लोकगीत - गीत सव्वीसावे
लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात.
दवणा नव्ह बाई दवण्याची गाडी दवण्याची गाडी ।
भोळाशंकर बांधीत माडी बांधीतो माडी ।
माडी बांधुनी कमाई केली कमाई केली ।
आमची गौराई वंजायला गेली वंजायला गेली ।
वंजच बैल येत्याल डुलत येत्याल डुलत ।
जरीच रुमाल येत्याल उडवीत येत्याल उडवीत ।
सोन्याचीं कारली येत्याल झेलत येत्याल डोलत ।
N/A
References : N/A
Last Updated : January 23, 2018
TOP