मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककविकृत पदें|
निंबराजकृत पद

निंबराजकृत पद

अनेककविकृत पदें.


सद्गुरुरायें नवल मोठें केलें ।
माझें सुख मजला दाखवीलें ।
पवनासंगें गगनामाजीं नेलें ।
जीव मारुनी मजला जीवविलें ॥ध्रुवपद.॥
बरवें घरीं नांदत होत्यें बाई ! ।
लेंकुरवाळी आबळ माझे देहीं ।
घर मोडुनी हिंडतें दिशा दाही ।
सर्वहि मारूनि मज मागें पुढें नाहीं ॥सद्गुरु०॥१॥
भ्रमरगुंफेमाजि नेलें करीं धरूनी ।
भरलें सरोवर पाजिलें मज पाणी ।
मग मी सहज जाहलें अबोलणीं ।
पहातां दीप लागला आनंदवनीं ॥सद्गुरु०॥२॥
आनंदवनीं पाहतां दिव्य तेज ।
एक उरली तिसि हो ! आली निज ।
निजीं नीज दाटलें सुख सहज ।
तेथें नाहीं उरला निंबराज ॥सद्गुरु०॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 17, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP