ह्या वाक्यांत भागीरथी ही द्रव्यरूप अथवा जातिरूप विषय असून, तिच्या ठिकाणीं, हिमालयाच्या भुजत्व जातीनें विशिष्ट जो भुज, त्याची तादात्म्यानें उत्प्रेक्षा केली आहे. ह्या उत्प्रेक्षेंत, भागीरथीमध्यें असलेले धवलवर्ण, शैत्य, लांब पसरणेंव समुद्राच्या पोटांत शिरणें हे जे गुण (म्हणजे धर्म) ते संभावनेला निमित्त म्हणुन उपओगी पडावेत एवढयाकरतं, विषयी जो हिमालयाचा हात (भुज), त्याच्या ठिकाणींही वरील गुण (अथवा धर्म) आहेत असें सिद्ध करणें अवश्य आहे. ह्या धर्मापैकीं वाक्यांत न सांगितलेले असे भागीरथीचे दोन धर्म, धवलता व शैत्य हे, हिमालयांत आहेतच; आणि ते त्याच्या संबंधामुळें येथें विषयी असलेल्या त्याच्या हातांतही आपोआपच आले. आतां भागीरथीचे बाकीचे दोन धर्म - लांब पसरणें व समुद्राच्या पोटांत शिरणें हे, हिमालयाच्या हातांतही आहेत, असें सिद्ध व्हावें म्हणून, स्वत:चा पुत्र जो मैनाकपर्वत त्याला शोधण्याकरतां जणु हा हात लांब पसरला आहे व समुद्रांत प्रविष्ट झाला आहे, अशी फलोत्प्रेक्शा केली आहे. आतां मैनाकपर्वताला शोधून काढणें हें जें फळ, त्याला हा हात साधन आहे असें ज्ञान झाल्यामुळेंच, लांब करणें व समुद्राच्या पोटांत शिरणें या हाताच्या दोन क्रिया (फलानुकूल व्यापार) उत्पन्न झाल्या. (म्हणजे मैनाकाला शोधून काढणें हें जें फळ त्याकरतां ह्या दोन्ही क्रिया हातानें करणें हिमालयाला आवश्यक झालें.) अशा रीतीनें मैनाकरूपी पुत्र शोधून काढणें ह्या फलाकरतां साधन म्हणून (कल्पिलेला) विषयी जो हात, त्याचे लांब पसरनें व समुद्राच्या पोटांत शिरणें हे जे दोन धर्म त्या दोन धर्मांचा, भागीरथी या इव्षयाच्या ठिकाणीं स्वाभाविकपणें असलेले जे वरील दोन धर्म त्यांच्याशीं अभेदाध्यवसाय (अभिन्न असल्याचा निश्चय) करून होणार्या अतिशयोक्तीच्या जोरावर, वरील दोन धर्म, विषयी (हिमालयाचा हात) व विषय (भागीरथी) या दोहोंना साधारण केले गेले; व दोन साधारण धर्मांना निमित्त करून त्याच्या बळाव्र वाक्यांतील स्वरूपोत्प्रेक्षा केली गेली. आतां कोणी असें म्हणतील कीं, ह्या ठिकाणीं, पुत्र मैनाकाला शोधून काढणें ह्या फलाचीही संभावना (म्ह० उत्प्रेक्षा) करणें शक्य असल्यानें, येथें फलोत्प्रेक्षाही होऊ शकेल; पण असें म्हणतां येणार नाहीं. कारण कीं, वरील फलाची जी उत्प्रेक्षा केली आहे, त्या योगानें (मुख्य म्ह० विधेय असलेल्या) उत्प्रेक्षेला एक निमित्त तयार झालें; आनि नंतर त्य अनिमित्ताच्या बळावर होणारी जी स्वरूपोत्प्रेक्षा तीच ह्या ठिकाणीं प्रधान आहे; आणि ह्या वाक्यांतील चमत्कृति सुद्धां ह्या उत्प्रेक्षेवरच अवलंबून राहिलेली आहे. शिवाय ह्या प्रधान उत्प्रेक्षेचे वाचक जे क्यङ वगैरे प्रत्यय त्यांच्या अर्थाचा, वरील उत्प्रेक्षित फळाशीं मुळींच संबंध येत नाहीं, आणि म्हणूनच ह्या उत्प्रेक्षेंतील विषय जी भागीरथी ती, वाक्यांत विषयीच्या पोटांत न जातां स्वतंत्रपणाने उभी राहिली आहे; आणि वाक्यांत न सांगितलेले धवलता व शैत्य हे दोन गुणरूप धर्म आणि वाक्यांत सांगितलेले लंबत्व व जठरप्रविष्टत्व हे क्रियारुप दोन धर्म, या उत्प्रेक्षेचें निमित्त झाले आहेत. ह्या उत्प्रेक्षेंतील विषयी जो हिमालयाचा भुज तो जातिविशिष्ट असल्यानें ही जातिउत्प्रेक्षा झाली आहे; व हिमालाचा हात हा कवीनेंच निर्माण केला असल्यामुळें हिला निष्पाद्यविशिष्टशरीरा (निष्पाद्य म्ह० साध्य० उत्प्रेक्षा म्हटलें आहे.