हनुमंतकविकृत पद
अनेककविकृत पदें.
अक्रुरा ! नको मधुवना नेऊं आमुचा भगवान् ॥ध्रुवपद.॥
घात करूं इच्छी कंसासुर हा । कोमळ मूर्ति लहान ।
हरिची कोमळ मूर्ति लहान ॥अक्रुरा !०॥१॥
मायबाप हंबरडा फोडिती । हरणी धेनुसमान ।
काननीं हरणी धेनुसमान ॥अक्रुरा !०॥२॥
अक्रुर अक्रु अकांत करिती । गोपी मागती दान ।
दयाळा ! गोपी मागती दान ॥अक्रुरा !०॥३॥
जयराम जयसुत गुप्तचि येउनी । वदतसे हनुमान ।
........... वदतसे हनुमान् ॥अक्रुरा !०॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : March 17, 2017
TOP