उत्प्रेक्षा अलंकार - लक्षण १०
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
जाति वगैरेंच्या अभावाची उत्प्रेक्षा ही :---
“सर्व क्षत्रियांचा मूर्तिमंत अभावच जणु, आणि जगांत अत्यंत बलिष्ठ व प्रतापशाली असा जो परशुराम त्यामा उत्कर्ष आहे.”
ह्या श्लोकांत क्षत्रियत्व या जातीच्या अभावाची परशुरामाशीं तादात्म्यानें उत्प्रेक्षा केली गेली आहे; व ह्या उत्प्रेक्षेंत क्षत्रिय व परशुराम ह्यांमधील विरोधित्व अथवा शत्रुत्व हें निमित्त आहे.
ह्याच श्लोकांत अभाव इव ह्याच्या ऐवजीं विनाश इव (जणु कांहीं विनाशच.) असा फेरफार केला तर, ह्या श्लोकांत ध्वंसरूपी अभावाची तादात्म्योत्प्रेक्षा होईल. व ह्याच श्लोकाच्या पहिल्या चरणांत, ‘समस्तलोकदु:खानां’ असे शब्द घातल्यास, ह्याच श्लोकांत गुणाच्या अभावाची तादात्म्योत्प्रेक्षा होईल.
“काजळाप्रमाणें काळेकुट्ट असलेल्या मेघांच्या पंक्तीनें आकाश असें कांहीं झाकून गेलें कीं, सगळे जग जणु डोळ्यांवांचूनच्या माणसांची सृष्टीच आहे, असें वाटले.”
ह्या श्लोकांतही डोळ्यांनीं होणारें जें (पाहण्याचें) सामान्य ज्ञान त्याचा अभाव उत्प्रेक्षेला निमित्त म्हणून आला आहे; व त्या निमित्तामुळें होणार्या उत्प्रेक्षेंत, ‘दर्शनक्रियेचा अभाव’ ह्या धर्माची जगद्रुपी विषयावर उत्प्रेक्षा केली गेली आले.
द्रव्याच्या अभावाची केलेली उत्प्रेक्षा ज्यांत आहे, असे श्लोक स्वत: शोधून काढावे.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP