झिम्मा - सई सई गोविंदा येतो सई सई...
लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात.
सई सई गोविंदा येतो
सई सई गोविंदा येतो । मजवरी गुलाल फेकीतो ।
या या गुलालाचा मार । आमच्या येण्या झाल्या लाल
आमच्या येण्या गोकुळीं । सोनाराच्या साकूळी ।
घडव घडव रे सोनारा । माणिक मोती डुलारा ।
डुलाराला खिडक्या । आम्ही बहिणी लाडक्या ।
लाड सांगूं बापाला । मोती लावूं कपाळा ।
==
झिमा पोरी झिमा । झिमाच्या हातीं । नाकांतलं मोती ।
पायांतल वाळ । वाज खुळखुळ ॥
N/A
References : N/A
Last Updated : January 23, 2018
TOP