अनंतकविसुतकृत पद
अनेककविकृत पदें.
रसने ! नीलनीरदसुंदर निरुपमशील सादर गाई ॥ध्रुवपद.॥
पळभरि तरि गुरुपाया । स्मर परमन होशिल ज्या या ॥रसने०॥१॥
विसर सकळ भवगाथा । मनिं समजुनि चिन्मय ताता ॥रसने०॥२॥
वदसि सुखाभय बरवी । तरि वरद कृपें जग भरवी ॥रसने०॥३॥
स्मरण भयोत्कर चुकवी । मति अनंतकविसुत शिकवी ॥रसने०॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : March 17, 2017
TOP