लोकगीत - गीत एकतीसावे
लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात.
हरि बा हरि नारायण धन बा धन नारायण ।
हरहर पंढरी काय वो झाली । समदी सोन्यानं मढवली ।
विठ्ठलदेव राज करी ।
राज करीता करीता । गेला माळणीच्या मळा ।
आणलीं शेवंतीची रोप ।
टाकिलीं वंजार्याच्या घरीं । वंजारीदादा पाणी घाली ।
पाणी घालीता घालीता । त्याला कळ्या आल्या भारी ।
राम तोडी । लक्ष्मण दुरडया भरी ।
या दुरडयाच्या काय काय परी । नाग डुलतो चाफ्यावरी ।
यावं हरि बसावं पलंगावरी । आबीरबुक्का झोकितो गळ्यावरी ।
हर हर पंढरी कायवो झाली ।
N/A
References : N/A
Last Updated : January 23, 2018
TOP