“उपमानहून हा पदार्थ (उपमेय) भिन्न आहे, असें ज्याचें स्पष्ट ज्ञान झालें आहे (प्रमित), त्या पदार्थावर उपमानाची तत्त्वेन म्ह० उपमानत्वानें संभावना म्हणजे कल्पना करणें; व त्या संभावनेला निमित्त म्हणून, उपमेय व उपमान ह्या दोहोंवर राहणारा कोणता तरी रमणीय धर, किंवा त्या धर्माशींसमानाधिकरण होऊन राहाणारा दुसरा कोणता तरी रमणीय धर्म असल्याचें सांगून अथवा सुचित करुन, ती संभावना करणें, याला पहिल्या प्रकारची उत्प्रेक्षा म्हणावी. आणि वरील प्रकारच्या (म्हा० उपमानाहून भिन्न म्हणून ज्ञात असलेल्या) उपमेयाव्र, वर सांगितलेल्या (म्ह० उपमानाचे ठिकाणीं असलेल्या) एखाद्या धर्माच्या निमित्तानें, अथवा त्या धर्माच्या अधिकरणावर राहणार्या दुसर्या एखाद्या धर्माच्या निमित्तानें, उपमानाच्या धर्माची संभावना केली असेल तर ती, दुसर्या प्रकारची उत्प्रेक्षा.”
‘लोकोत्तरप्रभावं त्वां मन्ये नारायणं परम’ (हे लोकोत्तरप्रभावशाली राजा, तुला मी श्रेष्ठ असा भगवान् विष्णु समजतों.)
ह्या श्लोकार्धांत, लोकोत्तरप्रभावशाली राजाचा, भगवान् विष्णूशीं व्याप्तिसंबंध आहे. अशी संभावना करण्याच्या परिस्थितींत, अनुमान तर होऊं शकत नाहीं; कारण, पक्का व्याप्तिसंबंध ही अनुमानाची सामग्री येथें नाहीं. तेव्हां, अशा स्थितींत, फार करून हा भगवान् विष्णु असावा, अशा तर्हेच्या येथें, होणार्या संभावनेला उत्प्रेक्षा अलंकार मानण्याचा (कदाचित्) प्रसंग येईल. म्हणून तो प्रसंग टाळण्याकरतां.(आम्ही आमच्या) वरील उत्प्रेक्षेच्या लक्षणांत, ‘तदभिन्नत्वेन प्रमितस्य’ हे शब्द घातले आहेत. ह्या शब्दांनीं उत्प्रेक्षेंतील संभावना आहार्य (म्हणे जाणूनबुजून केलेली) असते असें सूचित होतें.
वरी विवेचनावरून :---
“ अत्यंत सुंदर व श्यामवर्ण अशा रामाला वनामध्यें पाहून, हा बहुतकरून पाण्यानें भरलेला मेघ असावा असें समजून मोर नाचूं लागले.”
ह्या श्लोकांतील संभावनेला, उत्प्रेक्षा मानण्याचा प्रसंग येणार नाहीं; व त्याचप्रमाणें (याच श्लोकाच्या उत्तरार्धांत बदल करून) “पाण्यानें भरलेला हा मेघ आहे अशी समजूत झाल्यामुळें मोर सतत नाचूं लागले”
(असें म्हटल्यास),
ह्या श्लोकार्धांत होणार्या भ्रांतीलाही उत्प्रेक्षा म्हणण्याचा प्रसंग येणार नाहीं. (कारण त्या दोन्ही ठिकाणीं संभावनेंचें ज्ञान आहार्य नाहीं.)