लोकगीत - गीत बेचाळीसावे
लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात.
"आई मी खेळाय जातों ।"
"जागे तूं माझ्या लेकी ।"
"आई मला नेसाया नाहीं ।"
" घे जा ती वहिनीची साडी ।"
वहिनी बा राग भरेल ।
दादा बा डोळे मोडितो ।"
"आई मी खेळाया जातों ।"
"जा गे तूं माझ्या लेकी ।"
"आई मला अगांत नाहीं ।"
"घे गे ती वहिनीची चोळी ।"
"वहिनी बा राग भरेल ।
दादा बा डोळे मोडितो ।"
"आई मी खेळाया जातों ।
आई मला कानांत नाहीं ।"
"घेजा ती वहिनीची कडी ।"
"वहिनी बा राग भरेल ।
दादा बा डोळे मोडितो ।"
"आई मी खेळाया जातों ।"
"जागे तूं लाडक्या लेकी ।"
आई मला डोईत नाहीं ।"
घे जा तें वहिनीचें फूल ।"
वहिनी बा राग भरेल ।
दादा बा डोळे मोडितो ।"
N/A
References : N/A
Last Updated : January 23, 2018
TOP