मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|प्रकाशित संग्रहीत कविता|
फटकळ अभङग ४

प्रकाशित कविता - फटकळ अभङग ४

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


४.

कटीवर हात ठेवूनि तिष्ठत, पुढे काय गत पाण्डुरङगा ?
भक्तांनी घातले तुला हे दागिने,पराक्रमाविणें टिकती न.
अपुलिया बळें राही न सदाचें, तुझें पाषाणाचें राऊळही.
रहाया अभङग सुन्दर हें ध्यान, हवें अधिष्ठान कशाचें रे ?
रक्षितील काय दुबळे भगत ? सोमनाथ - गत नाठवे का ?
भक्त आटपतां तूच जगतात, होशील अनाथ जगन्नाथा !
ऐहलोकीं कर भक्तांना समर्थ, आज काय अर्थ परलोकीं ?
टाक योगनिद्रा, ऐक शब्द माझा, पण्ढरीच्या राजा विठ्ठला रे !

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP