि सङगामधि निस्सङग !
जाय रङगुनी रवि अस्तास
रङगें भरुनी भू - आकाश.
रङग लुटा या रानोमाळ
चित्रांचा हा सायङकाळ.
२२ ऑक्टोबर १९३५
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP