उत्प्रेक्षा अलंकार - लक्षण ५
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
तादात्म्यसंबंधानें होणारी गुणस्वरूपोत्प्रेक्षा खालील श्लोकांत आहे :---
“यमुना नदींत आक्रोश करीत असलेला बगळ्यांचा समूह, आपल्याहून निराळ्या अशा कृष्ण वर्णानें आक्रांत झालेला आणि म्हणूनच आश्रय शोधण्याच्या इच्छेनें एकत्र गोळा झालेला, जणु शुक्ल वर्णच भासला.”
ह्या श्लोकांत बकत्वजातिविशिष्ट बक (म्हणजे) बगळे) हा उत्प्रेक्षेचा विषय, व आक्रोश करीत असलेले, हें ह्या बगळ्यांचें विशेषण. ह्या
हेतूच संभावना केली आहे, आणि अशा रीतीनें ह्या दोन हेतूत्प्रेक्षांच्या जोरावर विषयी जो शुक्ल गुण त्याच्या ठिकाणीं दोन धर्म सिद्ध केले गेले. (व अशा रीतीने विषय व विषयी व विषयी यांच्या मधील हे तीन साधारण धर्म निमित्त म्हणून सांगितले गेले; ह्या तीन धर्मांचे, समान धर्म म्हणून, निमित्तत्व येथें मानलें आहे). आतां विषय जे बगळे त्यांच्या ठिकानीं गोळा होणें व स्वच्छपणा हे दोन धर्म स्वाभाविकपणेंच आहेत. व विषयी जो शुक्ल गुण त्याच्या ठिकाणीं हेच दोन धर्म काल्पनिक आहेत. अशा ह्या दोन साहजिक व दोन कल्पित अशा धर्मांचा अभेदाध्यवसाय करून त्यांना साधारणधर्म बनविले आहे. असा प्रकार इतर ठिकाणींही होऊ शकतो. त्याचीं उदाह्रणें शोधून काढावीं.
मागील “तनय - मैनाक०” इत्यादि (पूर्वींच्या) उत्प्रेक्षा - वाक्यांत असलेल्या फलोत्प्रेक्षेला मुख्य उत्प्रेक्षा मानली नाहीं; (कारण का, ती प्रधान असलेल्या स्वरूपोत्प्रेक्षेला मदत म्हणून आणली आहे); त्याचप्रमाणें, प्रस्तुत ‘अंभोजिनी०’ इत्यादि श्लोकांत आलेल्या हेतूत्प्रेक्षा त्या मुख्य धर्मोत्प्रेक्षेच्या मदतीला आल्यामुळें, प्रधान - उत्प्रेक्षा म्हणून त्यांचा निर्देश केला नाहीं.
क्रियास्वरूपोत्प्रेक्षेचें उदाहरण हें :---
“यमुनेच्या तुडुंब पाण्यांत अर्धे बुडलेले बगले, अत्यंत आक्रोश करीत असतां, अंध:कारानें, जणु वैरामुळें, गिळलीं जात असलेलीं ही चंद्राचीं पिल्लें आक्रोश करीत आहेत, असें वाटलें.”
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP