अशी ही उत्प्रेक्षा दोन प्रकारची - एक वाव्य व दुसरी प्रतीयमान, ‘इव, नूनम्, मन्ये, जाने, अवेमि, ऊहे, तर्कयामि, शंके, उत्प्रेक्षे’ इत्यादि संभावनाप्रतिपादक शब्दांनीं युक्त व क्यड (प्रत्यय), आचारार्थी येणारा व्किप् प्रत्यय, इत्यादि संभावनाप्रतिपादक शब्दांसहित उत्प्रेक्षेची सामग्री जेथें असेल, ती वाच्या उत्प्रेक्षा; व ज्या ठिकाणीं, संभावनाप्रतिपादक (वर सांगितलेले) शब्द नसून, बाकीचेई उत्प्रेक्शा सामग्री असेल, तिला प्रतीयमान उत्प्रेक्शा म्हणतात. उत्प्रेक्षेच्या सामग्रीवाचूनची पण केवळ संभावनाप्रतिपादक शब्दच असलेली जी उत्प्रेक्शा, तिला केवळ संभावनाच म्हणावें; तिला उत्प्रेक्षा अलंकार म्हणूं नये.
वरील दोन प्रकारची उत्प्रेक्षा पुन्हां प्रत्येकीं तीन प्रकारची असते. (१) स्वरूपोत्प्रेक्षा (२) हेतूत्प्रेक्षा व (३) फलोत्प्रेक्षा. यांपैकी जाति, गुण, क्रिया आणि द्रव्य ह्या स्वरूपाचे जे पदार्थ, अथवा, त्या चारांच्या अभावरूप असलेले जे पदार्थ (विषयी), त्यांची जाति, गुण, क्रिया व द्रव्यरूप विषयावर, तादात्म्य - संबंधानें अथवा इतर संबंधानें, जी संभावना केली जाते, ती स्वरूपोत्प्रेक्षा. ह्या उत्प्रेक्षेला निमित्त म्हणून असलेले जे धर्म, ते सुद्धां जाति, गुण, क्रिया किंवा द्रव्य ह्यापैकीं कोणत्या तरी एका स्वरूपाचे असतात; किंवा ह्या चारही स्वरूपाचे ( एकत्र आलेले) असतात; किंवा ते धर्म, वाक्यांत शब्दांनीं सांगितलेले असतात; अथवा ते (कुठें) सांगितलेले नसतात; कुठें ते धर्म अगोदरच सिद्ध असतात; अथवा कुठें ते धर्म साध्य स्वरूपाचे असतात. पण ह्यापैकीं कोणत्याही प्रकारचे धर्म (जसें जेथें शक्य असेल तसें) निमित्त होऊन त्याच्या बळावर जी संभावनाकेली जाते, ती स्वरूपोत्प्रेक्षा. ह्या स्वरूपोत्प्रेक्षेंत, विषय आणि विषयी ह्या दोहोंमध्यें ज्या वेळीं अभेद - संबंध असतो त्या वेळीं, तिला धर्मि - स्वरूपोत्प्रेक्षा म्हणतात; व अभेद - संबंधाहून इतर संबंधानें होणारी जी उत्प्रेक्शा तिला धर्मस्वरूपोत्प्रेक्षा म्हणतात. मागें सांगितलेल्या जाति गुण इत्यादि चार प्रकारच्या पदार्थांच्या ठिकाणीं, अशाच चार प्रकारच्या पदार्थांची, वर सांगितलेल्या अनेक प्रकारांपैकीं कोणत्याही प्रकारचा धर्म जिला निमित्त आहे अशी, हेतुरूप संभावना केली असतां ती हेतूत्प्रेक्षा होते; व फलरूप संभावना केली असतां ती फलोत्प्रेक्षा होते.
अशा रीतीच्या ह्या उत्प्रेक्षा पुन्हां, कुठें सिद्ध उत्प्रेक्षा, तर कुठें साध्य उत्प्रेक्शा होत असल्यानें, एकंदरीणें, उत्प्रेक्षांचे अनेक प्रकार संभवतात. ह्यापैकीं कांहीं उत्प्रेक्षांचें फक्त दिग्दर्शन करतों :----
आख्यायिकेंत आलेल्या जातिविशिष्ट स्वरूपोत्प्रेक्षेचें उदाहरण खालील वाक्य :---
“आपला पुत्र जो मैनाक पर्वत त्याला शोधण्याकरतां हिमालयानें लांब पसरलेला व समुद्राच्या पोटांत घुसलेला जणु स्वत:चा हात ९भुज) अशी जी भगवती भागीरथी तिची सखी (ही यमुना.)”