घोड्याचा खेळ
लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात.
जकडीचा किंवा घोड्याचा खेळ
एक म्हणते..... बाई बाई जागा सारवूं का?
दुसरी.......नग.
पहिली ...... बाई बाई एवढी जागा सारवूं कां ?
दुसरी.......नग.
पहिली...... बाई बाई एवढी जागा सारवूं कां ?
दुसरी.......नग.
पहिली....... दाणे वाळत घालूं कां?
दुसरी.......घाला.
पहिली....... चिमण्या खात्याल कीं?
दुसरी........ खाऊ परत्या.
पहिली....... दाजीबा मारत्याल कीं ?
दुसरी....... मारु परत्या.
दुसरी ...... दाणं कुणी खाल्लं?
पहिली ...... चिमण्यांनीं खाल्ल.
दुसरी ....... गीता कुठं गेली?
पहिली ........ बाळंतपणाल गेली.
दुसरी ........ काय झालं?
पहिली ........मुलगा झाला.
दुसरी ........ कसला झाला ?
पहिली ........ काळा काळा भिन्न झाला
पहिली ....... गोरा गोरा हळदीचा ओंडा रेशमाचा गोंडा
दुसरी ......... एवढी एवढी अफू देऊन माराया नव्हतं आलं ?
आजी......... अगबाई माझा नातुक नातुक ।
N/A
References : N/A
Last Updated : January 25, 2018
TOP