उत्प्रेक्षा अलंकार - लक्षण १२
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
अशा रीतीने स्वरूपोत्प्रेक्षेची थोडक्यांत चर्चा केली; आतां हेतूत्प्रेक्षेचें उदाहरण :---
“हे राजा, तुझ्या प्रतापरूपी महान् दीपाच्या टोकावर सांचलेल्या पुष्कळ काजळाच्या योगानेंच, जणु कांहीं, आकाशांत नीलवर्ण नित्य नूतन असल्यासारखा वाटतो.”
ह्या ठिकाणीं नीलवर्णाशीं समानाधिकारण (म्ह० समानस्थलीं राहणार्या) काजळाची, हेतु म्हणून उत्प्रेक्षा केली आहे. ह्याच श्लोकांत कज्जललेपनै:’ हे शब्द घातल्यास ही क्रियारूप हेतूची उत्प्रेक्षा होईल.
गुणहेतुत्प्रेक्षेचें उदाहरण :---
“परस्परांच्या समागमाच्या सुखामुळेंच जणु कांहीं, ह्या सुंदरीचे स्तन फारच पुष्ट झाले आहेत; आणि या दोघांची (स्तनांची) अशी उत्तम उन्नति सहन न झाल्यामुळेंच कीं काय, (मत्सरानें,) तिचा मध्यभाग (कंबर) कृश होत आहे, असें मला वाटतें.”
ह्या ठिकाणीं, पूर्वार्धांत सुख ह्या गुणावर हेतूची उत्प्रेक्षा केली आहे व हेतु (हा अर्थ) पंचमी विभक्तीनें दर्शविला आहे. ह्या श्लोकाच्या उत्तरार्धांत, धर्मीचें (म्ह० येथें मध्यभागाचें) विशेषण म्हणून ज्याचा अनुवाद्य कोटीमध्ये (म्ह० उद्देश्य म्हणून) निर्देश केला आहे. तो सहन होणें हा गुणाचा अभाव, त्यावर हेतूची उत्प्रेक्षा केली आहे; परंतु (ही उत्प्रेक्षा शब्दानें स्पष्ट सांगितली नसून अर्थावरून कळून येते, म्हणून) ती आर्थ आहे. ज्याप्रमाणें ‘भोक्ता भुंजानो वा तृप्यति’ (जेवणारा मनुष्य तृप्त होतो) ह्या वाक्यांत तृप्तीला, भोजन हें कारण (हेतु) आहे; परंतु तें, स्पष्ट शब्दानें सांगितलें नसल्यानें आर्थ आहे, तसें येथेंही समजावें.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP