लोकगीत - गीत चौतीसावे
लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात.
आली पंचमी बुधवारीं । पुसा नक्सीतरावरी ।
रुक्मिणी न्हाणुं आलं । देवई नातु झालं ।
पुज देवई आनंदाला । रुपियाच खन खांब ।
वरचा कळस सोनियाचा । आणल्या त्या गज न काठ्या ।
मोतीयाच्या कोरीव जाळ्या । हेलबाळ्या हेलायाच्या ।
लाजूनी रुक्मिणी । उभी परस वो दारीं ।
कंबरला माचूपट्टा । चालती झरुझरा ।
नेसली जरीस्तार कांठी । चोळी लीली वो बादली ।
विंचरी त्या कुरळ क्यास । नारी गुंफिताती वेणी ।
उभी सूर्या वो संमुख । पड उजेड लकोलका ।
भांग भरला मोतियानं । कानीं लीली भोकरघाट ।
गळ्या दार्पण पुतळ्या । मुख भरलं तांबुलानं ।
नेत्रं भरलीं काजळानं । ललाट भरलं कुंकवानं ।
दलाल भरलं गुललानं । कपाळीं ग आडवी चीरी ।
नाकीं लीली वो वीसुर । पाय भरलं पैंजणानं ।
बोटं भरली जोडव्यानं । आली पोलार वाजवीत ।
दिलं मखमली डेर ।काय न्हाणाचं कौतिक झालं ।
पीटिलं लीटी ठेवून शरण ।
N/A
References : N/A
Last Updated : January 23, 2018
TOP