झेपा - हित बाई इंचु चावला ग बाय ...
लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात.
हित बाई इंचु चावला ग बाय
हित बाई इंचु चावला ग बाय ।
डोंगरी दिवा लावला ग बाय ।
हित बाई साप चावला ग बाय ।
डोंगरी दिवा लावला ग बाय ।
हित बाई इंगळी चावली ग बाय ।
डोंगरी दिवा लावला ग बाय ।
हें काय ?
डोक्स
डोक्स्यावर काय ?
मास
मासावर काय ?
केस
केसावर काय?
पदर
पदरावर काय ?
चुंबळ
चुंबळीवर काय?
पाटी
पाटींत काय ?
गोपा
घाल पोरी झेपा । पाटींतला गोपा ।
==
भाजी घ्या भाजी
"भाजी घ्या भाजी"
"नग"
"भाजी घ्या भाजी"
"आण इकडं कशाची?"
"मेथीची"
"पैशाची किती?"
"वीस"
"बाई बाई दरवाजा केवढा?"
"एवढा न् एवढा"
"लोखंडी सारजा पाणी भर गिरजा "
"खालीं पडलय झेलून घ्या"
N/A
References : N/A
Last Updated : January 23, 2018
TOP