प्रकाशित कविता - कोण्डमारा
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
[जाति केशवकरणी]
नभ:पटावर पातळ कोठे दाट पसरलें शिरें
म्लान हो वसुधामुख गोजिरें.
घाम फुटे अङगास गदगदुनि जीव होय घाबरा,
हुरहुर गूढ शिवे अन्तरा.
गुदमरणार्या या जीवाची हाक स्वाभाविक
अशी दे साद मधूनच पिक.
अल्प नीलिमा निर्मल तो ही दूर क्षितिजावरी
सुखद जो सखिच्या नयनापरी
पण का न कोसळुनि पडे अजुनि हें नभ ?
कडकडे का न ती वीजहि अचिरप्रभ
कधि सुटेल मादक मातीचा सौरभ ?
कुठे शान्ति जी सर सरल्यावर वातावरणीं बिरे,
मुदें नव अवनीवदनीं स्थिरे ?
८ जून १९३५
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP