मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककविकृत पदें| माधवकृत पदें अनेककविकृत पदें अनुक्रमणिका आदिनारायणकृत पदें निजानंदस्वामिकृत पदें शिवदिनकेसरीकृत पदें रंगनाथस्वामिकृत पदें शिवरामस्वामिकृत पदें मध्वनाथस्वामिकृत पदें नरहरिकविकृत पदें महिपतिकृत पदें गोपाळनाथकृत पदें आत्मारामकविकृत पदें गंगाधरकविकृत पदें पांडुरंगकविकृत पदें श्रीधरस्वामीकृत पदें श्रीधरस्वामीकृत पदें परमानंदकविकृत पद जनार्दनकृत पद राघवकविकृत पदें बल्लवकविकृत पद रामकविकृत पदें भुजंगनाथकृत पदें कोकिळकविकृत पद निरंजनकृत पदें कृष्णदयार्णवकृत पद शुकानंदकृत पदें हरिकविकृत पद निंबराजकृत पद दीनानाथकृत पद माधवकविकृत पद हनुमंतकविकृत पद शिशुमतिकविकृत पद गिरिधरकविकृत पदे मानपुरीकृत पद व्यंकटसुतकृत पद जिवनतनयकृत पद गोसावीनंदनकृत पदें गोपालात्मजकृत पदें जयरामात्मजकृत पदें शिवरामात्मजकृत पद त्र्यंबककविसुतकृत पद गंगाधरात्मजकृत पद शिवदासतनयकृत पद रामतनयकृत पद अनंतकविसुतकृत पद शुकानंदनाथतनयकृत पद राजाराम प्रासादीकृत पदें माणिकप्रभुकृत पदें रविदासकृत पदें जगजीवनात्मजकृत पद प्रेमाबाईकृत पदें गुरुदासकृत पद नारायणबोवाकृत पदें शिवदासात्मजकृत पदें वासुदेवस्वामीकृत पदें सुभरावबावाकृत पदें माधवकृत पदें अनामकविकृत पदें वासुदेवा दीनानाथा । कमललो... माधवकृत पदें अनेककविकृत पदें. Tags : kavimarathipadकविपदमराठी माधवकृत पदें Translation - भाषांतर पद १ लें लागला तोबा, तोबा मज बाई ! हरि हर विठ्ठल रखुमाई ! ॥ध्रुवपद.॥यात्रा भरली, भरली आषाढीची । स्वारी आली श्रीमंतांची ॥दाटी जाली, जाली दुदाराची । तोबे उडति ठायीं ठायीं ॥लागला०॥१॥दर्शन होय ना, होय ना देवाचें । देवळाभोंवता मी नाचें. ॥पाय पाहिले, पाहिले रुक्मिणीचे । वदनीं नाम विठ्ठलाचें ॥लागला०॥२॥माधव आत्मा, आत्मा सकळांचा । श्रुति गर्जती वेदवाचा ॥करुणासिंधु, सिंधु भक्तांचा । हेत पुरवी जडजीवांचा. ॥लागला०॥३॥पद २ रें मानवा ! त्वां साधन केलें काय रे ! । चुकुनि आपला निजठाय रे ! ॥भावें धरिं सद्गुरुपाय रे ! । तेणें चुकती अपाय रे ! ॥ध्रुवपद.॥प्रथम साधन सज्जनाचा संग रे ! । विषयिं होशिल निःसंग रे ! ॥व्यर्थ मायाजाळ जलतरंग रे ! । सांडुनि सेविं हरिरंग रे ! ॥मानवा०॥१॥केव्हां मनीं धरशी अनूताप रे ! । तेणें चुकति त्रिविधताप रे ! ॥ज्ञानाविना सर्व कर्म पाप रे ! । मनीं वळखें आपेआप रे ! ॥मानवा०॥२॥सद्गुरुविना देह गांव वोस रे ! । जाण कैसा भव वोसरे ॥भावें धरीं माधवाची कास रे ! । आतां न लावीं अवकाश रे ! ॥मानवा०॥३॥पद ३ रें माझ्या रामाला आण इकोणी जा गे ! ॥ध्रुवपद.॥रुप सांवळें सकुमार बाई ! । खडे कंटक रुततील पायीं ।कशी कैकयीला दया येत नाहीं नाहीं ॥माझ्या०॥१॥कधीं न्हाणियलें नाहिं रघुनाथा । नाहिं स्नेहानें माखियला माथा ।तें दुःख आठविलें राम वना जातां जातां ॥माझ्या०॥२॥राम चालिला जीव झाला घाबरा । उभय नेत्रीं वाहती अश्रुधारा ।रामावांचुनि नाहीं मला थारा थारा ॥माझ्या०॥३॥कशी अंधाची हिरुन नेली काठी । कशी दुर्बळाचि सुटुन पडली गांठी ।तैसें कैकयीनें केलें मला कष्टी कष्टी ॥माझ्या०॥४॥पूर्वि पंक्तिसि केला असेल भेद । साधुसंतांसीं केला असेल वाद । म्हणुनि कैकयीनें केला मशीं रोध रोध ॥माझ्या०॥५॥अखंड माधव ह्मणे शरण जावें कोणा । सद्गुरुवांचोनि नाहीं कोणी शहाणा ।तो मज दाखविल आज रघूराणा राणा ॥माझ्या०॥६॥पद ४ थें चतुराकर नट हरी ।झनननननन मुरली वाजवि प्रातःसमयो बरी. ॥ध्रुवपद.॥अरुणोदय गगनीं ।झगमग झगमग प्रकाश पडला उगवला तरणी ॥गोपांगना मिळोनी ।लगबग लगबग जागृत झाल्या दामोदरालागुनी ॥चाल ॥ अजिंक्य सर्वेश्वरा ! । उठिं उठिं बा अजरंबरा ! ।मुखमार्जन तुम्ही करा । भोजन करा गिरिधरा ! ॥तोड ॥ टपटप टपटप धेनु सोडिती प्रभात फटकांवरी (?) ॥चतुरा०॥१॥गोपीनाथ उठले । भंभंभंभं शंख वाजवित तेहतीस कोटी देव आले ॥साधु संत मिळालें ।धंधंधंधं देवकीचें भाग्य पाहतां भलें ॥चाल ॥ अनंत रवि मुगुटीं । कस्तूरी लल्लाटीं ।पंवच्या मनगटीं । मुद्रिका करबोटीं ॥तोड ॥ चमचम चमचम चमके कानीं नागोत्र साजनी ॥चतुरा०॥२॥देवादिकां कळेना ।नटनट नटनट गाइ चारितो उभा वृंदावना ॥ब्रह्मयाचा भुलवना ।लुटुलुटु लुटुलुटु खेळे सौंगड्यांमध्यें रूप चीमणा ॥चाल ॥ कुजा बुजा बोबडा । निपट अंग चीपडा ।ढेरपोटा वांकडा । पोराचा जुंबाडा ॥तोड ॥ थैथैथैथै नाचत कन्हैय्या गौळण आरती करी ॥चतुरा०॥३॥प्रतिदिनिं द्वारावती ।नित्य उठुनि दो प्रहरीं ..................... पुष्प वर्षती ॥नारद तुंबर गाती ।धिमिकिति धिमिकिति टाळ मृदंग गीत गोविंद गाती ॥चाल ॥ नाचति नृत्यांगना । ऋषि करिती कीर्तना ।तुह्मी राधा माधव म्हणा । नित्य सांगतों जना ॥तोड ॥ गुरुपदीं बा ................. राम त्रिवर्ग एक अक्षरी ॥चतुरा०॥४॥पद ५ वें प्रीति धरीं हरिपायीं मना रे ! ॥ध्रुवपद.॥या नरदेहीं सार्थक हेंची । संतसमागमीं राहीं । मना रे ! ॥प्रीति०॥१॥चंचल हे गति सोडुनि देईं । स्वरुपीं निश्चल राहीं । मना रे ! ॥प्रीति०॥२॥माधवस्मरणीं सुखरूप होसी । न शिरे अन्य उपाईं । मना रे ! ॥प्रीति०॥३॥पद ६ वें विठाबाई माय माझी पंढरीची । दयाळू बहुत अंतरींची ॥ध्रुवपद.॥नामदेवाची प्रीति भारी । भोजना बैसे बरोबरी ।दासी जनीचें काम करी । निजगुज बोलतसे द्वारीं ।पाहेना जाती उंच नीची. ॥विठाबाई०॥१॥धान्य लुटविता दामाजी । धन्याची झाली इतराजी ।तेथें न चले कोणाची अर्जीं । झाली बहुतचि बेमर्जी ।रसीद पोंचवी वेदराची ॥विठाबाई०॥२॥चोख्या महार नाई सेना । कबीर कमाल मोमीन ।ब्रीद उडतां जेठागण (?) । नरहरि आवडिला मन ।भरली हुंडी मेहत्याची ॥विठाबाई०॥३॥माधव आत्मा भक्ताचा । दास्य करी निजदासांचा ।शेत पेरिलें बोधल्याचें । भुलोनी निजकीर्तनीं नाचे ।आवडी असे बहु प्रेमाची ॥विठाबाई०॥४॥पद ७ वें विठोबा नारायण हरी ! । भय भजकांचें हरीं. ॥ध्रुवपद.॥शंकर महाराज योगी । स्मशानवासी वितरागी ।चर्चिलें चिताभस्म आंगीं । गिरिजा शोभे अर्धांगीं ।तो हा हृदयीं ध्यान धरीं. ॥विठोबा०॥१॥ब्रह्मस्वरूप जरि झालें । घालुनि षड्रिपुवरि घाले ।बोध सुरसाचे प्याले । सनत्कुमारादिक धाले ।शुक मुखीं कीर्ती उच्चारी. ॥विठोबा०॥२॥माधव आत्मा गुणरासी । भुलला प्रेमळ भजनासी ।प्रगटे स्वसगुण स्वरुपासी । तो हा पंढरपुरवासी ।अनाथावरि कृपा करी ॥विठोबा०॥३॥पद ८ वें रामकृष्ण नरहरी, विठोबा रामक्रुष्ण नरहरी ।कधिं रे ! कधिं रे ! कधिं रे ! डोळां दाखविसिल पंढरी. ॥ध्रुवपद.॥प्रपंच पसरे कसा, विठोबा ! प्रपंच पसरे कसा ।वनीं वाघुरें पसरि पारधी पिसे चिलकडे तसा ॥ह्मणती कोणि न बसा, विठोबा ! म्हणती कोणि न बसा ।कुटुंबपरिवाराचे साठीं कुजनीं पसरी पसा ॥वाहलों मी भवपुरीं, विठोबा ! वाहलों मी भवपुरीं. ॥कधिं०॥१॥भवाब्धि बुडवी मला, विठोबा ! भवाब्धि बुडवी मला ।तुजवांचुनियां तारक न दिसे धांव, लौकरी चला ॥काळमगर पातला, विठोबा ! काळमगर पातला ।उडि घालुनि ओढितसे मजला बहुतचि दिसतो भला ॥पडुनि राहिलों घरीं, विठोबा ! पडुनि राहिलों घरीं. ॥कधिं०॥२॥माधव आत्मा खरा, विठोबा ! माधव आत्मा खरा ।मी तों पतित पातकी आहें वरिवरि दिसतों बरा ॥दिसे स्वहित तें करा, विठोबा ! दिसे स्वहित तें करा ।पतीतपावन ब्रिदावळी हे संतत हृदयीं धरा ॥वाहलों मी भवसरीं, विठोबा ! वाहलों मी भवसरीं. ॥कधिं०॥३॥पद ९ वें यदुराज सखा रुसला आतां तो कैसा समझे ॥ध्रुवपद.॥प्रेमसुधारस सेविति याहुनी । गोरस आवडीला हरीला ॥यदुराज०॥१॥मेळवुनि अबला सबळा आणि श्रीपति । बांधियला उखळा ॥यदुराज०॥२॥माधव सद्गुरु लाविन ईक्षण । कां हृदयींहुन त्यजिला ॥यदुराज०॥३॥पद १० वें यदुपती गोवळरूप धरितो भक्तजनांस्तव ॥ध्रुवपद.॥वसुदेव देवकिच्या जन्मोनि उदरीं । ह्मणवी नंदकिशोर हरी तो ॥यदु०॥१॥नंद यशोदा पाववि मोदा । गोपीमानसचोर धरीतो ॥यदु०॥२॥ मारुनि मामा ने निजधामा । यादवकुळीं तिळपोर धरीतो ॥यदु०॥३॥माधव रे ! तो तारिल तुजला । वारिल हा भव घोर हरी तो ॥यदु०॥४॥पद ११ वें कशि मथुरेसी जाऊं पदरीं । झोंबतो हरि लाज न धरी सये ! ॥ध्रुवपद.॥नंद न यातें मंद निवारी । मस्करी गरतीची करितो सये ! ॥कशि०॥१॥वाट न सोडी बाट मुरारी । चुंबितो झगडोनि अधरिं सये ! ॥कशि०॥२॥माधव आत्मा त्रिजगाचा तूं । चला जाऊं रघुनाथनगरीं सये ॥कशि०॥३॥पद १२ वें वदनीं वदाल कृष्ण जरी तो । कीर्तनीं अघ सर्व हरी तो ॥ध्रुवपद.॥अर्जुना रथीं झाला सारथी । अश्वाचे करीं दोर धरीतो ॥वदनीं०॥१॥कुब्जादासी कंसगृहींची । पाहुनि भाव तिसीं धरितो ॥वदनीं०॥२॥माधव राघवनामस्मरणीं । संसृतिभय दूर करितो ॥वदनीं०॥३॥पद १३ वें आला हरि मनमंदिरीं । आतां तो जाइल कसा ॥ध्रुवपद.॥बोधरुपें हा फारचि भुलला । बसला जैसा पिसा ॥आला०॥१॥शांतिविटेवर बसणें जाणें । केला पंढरिवसा ॥आला०॥२॥माधव म्हणे गुरुकृपेचा । घालुन बळकट फांसा ॥आला०॥३॥पद १४ वें मुद्रिके सखे ! त्वां कां त्यजिलें रामाशी ॥ध्रुवपद.॥पंचवटींत होतों तिघे सुखाच्या योगें ।सुवर्णमृगाच्या पाठीं धाडिले दोघे ।दशकंठ हरीता झाला झडकरि वेगें ।चोरुनि मला घेवोनि निघाला संगें ॥चाल ॥ जटायुनें युद्ध केलें । मुद्रिके ! ।ते प्राणाशि आपुल्या गेले । मुद्रिके ! ।ऋष्यमूकावरुनि मजला आणलें । मुद्रिके ! ।अशोकीं मला ठेविलें । मुद्रिके ! ।तोड ॥ हे त्रिजटा राक्षसी ठेवियली मजपाशीं ॥मुद्रिके०॥१॥अवचित हातांत पडलें सखये बाई ! ।मोकळले रामलक्ष्मण कवणे ठाईं ।घडीभर धीर धरवेना करुं मी काई ।मज दाखीव रघुरामाचे पाई ॥चाल ॥ किंवा संन्याशी झाले । मुद्रिके ! ।श्रीराम कोणीकडे केले । मुद्रिके ! ।किंवा त्यांना व्याघ्रें वधिलें । मुद्रिके ! ।............................... । मुद्रिके ! ।तोड ॥ दैत्य दुर्मती घेउनि गेले त्यांशी ॥मुद्रिके०॥२॥मुद्रिके सखे ! तूं रामाचे करिंची ।आज कशि आलिस या ठाईं अंतरिंची ।कोठें राम लक्ष्मण सांग सुद वो त्यांची ।मज मोठी आवड त्यांचे भेटीची ॥चाल ॥ आज कशी आलिस या ठाया । मुद्रिके ! ।सोडोनि दिलें रघुराया । मुद्रिके ! ।धन्य धन्य गे ! माझे सखये ! । मुद्रिके ! ।..................................... । मुद्रिके ! ।तोड ॥ धाडिलें तुज मज पाहावया अशोक वनाशी ॥मुद्रिके०॥३॥कीं राम वनामधें फिरत असेल मजसाठीं ।साबरी धरी डोंगर कवटाळुन पोटीं ।कीं माझी गे ! रघुरायाला आवड मोठी ।मग तोडी कुरळे केश जानकी झोटी ॥चाल ॥ घे प्राण माझे सत वती । मुद्रिके ! ।मग चरणीं लागे मारुती । मुद्रिके ! । त्याशि बोले सीता सती । मुद्रिके ! ।.......................................... । मुद्रिके ! ।तोड ॥ माधव करी विनंती श्रीरामाशी ॥मुद्रिके०॥४॥पद १५ वें क्यों करता मगरूरी काफर । भजता क्यों नही रामधनी. ॥ध्रुवपद.॥रामनाम जप उलटा । वाल भये वाल्मीकिमुनी. ॥क्यों०॥१॥जब सागरमे पथर तर गये । बंदर अठराक्षोणी. ॥क्यों०॥२॥शूर्पनखा और कुंभकर्णसो । शिगयेस्तक भयो कर्दमुनी. ॥क्यों०॥३॥खरदूषण और त्रीसुरा अहिमहि । रावणकी क्या रहि बनी. ॥क्यों०॥४॥किष्किंधदेशका राज गमाया । भई वालीकी धूरधुनी. ॥क्यों०॥५॥घरघर भिक्षा मागे भर्तृहरी । महालमुलख सब त्यज रानी. ॥क्यों०॥६॥गोपीचंद सोळासौ रानी । छड मंदिर है सातखणी. ॥क्यों०॥७॥अमना हिसाब हिसाब करले । अखंड माधव कर्दमुनी. ॥क्यों०॥८॥पद १६ वें प्रातःसमय रघुबीर जगावें कौसल्या महतारी ।उठो लालजी ! भोर भयो है संतनको हितकारी ॥ध्रुवपद.॥बंदीजन गंधर्व गुण गावे नाचे थै थै तारी ।शैलसुता शिव द्वारे ठाडे होत कोलाहल भारी ॥उठो०॥१॥सुरनरमुनिब्रह्मादि देवता सनकादिक ऋषि, चारी ।बेदबानीविप्र जस गावे रघुकुल जस बिस्तारी ॥उठो०॥२॥सुन प्रिय बचन उठे रघुनंदन नैनन पलख उधारी ।चीतवन अभय देत भक्तनको मुक्त भए नरनारी ॥उठो०॥३॥भरत छत्रुघन छत्र चवर लिये जनकसुता लियो झारी ।मेवा पान लियो कर लछीमन भर कंचनकी थारी ॥उठो०॥४॥कर अस्नान दान नृप दिन्हे गो गज कंचन भारी ।जयजयकार करत धन्य माधव रघुकुल जस बिस्तासी ॥उठो०॥५॥ N/A References : N/A Last Updated : March 18, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP