मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|विविध अभंग|
७०७६ ते ७०८०

आश्रम - ७०७६ ते ७०८०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


ब्रह्मचर्याश्रम
====

॥७०७६॥
प्रथम जन्मला शुद्ध वर्णाश्रम । व्रतबंधक्रम ब्रह्मचारी ॥१॥
ब्रह्मचारी याचा मुख्य ऐसा धर्म । वेद उपक्रम घोकी सदा ॥२॥
अक्षर अक्षरीं करावा सांटोवा । तेव्हां पडे ठावा वेदमार्ग ॥३॥
तुका म्हणे येथें चुकलिया वर्म । तया भवभ्रम पाठीं लागे ॥४॥

गृहस्थाश्रम
====

॥७०७७॥
गृहस्थआश्रम साधीला निर्मळ । गृहिणी सुशील पाहिजे त्या ॥१॥
या नांव जोडलें सायासानें धन । आचार निपुण वेदमार्ग ॥२॥
यजन याजन तपव्रत दान । वेद अध्ययन गुरुयुक्त ॥३॥
प्रतिग्रह घ्यावा निपुण षट्‍कर्मी । चित्त ठेवीं नामीं अहर्निशी ॥४॥
तुका म्हणे विधीनिषेधपाळण । यया नांव जाण गृहस्थाश्रम ॥५॥

॥७०७८॥
आपुली शक्ति जैसी तैसा किजे धर्म । परमार्थाचें वर्म हेंचि येथें ॥१॥
मिळाल्यासारिखा विनियोग किजे । ज्याचें त्यासी दिजे विभागोनी ॥२॥
गुरुगोत्र अग्नि ब्राह्मणाचें कळ । पितराचें निर्मळ पितरां अर्ची ॥३॥
उर्वरित शेष मागें राहिलें जें । कुटुंबासी किजे भोजनासी ॥४॥
तुका म्हणे तेव्हां धन्य गृहस्थाश्रम । नाहीं तरी श्रम प्रपंचाचा ॥५॥

॥७०७९॥
या नांव सन्यास नासिला संकल्प । तोडिला विकल्प जाणीवेचा ॥१॥
आशापाश चित्ता आवरावा क्रोध । वृत्तीस अक्रोध निरंतर ॥२॥
वळावीं इंद्रियें खुडुनियां ठायीं । कदापी ही नाहीं बंधन त्या ॥३॥
केलें विसर्जन मागील कर्माचें । अखंड चित्ताचें समाधान ॥४॥
तुका ह्मणे कार्याकारण ते नेम । सन्यासीया धर्मा आचरावें ॥५॥

॥७०८०॥
वेदवाणी बोले आचारविहित । बोलियली नीत तेणें पाडें ॥१॥
सांडुनियां जरी आडमार्गे जातां । बळेंची अहंता पाठीं लागे ॥२॥
आपपर नाहीं थोरसान दृष्टी । समत्व हें सृष्टीं दिसों लागे ॥३॥
सहज प्रारब्धें जेंजें घडे कर्म । तोचि जाणा नेम नित्य होय ॥४॥
शुभा शुभ नेम नित्य परिचारी । योग मार्ग तरी ऐसा नव्हे ॥५॥
न सुटेची मूळ नाहीं यातीकूळ । विश्व हें सकळ ब्रह्म देखे ॥६॥
बोलिला जो धर्म त्यागितां आचार । तो जाण साचार पातकी हा ॥७॥
तुका म्हणे बोले श्रुतीवाक्य ऐसें । मोकळा सरिसें शिष्य पावे ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : June 09, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP