शिशुमतिकविकृत पद
अनेककविकृत पदें.
नको नेऊं रे ! राम राणा राणा ॥ध्रुवपद.॥
क्षणभरि जरि हा दृष्टि पडेना । त्यजिल कौसल्या प्राणा प्राणा ॥नको०॥१॥
अन्नापाण्याचा स्पर्श करीना । अझुनि करितो स्तनपाना पाना ॥नको०॥२॥
धनुर्विद्या शिकला नसे का । लघु बाळक आहे ताना ताना ॥नको०॥३॥
शिशुमति विनवितो जनक धावण्या । दशरथ धरितो चरणा चरणा ॥नको०॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : March 17, 2017
TOP