लोकगीत - गीत चोवीसावे
लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात.
माळ तूं गुंफ गळ्यांत मी घालीन
सोन्य़ाची सुपली मोत्यानं गुफली ।
धाकटी चंद्रावळ बाई खेळाया गुतली ।
खेळतामेळता गोविंदानं देखिली ।
"सोड सोड गोविंदा मी वैताग घेईन ।
वैताग घेईन मी मळ्यांत जाईन ।
मळ्यांत जाईन मी जाईजी होईन ।
मी जाईजी होईन तूं सुतार होशील ।
तूं सुतार होशील फुलं मी तोडीन ।
तूं फुलं जी तोडशील माळ मी गुफीन ।
माळ तूं गुफ मी गळ्यांत घालीन ।"
N/A
References : N/A
Last Updated : January 23, 2018
TOP