आतां या प्राचीनांच्या मतावर विचार करूं या :---
‘सर्वच ठिकाणीं अभेदसंबंधानें उत्प्रेक्षा केली जाते,’ असा जो प्राचीनांचा नियम, त्याला कांहींही आधार (प्रमाण) नाहीं. कारण कीं, उत्प्रेक्षेच्या उदाहरणांत, भेदसंबंधानें केलेल्या उत्प्रेक्षाही आढळतात. उदाहरणार्थ, ‘अस्यां मुनीनामपि मोहमूह’ इत्यादि श्लोकांत, मुनीशीं संबंध असलेल्या अवलोकन ह्या विशिष्ट धर्माच्या ठिकाणीं, मोह या धर्मांची अभेदसंबंधानेंचे उत्प्रेक्षा केली आहे, असें (प्राचीनांना) म्हणतां येणार नाहीं. कारण कीं, (अशा ठिकाणीं) भेदसंबंधानें उत्प्रेक्षा करण्यांत कांहींच बाधक नसल्यामुळें, अशा अभेदसंबंधाच्या उत्प्रेक्षेची कल्पना करणें निरर्थक आहे. अभेदसंबंधानेंच उत्प्रेक्षा करावी असा कांहीं वेदानें उपदेश केलेला नाहीं. मग अभेदोत्प्रेक्षेचा हा (विनाकारण) आग्रह कशाला ? आणि शिवाय, अभेदसंबंध जेथें असेल तीच उत्प्रेक्षा हें तरी उत्प्रेक्षेचें लक्षण कां म्हणून ? (अलंकारांचें) लक्षण निर्माण करणेम ही गोष्ट पुरुषाच्या इच्छेवर अवलंबून आहे. संभावना हीच उत्प्रेक्षा असें ही लक्षण करतां येईल.) आतां ‘लिम्पतीव०’ इत्यादि श्लोकांतही तम: ह्या विषयावर, लेपन कर्तृत्वाची म्ह० क्रियेची (विषयीची) (आश्रयतारूपभेदसंबंधानें) उत्प्रेक्षा केली आहे. असें म्हणणेंच योग्य आहे. कारण कीं, लिम्पति या क्रियापदांतील ‘ति’ या प्रत्ययरूप आख्यातचा अर्थ, अनुकूलव्यापाररूप ‘कर्तृत्व’ हाच आहे. आणि त्या व्यापररूप कर्तृत्वाचा, ह्या श्लोकांत तम: ह्या प्रथमांत विशेष्याशीं आश्रयतासंबंधानें अन्वय होतो, असें म्हणण्यांत, कांहींच दोष नाहीं, ‘भावप्रधानमाख्यातम्’ ह्या यास्काच्या वचनाचा अर्थ, ‘भाव म्हणजे व्यापार हा ज्याचा अर्थ तें आख्यात’ व त्यालाच तिड म्हणावें, असा केल्यास, त्यांत कांहींहि विरुद्ध नाहीं. कारण कीं, ‘सत्वप्रधानानि नामानि,’ ह्या वरील (यास्काच्या) वाक्यापुढील कारण कीं, ‘सत्वप्रधानानि नामानि,’ ह्या वरील (यास्काच्या) वाक्यापुढील वाक्यांत, ‘प्रधान’ या शब्दाचा अर्थ ‘वाच्यार्थ’ हाच आहे. (अर्थात् धातूचा अर्थ फल व त्याच्या शेवटीं येणारा जो आख्यातरूप प्रत्यय त्याचा अर्थ व्यापार असें माणण्यास कांहींही हरकत नाहीं.) आतां, धातूचा अर्थ केवळ फल हाच केला तरी, ‘आख्याताचा अर्थ जो व्यापार तो ज्या स्थळीं राहतो, त्याहून भिन्न स्थळीं म्हणजे कर्त्याहून निराळ्या ठिकानीं म्ह० कर्माचे ठिकाणीं धातूचा अर्थ जें फल तें राहतें, त्या धातूला सकर्मक धातु म्हणावे; व आख्यातार्थ व्यापार (ज्या वाक्यांत) धात्वर्थफलांशीं समानाधिकारण म्ह० एकाच ठिकाणीं (म्हा० कर्ता या ठिकाणीं) असतो, त्या धातूला अकर्म्क म्हणावें” असा (धातूचा अर्थ फल व आख्याताचा अर्थ व्यापार असें मानूनही) असा व्यवहार करतां येणें शक्य आहे. दोन नामार्थ (पदार्थ) एकत्र आले असतां, त्यांचा परस्परांशीं भेदसंबंधानें अन्वय कधींही होत नाहीं, असा न्याशास्त्राचानियम असल्यानेम, धातूला लावलेल्या कृत प्रत्ययाचा अर्थ जो व्यापार त्याचा, जवळ असलेल्या नामार्थाशीं भेदसंबंधानें अन्वय संभवत नाहीं. (अर्थात् देवदत्त: पाक: ह्यांतील पाक: याचाही देवदत्त: ह्या नामार्थाशीं होऊं पाहाणारा अभेदान्वय जुळणार नाहीं.) आणि म्हणूनच, ‘कर्तरि कृत’ (पा. ।३।४।६७) ह्या, व्यापारविशिष्ट कर्ता या अर्थीं कृत्प्रत्ययाच्या वाचकशक्तीचें बोधन करण्यार्या सूत्रानें, घञ वगैरे प्रत्ययांचा भाव अथवा व्यापार हा अर्थ होतो; व त्या घञ प्रत्ययाची, विशेषण हा अर्थ दाखविण्याची शक्ति आहे, असें सांगणारें जे सूत्र तें निष्प्रयोजन ठरत नाहीं. शिवाय आम्ही शब्दानुवृत्तिपक्षाचा स्वीकार केला असल्यानें, ‘कर्तरि कृत्’ (पा. ।३।४।६७) ह्या सूत्रांत कर्तृपदाचा कर्ता असा धर्मिपर अर्थ केला असला तरी, ‘ल: कर्मणि०’ (पा. ।३।४।६९) या सूत्रांत, कर्तु: या अनुवृत्त पदाचा ‘व्यापाररूपी धर्म’ असाच (अर्थ) करणार; व तसें करण्यांत कांहींही दोष नाहीं.