लोकगीत - गीत छत्तीसावे
लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात.
हरीनं मुरली वाजिवली हो वाजिवली
हरीनं मुरली वाजिवली वो वाजिवली ।
राधा गवळण घाबरली वो घाबरली ।
पंढरीला जायाची वो जायाची ।
सांग साडी नेसायची वो नेसायची ।
वाळवंटी जायाची वो जायाची ।
वाळ्वंटी मक्का की मक्का की ।
विठ्ठल आमुचा सखा की वो सखा की ।
हरीनं मुरली वाजिवली वो वाजिवली ।
राधा गवळण घाबरली वो घाबरली ।
पंढरीला जायाची वो जायाची ।
सांग साडी नेसायची वो नेसायची ।
वाळवंटी जायाची वो जायाची ।
वाळवंटी हराळी वो हराळी ।
विठ्ठल आमुचा मुर्हाळी वो मुर्हाळी ।
हरीनं मुरली वाजाविली वो वाजविली ।
राधा गवळण घाबरली वो घाबरली ।
पंढरीला जायाची वो जायाची ।
सांग साडी नेसायची वो नेसायची ।
वाळवंटी जायाची वो जायाची ।
वाळवंटी दवूणा हो दवूणा ।
विठ्ठल आमुचा मेहुणा वो मेहुणा ।
सासर - माहेर
असं माहेर गोड बाई खेळाया धाडीतं ।
असं सासर दोड बाई कोंडून मारीतं ।
N/A
References : N/A
Last Updated : January 23, 2018
TOP