मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|प्रकाशित संग्रहीत कविता|
सुखरूप आहे ना ग ?

प्रकाशित कविता - सुखरूप आहे ना ग ?

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.



सुखरूप आहे ना ग
माझी बोबडी बाहुली
रानजाऊची सानुली
रूपकळी ? ७
सुखरूप आहे ना ग
माझी साळुङकी मञ्जुळ
रानझरी झुळझुळ
वाहणारी ? ८
सुखरूप आहे ना ग
माझी हासरी चान्दणी,
मायमाण्डीच्या कोन्दणीं
हिरकणी ? ९
सुखरूप आहे ना ग
माझी गौर झोल्यावर
गात ओवी गळ्यावर
पहिली ती ? १०
सुखरूप आहे ना ग
चन्द्रज्योतच घरींची
हृदयींच्या झुम्बरींची
स्नेहप्रभा ? ११
सुखरूप आहे ना ग
पोर आप्पाशी खेळून
नाना गार्‍हाणीं साङगून
झोपलेली ? १२
सूखरूप असशी ना
माझ्या चिमण्यांची आऊ
जिच्या जिवावर राही
निश्चिन्त मी ? १३

२० मे १९३५

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP