मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककविकृत पदें|
आदिनारायणकृत पदें

आदिनारायणकृत पदें

अनेककविकृत पदें.


पद १ लें
त्रिपुरांतक जीविं धरावा. ॥ध्रुवपद.॥
मदनकदन सुखसदन सदय दुतू ।
वदनिं वदत करिं भजनिं पुरावा. ॥त्रिपुरांतक०॥१॥
अरतु परतु परतु सुख निरसुनी ।
भरणिं भरत भव भरुनि तरावा. ॥त्रिपुरांतक०॥२॥
दुरितहरणपदिं शरण शरण आदी - ।
नारायणमय बोध भरावा. ॥त्रिपुरांतक०॥३॥

पद २ रें
भोलानाथ शंभू गा रे ! ॥ध्रुवपद.॥
त्रिशूलपाणीसहित भवानी ।
हरिहर पतितपावन मनिं ध्या रे ! ॥भोलानाथ०॥१॥
आदिनारायणिं भाव धरूनी ।
झडकरि सतत विगतभव हा रे ! ॥भोलानाथ०॥२॥

पद ३ रें
पांडुरंगाचे पाय पाहूं चला रे ! ॥ध्रुवपद.॥
नामबळें त्रैलोक्य जिंकूं । करूं काळावरी हल्ला रे ! ॥पांडु०॥१॥
निमिष असे हें बहु मोलाचें । टपतो रविचा पिला रे ! ॥पांडु०॥२॥
दशवदनादिक गर्वें गेले । कां उगले तुम्ही भुला रे ! ॥पांडु०॥३॥
आदिनारायण कोटिकृपेनें । नरदेह तुम्हां दिला रे ! ॥पांडु०॥४॥

पद ४ थें
जा जा रे ! शरण तुम्ही जा रे ! ॥ध्रुवपद.॥
तारिल तो निज देखोनि करुणा रे ! ।
अरे ! सद्गुरु महाराजा रे ! ॥शरण०॥१॥
आदिनारायणस्वामिचे चरणीं ।
निश्चळ दृढ मनिं वो गा रे ! ॥शरण०॥२॥

पद ५ वें
गाय गुण श्रीरामाचे तूं ॥ध्रुवपद.॥
मृगजळवत तव भवभ्रममाया । ध्याय चरण श्रीरामाचे तूं ॥गाय०॥१॥
आदिनारायणसद्गुरुस्मरणीं । रतणें हें गुज प्रेमाचें तूं ॥गाय०॥२॥

पद ६ वें
केला व्रजवर गडी गडी तो ।
जो गड्या नेत पैलथडी थडी तो. ॥ध्रुवपद.॥
शाकपत्र एक मात्र असोनि द्रौपदीचे आवडी ।
गुप्त तृप्त अधमर्षण करि मुनि अनुपम रसपरवडी. ॥केला०॥१॥
धर्म यज्ञ नृपराज मिरवत दधिघृतपय वाहडी ।
तुष्ट पुष्ट संतुष्ट करुनि मग द्विजोच्छिष्ट सांवडी. ॥केला०॥२॥
धर्म चंद्र अमरेंद्र भी वंदिति तो नेणति गोवळ मुढीं ।
उभा उभा घन नभा करुनि बळें हिरोनि नेतो घोंगडी. ॥केला०॥३॥
सूर्यसदन रति चौर्यमिसें त्या गोठणिं मारित दडी ।
तो हरि गवसुनि बांधुनि बळकट त्राहाटित वृषभासुडीं. ॥केला०॥४॥
गज गणिका द्विजअजामिळादिक ध्रुव कुब्जा कूबडी ।
अचळ पदाप्रति आदिनारायणें पोंचविली ते घडी. ॥केला०॥५॥

पद ७ वें
विलंब न लावीं न लावीं । झडकरि स्वरूप दावीं ॥ध्रुवपद.॥
दीनानाथे गिरिजे ! । ब्रीद सत्य करावें तुळजे ! ॥विलंब०॥१॥
तुझिया भेटीसाठीं । बळकट प्राण धरिला कंठीं ॥विलंब०॥२॥
आदिनारायण तान्हा । तूं माय कृपेचा दे पान्हा ॥विलंब०॥३॥

पद ८ वें
चाल वो ! सखिये ! पंढरीला जाऊं । शशिभागीं न्हाऊं ॥ध्रुवपद.॥
भूवैकुंठिं हरिमंदिर पाहूं । निजदर्शन घेऊं ।
.............        ।           ............. ।
कटिं कर नटसम चरण विटेवरी ।
प्रेमें बुका तुलसीदल वाहूं ॥चाल वो०॥१॥
वीणा वरदंडी मादल वाहूं । मन हें बोजाऊं ।
हृदयीं सगुणाचें रुपडें ध्याऊं । सद्भावें गाऊं ।
राजकाज जगिं लाज विसर्जुन ।
कीर्तनि हरिगुण मंगल गाऊं ॥चाल वो०॥२॥
श्रद्धा भक्ति गडणी या बोलावूं । पायीं त्याचे राहूं ।
संतांचे चरणीं प्रेम दुणाऊं । रस आजी भाऊं ।
धन्य धन्य गुरु आदिनारायण ।
जगततळीं नृपयोग कमावूं ॥चाल वो०॥३॥

पद ९ वें
या नगरीं कोणी वर जीना ॥ध्रुवपद.॥
सये ! नेमा निवर्जित्या कांहीं । व्रजजन शोकप्रवाहीं ।
वाजवी मुरली गिरिधरधारी । तों तनननननन ॥या नगरीं०॥१॥
बाहिल्या नये येक । राहिना उगा वो ! ॥
तेणें माझा रतिपती सळाले । सनननननन ॥या नगरीं०॥२॥
आदिनारायण दहीं । घृत दुध नवनित पात्रें ।
उलंडुनि नाचतो । दणणणणणण ॥या नगरीं०॥३॥

पद १० वें
जीव झाला वारा । बाई ! वो !  जीव झाला वारा ।
घडिमध्यें वो ! आणीं हरी ॥ध्रुवपद.॥
व्याकुळ मी निशि वैरिणी वाढे । रतिपति करि शरमारा ॥घडि०॥१॥
आदिनारायण वैद्य या विषयीं । औषध तोचि निवारा ॥घडि०॥२॥

पद ११ वें
वेडी पिशी झालें, पूर्ण निमालें ।
नामसुधारस प्यालें गे बाई ! ॥ध्रुवपद.॥
सद्गुरुवचनें, भेटुनि गेलें । माझें मीपण नेलें ॥गे बाई०॥१॥
मस्तकिं हस्तक, ठेवुनि आपुला । आपण ऐसें केलें ॥गे बाई०॥२॥
आदिनारायण, अंकित झाला । समूळ पातक गेलें ॥गे बाई०॥३॥

पद १२ वें
जों जों नणदियावर जीवो. ॥ध्रुवपद.॥
न मानी माये ..... ..... ..... ।
तों तों खळ विषय सुरतिंचा गर जीवो ॥जों जों०॥१॥
प्रयत्न करी जंव न चले कांहीं ।
विरहतापें विकळ पडुनि करि अरजी वो ! ॥जों जों०॥२॥
आदिनारायण गाउनी भाके ।
सर्वभावें राखिली शेवटीं त्याची मर्जी वो ! ॥जों जों०॥३॥


पद १३ वें
जय ललिते देवी ! । त्रिपुरसुंदरी ! पाहि माम् ॥ध्रुवपद.॥
गिरिवरनंदिनि बाले ! । वीणारवझांझरि लोले ।
ता तथैय तक तथैय धिमिकट । तथैय तथैय झेंतारि झेंतारि ॥त्रिपुर०॥१॥
जय जय जगदाधारे ! । मुनिजनमनस्वात्मविचारे ! ।
तातथौंग तक तथै धुमकड । तथै झेंकड् कड् झेंतारि झेंतारि ॥त्रिपुर०॥२॥
आदिनारायणमात्रे ! । पद देईं पावन मात्रे ! ।
वोदनतान तन दरना तन दीम् । झेंतरकिडतक् झेंतारि झेंतारि. ॥त्रिपुर०॥३॥

पद १४ वें
कसा करिल भवपार । हरि मज. ॥ध्रुवपद.॥
तनमनधन विषयांत गुंतलेम । भजनीं आळस फार. ॥हरि०॥१॥
मी एक गायक मी एक वैदिक । हाचि उठे अहंकार. ॥हरि०॥२॥
खटपट करितां वायां गेलों । नाहीं केला उपकार. ॥हरि०॥३॥
आदिनारायण जोडुनि पाणी । पतित करी उद्धार. ॥हरि०॥४॥

पद १५ वें
शिणलासि माझ्या बा ! रे ! ॥ध्रुवपद.॥
पायीं अनवाणी । संगें रुकमिणी ।
कांटे कर्नाटकच्या वाटे चालतांना उपवाशी. ॥शिणलासि०॥१॥
अतिसकुमारा । नंदकुमारा ! ।
नागर गिरिवरधारी पंढरपुरचा रहिवाशी ॥शिणलासि०॥२॥
आदिनारायण । जगजीवन ।
पतितपावन भक्ताकरितां ब्रीद बाळगिशी ॥शिणलासि०॥३॥

पद १६ वें
भज रे ! मनुज ! त्वं बालमुकुंदम् । जय परमानंदम् ॥ध्रुवपद.॥
वृंदावनवासं श्रीगोविंदम् । करधृतारविंदम् ।
.............................. । ...................... ।
नंदनंद वृंदावनविहरण कुंदरदन सच्चित्सुखकंदम् ॥भज०॥१॥
गुरुदैवतदैवत पंचमरंगम् । नववेणुतरंगम् ।
वीणारवमंडल तालमृदंगम् । स्वरसंगीतांगम् ॥
रागरंग भासांग शुभांगं गंगाधरवृततांडवरंगम् ॥भज०॥२॥
तकताधिकता त्रिवट व्ययबंदम् । ध्रुवगीतप्रबंधम् ।
गायंतं गोपकुमारीवृंदम् । रासोत्सवछेदम् ॥
पदकिसलय नटनाट्यमहीतल आदिनारायणमध्यमिलिंदम् ॥भज०॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 16, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP