उत्प्रेक्षा अलंकार - लक्षण ८
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
तादात्म्यानें होणार्या (तादात्म्यसंबंधानें होणार्या) द्रव्यस्वरूपोत्प्रेक्षेचें हें उदाहरण :---
“कलिंद पर्वतापासून थेट प्रयागापर्यंत कोणी तरी एक लांबच्या लांब खंदक निर्माण केला आहे. त्या कंदकंत असलेला हायमुनेचा प्रवाह, ज्याचा तळ दिसत नाहीं असें नील वर्ण आकाशच आहे, असें मला वाटतें.”
ह्या श्लोकांत यमुनेच्या प्रवाहाच्या ठिकाणीं नीलत्व व दीर्घत्व या निमित्तांनीं आकाशाच्या तादात्म्याची उत्प्रेक्षा केली आहे. (आकाशत्व ही जाति मानतां येत नाहीं. कारण आकाश हें एक आहे; आणि जाति ही अनेकानुगत असते; म्हणून) आकाशत्व हें आकाशाचें स्वरूपच असल्यानें, आकाश हें द्रव्यच मानूच ह्या ठिकाणीं द्रव्योत्प्रेक्षा केली आहे. शब्दाचा आश्रय असणारें तें आकाश इत्यादि नैयायिकांनीं केलेलें आकाशाचें लक्षण ध्यानांत आले नसतांही, केवळ आकाश ह्या शब्दानें सुद्धां आकाश ह्या अर्थाची प्रतीति होऊं शकते; आणि म्हणूनच आम्ही आकाशाला द्रव्य मानतों.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP