विविध अभंग - ६९४४ ते ६९५०
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
भराड अभंग.
॥६९४४॥
हातीं डउर निज बोधाचा । ज्ञान त्रिशूळ वैराग्याचा ॥ शांतिविभुतीचें लेपन । बरवें दावीं सुदर्शन ॥१॥
सोम सोनारीच्या देवा कानीं विभुतीच्या मुद्रा । भाळीं शोभे अर्ध चंद्रा ॥ माथां केउराचा भार । निजवृत्ती निर्विकार ॥२॥
काखे ब्रह्मांडाची झोळी । पृथ्वीपात्र करतळीं ॥ अष्ट भैरवांचा राव । देह आत्मा सदाशिव ॥३॥
जेथें भाव देखे मनीं । तेथें करी पुंगी ध्वनी ॥ पुंगी महावाक्य जाणा । सावध करी योगीजना ॥४॥
कोणी करा दान पुण्य । उभें केलें कां अझुन ॥ नका भार घेऊं माथा । भावार्थ अर्पावा भगवंता ॥५॥
बहेना विवेक सांगे लोकां । सद्गुरु ह्मणे माझा तुका । आतां येणें जाणें ना देहे । आत्मा अखंड सुख भोगी हे ॥६॥
==
डोई फोडा अभंग.
॥६९४५॥
तम भज्याव ते बुरा जिकीर ते करे । सीर काटे ऊर कुष्टे ताहां सब डरे ॥१॥
ताहां एक तु ही ताहां एक तु ही । ताहां एक तुही रे बाबा हमें तुह्में नहीं ॥२॥
दिदार देखो भुले नहीं किशे पछाने कोये । सचा नहीं पकडुं सके झुटा झुटे रोये ॥३॥
किसे कहे मेरा किन्हे सात लिया भास । नहीं मेलो मिले जीवना झुटा किया नास ॥४॥
सुनो भाई कैसा तो ही । होय तैसा होय । वाट खाना कहना एकबारां तो ही ॥५॥
भला लिया भेक मुंढे । आपना नफा देख ॥ कहे तुका सो ही संका । हाक अल्ला एक ॥६॥
==
मलंग अभंग.
॥६९४६॥
नजर करे सो हि जिंके बावा दुरथी तमासा देख । लकडी फांसा लेकर बैठा आगले ठकण भेख ॥१॥
काहे भुला एक देखतां आंखो मार तडांगो बाजार ॥२॥
दमरी चमरी जो नर भुला । सोत आघो हि लत खाये ॥३॥
नहि बुलावत किसे बाबा आप हि मत जाये । कहे तुका उस असाके संग फिरफिर गोते खाये ॥४॥
==
गाई अभंग.
॥६९४७॥
आम्हां घरीं एक गाय दुभताहे । पान्हा न समाये त्रिभुवनीं ॥१॥
वान ते सांवळी नांव ते श्रीधरा । चरे वसुंधरा चौदा भुवनें ॥२॥
वत्स नाहीं माय भलत्या सवें जाय । कुर्वाळी तो लाहे भावभरणा ॥३॥
चहूं धारीं क्षीर वोळली अमुप । धाले सनकादिक सिद्ध मुनी ॥४॥
तुका ह्मणे माझी भूक तेथें काय । जोगविते माय तिन्ही लोकां ॥४॥
==
दिंडीगाणें अभंग.
॥६९४८॥
प्रथम नमूं गणराजा । भावें नमूं गुरु माझा ॥ संत साधु आदि पूजा । मुळींहुनीं आधार मज तुझा ॥१॥
हातीं टाळ घेउनी दिंडी । दोन भोंपळे श्रवण जोडी ॥ तंतु तुळशीचा लाविला गोडी । निरर्थक कर्म सांडी ॥२॥
आकाशासी नाहीं कुळगोत्र । सांगा वायूचें कोण याती सूत्र ॥ तेज अग्नि व्यापक सर्वत्र । आकाशानें होय पवित्र ॥३॥
काय विघरलें हें पाणी । रवितेज उगवलें कोठोनी ॥ कैशीं भ्रमती तारांगणीं । चंद्रा अंधार फिरे कोढुनी ॥४॥
किती समुद्राचें पाणी । पर्जन्यधारा कैशा गगनीं ॥५॥
तुका ह्मणे सद्गुरुचरणीं । मूलभेद कळे दिंडीगाणीं ॥६॥
==
दरवेस अभंग.
॥६९४९॥
अल्ला करे सो होय बाबा करतारका सिरताज । गाऊ बछरे तिस चलावे यारी वाघो न सात ॥१॥
ख्याल मेरा साहेबका बाबा हुवा करतार । व्हांटें आघे चढे पीठ आपे हुवा असवार ॥२॥
जिकिर करो अल्लाकी बाबा सबल्यां अंदर भेस । कहे तुका जो नर बुझे सोहि भया दरवेस ॥३॥
==
वैद्यगोळी अभंग.
॥६९५०॥
अल्ला देवे अल्ला दिलावे अल्ला दारु अल्ला खिलावे । अल्ला बगर नहीं कोये करे सोहि होये ॥१॥
मर्द होये वो खडा फीर नामर्दकुं नहीं धीर । आपने दिलकुं करना खुसी तीन दामकी क्या खुमासी ॥२॥
सब रसोंका किया मार । भजनगोली एक हि सार ॥ इमान तो सब ही सखा । थोडी तो भी लेकर ज्या ॥३॥
जिन्हो पास नीत सोये । वो हि बसकर तिरोवे ॥ सांतो पांचो मार चलावे । उतार सो पीछे खावे ॥४॥
सब ज्वानी निकल जावे । पीछे गधडा मटी खावे ॥ गांवढाळ सो क्या लेवें ॥ हगवनी भरी नहीं धोवे ॥५॥
मेरी दारु जिन्हें खाया । दिदार दरगां सो हि पाया ॥ तल्हे मुंढी घाल जीवें । बिगारी सोवे क्या लेवे ॥६॥
बजारका बुझे भाव । वो हि पुसता आवे ठाव ॥ फुकट बाटु कहे तुका । लेवे सोहि लें हिसखा ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : June 09, 2019
TOP