लोकगीत - गीत एकोणचाळीसावे
लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात.
सई सुट । मामा उठ।
मामा गेलेत तेलंगपुरीं बाई तेलंग पूऽरीं ।
त्यांनी आणल्या लाल लाल साड्या बाई लाल लाल साऽड्या ।
आम्हीं नेसुनी केलं पाणी बाई केल पाऽणी ।
तिथं होता धाकला दीर बाई धाकला दीऽर ।
एक चाबुक चमकाविलं बाइ चमकावीऽलं ।
एक चाबुक दुरच्या दुरी बाई दुरच्या दूऽरीं ।
माझं माह्यर पंढरपुरीं बाई पंढरपूऽरीं ।
माझं आजोळ रत्नागिरी बाई रत्नागीऽरी ।
रत्नागिरीच्या टाक्यावरी बाई टाक्यावऽरी ।
शाळू होळीच्या चाफ्यावरी बाई चाफ्यावऽरी ।
आनांत ग वनांत ग चाफ्याचं फूल माझ्या कानांत ग ।
लवंगा घातल्या उन्हांत ग ऐकू गेलय् मुंबईत ग ।
N/A
References : N/A
Last Updated : January 23, 2018
TOP