गंगाधरात्मजकृत पद
अनेककविकृत पदें.
यत्पदकमळीं रत होतांची तुटे पाश भवभ्रांतीचा ।
औदुंबराचे तळीं राहिला पुण्यपुरुष जो अत्रीचा ॥ध्रुवपद.॥
जननमरणावरहीत परंतु पतिव्रताप्रिय पूर्ववया ।
अवनीवरता दृष्टिगोचरा होय धरोनी नरकाया ॥
दंडकमंडलु करीं शोभती पायिं पादुका हेममया ।
काषायांबर वस्त्रभूषणें निबिड भोंवती तरुछाया ॥
भस्मोद्धूलितगात्र सर्वही मुखांबुजीं जप प्रणवाचा ॥औदुं०॥१॥
प्रातःकाळीं सुरगणमुनिजन दर्शनासि द्वारिंच येती ।
मोठे मोठे यती बैसती हृदयकमळिं चिंतिति मूर्ती ॥
अबला येउनि बाळ मागती, माळ धरुनि सेवा करिती ।
अंध पांगळे बधिर वाणिजन हर्षें नाचति गित गाती ॥
शमिपत्रें किति बिल्वतुळशिदळ हार अर्पिती सुमनाचा ॥औदुं०॥२॥
रामकृष्णपणीं असुर मारुनी अमर दिनासी बहु शिकवी ।
कलियुगीं चतुर्थाश्रम घेउनी समंदादी खळ खपवी ॥
अज्ञानी जन दीन पाहुनी चरित्र रचुनि निजहित शिकवी ।
दुरित वारुनी हें सुख देउनि शेवटिं मोक्षपदीं बसवी ॥
गंगाधरात्मज म्हणुनि राहिला आश्रय करुनी चरणांचा ।औदुं०॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : March 17, 2017
TOP